Swabhimani Shetkari Sanghatana : शेतकऱ्यांच्या तक्रारीनंतर 'स्वाभिमानी' चा बॅंकेतच ठिय्या, प्रशासनाला फुटला घाम

शेतकऱ्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडे बॅंकेच्या कारभाराची तक्रार केली हाेती.
swabhimani shetkari sanghatana andolan in idbi bank parbhani
swabhimani shetkari sanghatana andolan in idbi bank parbhanisaam tv
Published On

Parbhani News :

शासनाने विविध अनुदानाची बॅंकेत जमा केलेली रक्कम शेतक-यांच्या कर्ज खात्यात परस्पर जमा केल्याने परभणी जिल्ह्यातील शेतकरी आक्रमक झाले. शेतक-यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांसह थेट बॅंकेत ठिय्या आंदाेलन छेडले. यामुळे बॅंकेत काही काळ गाेंधळ निर्माण झाला. (Maharashtra News)

परभणी तालुक्यातील धारंगाव या गावातील आयडीबीआय बँकेतून शेतकऱ्यांनी पीक कर्ज घेतले आहे. कधी ओला तर कधी कोरडया दुष्काळाने शेतकरी आधीच त्रासला आहे. त्यातच आयडीबीआय बँकेने शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेली अनुदानाची रक्कम शेतक-यांच्या कर्ज खात्यात जमा करुन घेतली.

swabhimani shetkari sanghatana andolan in idbi bank parbhani
Gadchiroli : गडचिराेलीत नक्षलवाद्यांनी वाहने पेटवली, शुक्रवारी भारत बंदची घाेषणा

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते किशोर ढगे म्हणाले शेतक-यांच्या खात्यात पीक विमा, दुष्काळ किंवा पीएम किसान योजनेचे पैसे जमा झाले हाेते. हे पैसे बॅंकेने शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात परस्पर जमा करुन घेतले. याबाबतची तक्रार शेतकऱ्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडे केली. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

यामुळे आम्ही आज बँकेत ठिय्या आंदोलन केले. स्वाभिमानीच्या ठिय्या आंदोलनाचा पावित्रा लक्षात घेता बँक प्रशासनाने कापुन घेतलेली अनुदानाची रक्कम लवकरच शेतक-यांच्या खात्यात जमा केले जाईल असे बॅंक प्रशासानने आश्वासन दिल्याचे किशोर ढगे यांनी साम टीव्हीशी बाेलताना सांगितले.

Edited By : Siddharth Latkar

swabhimani shetkari sanghatana andolan in idbi bank parbhani
Tuljapur News: सर्वांत माेठी बातमी : तुळजाभवानी दागिने चोरी प्रकरणी महंतांसह 7 जणांवर गुन्हा दाखल (पाहा व्हिडिओ)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com