CM Eknath Shinde Blame On Thackeray Saam Digital
महाराष्ट्र

CM Eknath Shinde Blame On Thackeray: 'कोविडकाळात लोक मरत होते अन् हे...', CM एकनाथ शिंदेंचा ठाकरे पिता- पुत्रांवर गंभीर आरोप

Sandeep Gawade

CM Eknath Shinde Blame On Thackeray

कोविडकाळात लोकं मरत होती आणि हे लोकं पैसे खात होते. काल्पनिक रुग्ण, काल्पनिक डॉक्टर दाखवण्यात आले. माझं कुटुंब माझी जबाबदारी म्हणत काही जण घरी बसून नंबर एकचे मुख्यमंत्री झाले. जनता मात्र दारोदारी फिरत राहिली, असे गंभीर आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचं नाव न घेता केले आहेत. तसेच इंडिया आघाडीचे वरिष्ठ नेते जागावाटपासाठी दिल्लीत व्यस्त असल्यामुळे आणि दिशा प्रकरणात आधीच दिशाहीन झालेलं विरोधकांच गलबत आणखी भरकटलं अशी बोचरी टीका शिंदे यांनी विरोधकांवर केली.

आपली ओरड व आरोप किती खोटे होते हे सिद्ध झालं आहे. जलयुक्त शिवार योजना बासनात गुंडाळून शेतकऱ्यांच्या जीवाशी खेळण्याचे काम महाविकास आघाडीचे. केवळ सूड भावनेने महाराष्ट्राच्या महत्वाकांक्षी प्रकल्प रखडवले गेले. चांगल्या राज्यकर्त्यांचे हे लक्षण नाही. आपल्या अहंकारापोटी राज्य मागे जाता कामा नये. आम्ही राज्य हाती घेतले आणि एफडीआयमध्ये राज्य पुन्हा पहिल्या क्रमांकावर आलं. मेट्रो, कारशेड, समृद्धी, बुलेट ट्रेन, सी लिंक, मिसिंग लिंक, कोस्टल रोड या पायाभूत सुविधांचा यू टर्न बंद केल्याचं ते म्हणाले. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

नागपूर हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने गेले दहा दिवस राजकीय वातावरण तापलं आहे. आज अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी सत्ताधारी विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्यात आले. दरम्यान विरोधकांना केलेल्या आरोपांवर शेवटी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाषणातून प्रत्युत्तर दिलं. तसेच महाविकास आघाडीचं सरकार आणि तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या काळात झालेल्या भ्रष्टाचाराचा पाढाच वाचला.

हे तर शेवटून पहिल्या क्रमांकाचे मुख्यमंत्री

माझे कुटुंब, माझी जबाबदारी. सर्व टेंडर सगे सोयऱ्यांच्या घरी..जनतेनं फिरावं दारोदारी, असं म्हणत शिंदे यांनी अशा पद्धतीने काम करणारे लोकं जनतेचं भलं कसं करू शकतात? असा प्रश्न उपस्थित केला. रस्ते बनवणाऱ्या कंपन्यांना ऑक्सिजन पुरवण्याचं काम देऊन यांनी आरोग्य व्यवस्थेलाच रस्त्यावर आणलं होतं. आरोग्य व्यस्थेवर सगळं सोडून घरी बसणारे देशात एक क्रमांकाचे मुख्यमंत्री झाले. मात्र ते शेवटून पहिल्या क्रमांकाचे मुख्यमंत्री होते, अशा शब्दात त्यांनी उद्धव ठाकरे यांना टोला लगावला.

हायवे बनवणाऱ्या कंपनीला ऑक्सिजन प्लान्ट उभारण्याचं कंत्राट

कोविडकाळात महापालिकेत झालेला भ्रष्टाचार म्हणजे मयताच्या टाळूवरचं लोणी खाण्याचा प्रकार असल्याचं म्हणत त्यांनी आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला. आदित्य राजाच्या कृपेने वरुण राजानं टेंडरचा अक्षरश: टेंडरचा पाऊस पाडला. यातला एक महत्त्वाचं प्यादं म्हणजे रोमिन छेडा असून याची सुरुवात जिजामाता उद्यानातील पेंग्विनपासून सुरू झाली. हायवे बनवणाऱ्या या कंपनीला पेंग्विनचं बांधकाम करण्याचं कंत्राट दिलं. या कंपनीला तब्बल ५७ कंत्राटं देण्यात आली आहेत. त्यानंतर रस्त्यांचं काम करणाऱ्या याच कंपनीला ऑक्सिजन प्लान्ट उभारण्याचं कंत्राट देण्यात आलं. याच कंपनीचं बोरिवलीत कपड्याचं दुकान असून कंत्राट मिळाल्यानंतर दोन टक्के पैसे ठेवून बाकीचे पैसे रोमिन छेलाच्या खात्यात वळवण्यात आले, असे गंभीर आरोप शिंदे यांनी आदित्य ठाकरेंवर केले आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

UPI स्कॅम कसा ओळखायचा? तुमचे पैसे सुरक्षित करण्यासाठी या टिप्स करा फॉलो

Mhada Lottery 2024: म्हाडा लॉटरी घरांसाठी शेवटच्या दिवशी 'पेमेंट फेल'चा फटका! घराचे स्वप्न पूर्ण होणार का? शेकडो अर्जदार चिंतेत

SCROLL FOR NEXT