राज्यातील गुन्हेगारी घटनांवर मुख्यमंत्र्यांची उच्चस्तरीय बैठक
पोलिसांना कडक कारवाईचे स्पष्ट निर्देश
महिला सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर
गेल्या काही दिवसापासून राज्यातील अनेक जिल्ह्यात घडलेल्या गंभीर गुन्ह्यांमुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. नाशिक धर्मांतर, परतवाडा लैंगिक शोषण, खरात प्रकरण यासह मुंबईतील गोरेगाव ड्रग्ज प्रकरणांनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृह विभागाच्या बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी पोलिसांना कारवाईचे कडक निर्देश दिले आहेत. या बैठकीला राज्याचे पोलीस महासंचालक, गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव, एसआयटी प्रमुख तसेच वरिष्ठ पोलिस अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी पोलीस अधिकाऱ्यांना या सर्वप्रकरणांचा तपास अधिक प्रभावी व निष्पक्ष करावा,असे निर्देश दिले. तसेच धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका, अशा स्पष्ट सूचनाही फडणवीस यांनी पोलिसांना दिल्या आहेत. नाशिकमधील धर्मांतराच्या प्रकरणावर बोलताना, मुख्यमंत्री म्हणाले की, धर्मांतरासारखे प्रकार अजिबात खपवून घेऊ नका, हे प्रकरण स्वतःहून उजेडात आणल्याबद्दल नाशिक पोलिसांचे त्यांनी कौतुक केले.
मात्र आता तपास तितकाच दमदार व्हावा, यात असणाऱ्या सर्व पॅटर्नचा तपास करा. कोणताही मुद्दा तपासातून सुटू नये, असे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिलेत. यासह परतवाडा लैंगिक शोषण प्रकरणात पीडितांना तक्रार देण्यासाठी विश्वास देणे आवश्यक आहे. त्यासाठी समुपदेशनाची मदत घेण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या. संबंधित समाजसेवकांचा सहभाग वाढवून पीडितांना आधार देण्यावरही मुख्यमंत्र्यांनी भर दिला.
खरात प्रकरणात पीडितांचा विश्वास जिंकणे सर्वात महत्त्वाचे असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. या प्रकरणात दोषी कोणीही असो, त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे, यासाठी भक्कम पुरावे गोळा करण्याचे आदेश त्यांनी दिले. न्यायालयात खटला मजबूत होण्यासाठी तपासाची दिशा ठोस ठेवावी आणि अपराधसिद्धी हा केंद्रबिंदू असावा, असेही त्यांनी सांगितले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.