सातारा जिल्ह्यातील म्हसवड (mhaswad) येथे धनगर आरक्षणासाठी (DHANGAR RESERVATION) सुरू असलेल्या आंदोलकांसोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (cm eknath shinde) यांनी संवाद साधला. मुख्यमंत्र्यांनी आंदाेलकांना लवकरच बैठक घेण्याबाबतचे आश्वासन दिले. दरम्यान बैठकीची तारीख निश्चित होईपर्यंत उपोषण सुरू राहणार असल्याची भूमिका आंदोलकांनी स्पष्ट केली आहे. (Maharashtra News)
सातारा जिल्ह्यातील म्हसवड येथे मागील 13 दिवसापासून धनगर समाजाचे आंदोलन सुरू आहे. राज्य सरकारने केंद्राकडे धनगड ऐवजी धनगर या शब्दाच्या दुरुस्तीची शिफारस करावी या प्रमुख मागणीसाठी तिघा युवकांनी उपाेषण सुरू केले आहे.
या उपोषणकर्त्यांसोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मध्यरात्रीच्या सुमारास व्हिडिओ कॉल द्वारे संपर्क साधून उपोषण सोडण्याची विनंती केली. धनगर समाजाचे नेते बाळासाहेब किसवे यांच्या मध्यस्थीतून हा संवाद घडवण्यात आला.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
यावेळी मुख्यमंत्र्यांनी धनगर बांधवांच्या मागण्या लक्षात घेऊन त्या सोडवण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे नमूद केले. लवकरच उपोषणकर्त्यांसोबत बैठक घेऊ असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. दरम्यान जाेपर्यंत बैठकीची तारीख निश्चित होत नाही तोपर्यंत उपोषण सुरूच राहणार असल्याची भूमिका आंदाेलक गणेश केसकर यांनी जाहीर केली आहे.
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.