Political Spotlight on Satara Phaltan Saam
महाराष्ट्र

फडणवीसांच्या फलटण दौऱ्याआधी मोठी घडामोड; डॉक्टर आत्महत्या प्रकरणात दोन्ही आरोपींना बेड्या

Political Spotlight on Satara Phaltan: फळटणमध्ये डॉक्टर तरुणीच्या आत्महत्या प्रकरणामुळे वातावरण तापलं. आरोपींना बेड्या ठोकल्या, आज मुख्यमंत्री फडणवीसांचा दौरा.

Bhagyashree Kamble

  • मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याआधी दोन्ही आरोपी ताब्यात

  • डॉक्टर आत्महत्या प्रकरणात फडणवीस नेमकं काय बोलतील?

  • सर्वांचं लक्ष.

सध्या राज्यात साताऱ्यातील फलटण येथील प्रकरण प्रचंड तापलंय. डॉक्टर तरूणीनं शहरातील नामांकित हॉटेलमध्ये गळफास घेऊन आयुष्य संपवलं. आत्महत्या करण्यापूर्वी डॉक्टर तरूणीनं तळहातावर सुसाईड नोट लिहिली आणि आयुष्याचा दोर कापला. या प्रकरणात आता वेगवेगळे मुद्दे आणि खुलासे उघडकीस येत आहे. काल आरोपी प्रशांत बनकरला पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. तर, पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदने यांनी शनिवारी रात्री पोलीस ठाण्यात जाऊन आत्मसमर्पण केलं.

सध्या दोन्ही आरोपींची कसून चौकशी सुरू आहे. दोन्ही आरोपींना कोर्टात हजर केले जाणार आहे. या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'कुणालाही सोडले जाणार नाही. जे कुणी या प्रकरणात सामील असतील त्यांना कठोरातील कठोर शिक्षा देण्यात येईल', असं म्हटलं होतं. दरम्यान आज मुख्यमंत्री फलटण दौऱ्यावर आहेत. फलटण दौऱ्याआधी डॉक्टर तरूणी आत्महत्या प्रकरणात दोन्ही आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. या प्रकरणाला आता वेग आला असल्याचं पाहायला मिळत आहे.

दरम्यान, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज फलटण येथे आयोजित कृतज्ञता मेळाव्यास उपस्थित राहणार आहेत. या मेळाव्यात फलटण शहर आणि परिसरातील विविध विकासकामांचे ऑनलाईन भूमिपूजन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे तसेच पर्यटन मंत्री शंभूराज देसाई हे देखील उपस्थित राहणार आहेत.

गेल्या दोन दिवसांपासून फलटणमध्ये डॉक्टर महिला आत्महत्येच्या प्रकरणाने सर्वत्र खळबळ उडालेली आहे. अशा पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या फलटण दौऱ्याकडे सर्वांचेच लक्ष वेधले गेले आहे. या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय बोलतात? याकडे सध्या लक्ष आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime News: भाजप नगरसेवकाच्या तिसऱ्या पत्नीवर चाकू हल्ला; रिक्षात बसताना मुलाने डाव साधला

Maharashtra Live News Update: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी मानले मतदारांचे आभार

Ratnagiri Tourism : रत्नागिरीत लपलेला ऐतिहासिक किल्ला, कोकणात गेल्यावर 'हे' ठिकाण नक्की पाहा

Saam Exit Poll : ठाकरेंना धक्का की काँग्रेसची मुसंडी? १२ जिल्हा परिषदांच्या एक्झिट पोलची संपूर्ण आकडेवारी

Post Office Scheme: पोस्टाची जबरदस्त योजना! दररोज ३३३ रुपये भरा अन् फक्त व्याजातून कमवा ५ लाख रुपये

SCROLL FOR NEXT