Eknath Shinde  Saam tv
महाराष्ट्र

Eknath Shinde News: CM शिंदेंचा एक फोन अन् धनगर समाजाच्या तरुणाने सोडलं उपोषण, दोघांमध्ये नेमकं काय संभाषण झालं?

Vishal Gangurde

संदिप नागरे, हिंगोली

Hingoli News In Marathi:

हिंगोलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पुढे धनगर आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी उपोषण करणाऱ्या अशोक मस्के या तरुणासोबत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संवाद साधला. गेल्या 12 दिवसांपासून अशोक मस्के यांनी आमरण उपोषण सुरू केलं होतं. मुख्यमंत्री शिंदे यांच्या विनतीनंतर धनगर समाजाच्या तरुणाने उपोषण सोडलं. (Latest Marathi News)

अन्नाचा कणही न घेतलेल्या अशोक मस्के यांची प्रकृती खालावल्याने शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांचे पथक मस्के यांना रुग्णालयात भरती करण्यासाठी पोहोचले होते. विधिमंडळात धनगर आरक्षणाच्या अंमलबजावण्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जोपर्यंत घोषणा करत नाहीत, तोपर्यंत आपण आमरण उपोषण सोडणार नसल्याचा पवित्रा या तरुणाने घेतला होता.

तरुणाच्या उपोषणाची दखल कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार संतोष बांगर यांनी घेतली. त्यानंतर आमदार बांगर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी या उपोषणकर्त्या तरुणाचा फोनवरून संवाद करून दिला.

यावेळी मुख्यमंत्र्यांनी धनगर आरक्षणासाठी समिती गठित केली आहे. निवृत्त न्यायाधीशांची देखील समिती पुढे काम करणार असल्याचे सांगत उपोषण सोडण्याची विनंती केली, मुख्यमंत्र्यांच्या विनंतीनंतर धनगर समाजाच्या तरुणाने उपोषण सोडलं. या तरुणाने 12 दिवसानंतर उपोषण सोडलं आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मुख्यमंत्री शिंदे यांनी संभाषणात काय म्हटलं?

मुख्यमंत्री शिंदे यांनी तरुणाला म्हटलं की, ' अशोकराव मी एकनाथ शिंदे बोलतोय. आपण धनगर आरक्षणासाठी एक कमिटी तयार केली आहे. आता निवृत्त न्यायाधीशांची कमिटी स्थापन करतोय आहे. मला आमदार संतोष बांगर यांनी तुमच्याबद्दल सांगितले आहे. आपण पुढची प्रक्रिया करतोय, सरकार तुमच्या मागे आहे. उपोषण करून जीवाला त्रास करून घेऊ नका. मी आमदार संतोष बांगर यांच्याकडे निवेदन दिले आहे, कृपया माझ्या निवेदनाकडे लक्ष द्या'.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: मनोज जरांगेंची प्रकृती खालावली, उपचार घेण्यास नकार

Bigg Boss Marathi : कालपर्यंत कडू होतं? निक्कीचा अरबाजला सवाल, बिग बॉसच्या घरात नेमकं काय चाललंय?

निवडणुकीआधीच महायुतीला मोठा धक्का, मित्रपक्षाने साथ सोडली, माजी मंत्र्याची भरसभेत घोषणा!

Hair Care Tips : ऐन तारुण्यात केस पांढरे झालेत? वाचा या मागचं खरं कारण

Mahad News : बिल थकविल्याने विज पुरवठा केला खंडीत; महावितरणच्या कर्मचाऱ्याला मारहाण

SCROLL FOR NEXT