CM Eknath Shinde News Saam Digital
महाराष्ट्र

CM Eknath Shinde News: कोकणी माणसाने बाळासाहेबांवर, शिवसेनेवर प्रेम केलं...त्यांना काय मिळालं? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सवाल

CM Eknath Shinde News: कोकणी माणसाने बाळासाहेबांवर प्रेम केलं, शिवसेनेवर प्रेम केलं, मात्र त्यांना काय मिळालं? असा सवाल मुखमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे. रत्नागिरी जिह्यातील लोटे परशुराम औद्योगिक वसाहतमध्ये हिंदुस्तान कोको कोला बेव्हरेज लिमिटेड कंपनीच्या नवीन प्रकल्पाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

Sandeep Gawade

CM Eknath Shinde News

कोकणी माणसाने बाळासाहेबांवर प्रेम केलं, शिवसेनेवर प्रेम केलं, मात्र त्यांना काय मिळालं? असा सवाल मुखमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे. कोकणच्या विकासाला हातभार लावणारे प्रकल्प येतात मात्र त्याला विरोध केला जातो. काही लोक केवळ विरोधाच काम करतात, अशी टीका त्यांनी ठाकरे गटाच नाव न घेता केली आहे. आज रत्नागिरी जिह्यातील लोटे परशुराम औद्योगिक वसाहतमध्ये हिंदुस्तान कोको कोला बेव्हरेज लिमिटेड कंपनीच्या नवीन प्रकल्पाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. प्रकल्पाच्या उद्घाटनानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी ही टीका केली आहे.

कोका कोला कंपनी रत्नागिरीत २५०० कोटी रुपयांची गुतवणूक करत आहे. त्यातील ७०० कोटी रुपयांच्या पहिल्या टप्प्याच उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आलं. दोन ते तीन हजार लोकांना या प्रकलातून रोजगार मिळणार आहे. राज्य सरकारकडून त्यांना आवश्यक त्या सुविधा दिल्या जातील. इथला विकास झाला तर तरुण तरुणींना कोकण सोडून रोजगाराच्या शोधात मुंबई ठाण्याला जावं लागणार नाही. त्यामुळे सरकार कोकणाच्या विकासाला प्राधान्य देत आहे. राज्य सरकार कोकणी माणसाचा केवळ वापर करून घेणार नाही, अशा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

कोकणी माणसाला वापरून घेणार नाही असं का म्हणालात या पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, कोकणात प्रकल्प येतात मात्र त्याला विरोध केला जातो. काही लोक फक्त विरोधाच काम करत असतात. कोकणी माणसाने नेहमी बालासाहेबांवर प्रेम केलं, शिवसेनेवर प्रेम केलं, मात्र त्याबदल्यात त्यांना काय मिळालं, असा सवाल त्यांनी यावेळी केला. त्यामुळे यापुढे कोकणी माणसावर अन्याय होणार नाही. त्याचा वापर करून न घेता, कोकणाचा विकास कसा करता येईल, याला प्राधान्य दिलं जाणार असल्यांच ते म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vitamin deficiency: हात-पाय सुन्न पडत असतील तर शरीरात असू शकते 'ही' कमतरता

Maharashtra News Live Update: शिरूरमध्ये कांदा लागवडीला वेग; महिलांनी पावसासाठी घातले साकडे

UPI New Rules : UPI युजर्सला मोठा धक्का, ५ हजारांपेक्षा जास्त पाठवल्यास चार्ज लागणार; जाणून घ्या सरकारचा नवा नियम

Latur News: शिक्षण संस्थाचालकाची आत्महत्या, डोक्यात गोळी झाडून संपवलं; लातूर हादरले

Accident News : नाशिकमध्ये भीषण अपघात! भरधाव ट्रकची दुचाकीला धडक, इंजिनिअरचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT