Cabinet Decision Maharashtra News Update Saam Tv News
महाराष्ट्र

Cabinet Decision: मंत्रिमंडळाचे ६ महत्वाचे निर्णय, कोणत्या जिल्ह्याला काय मिळालं?

Cabinet Decision Maharashtra News Update: राज्य मंत्रिमंडळाची आज महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये ६ महत्वाचे निर्णय घेण्यात आले. या निर्णयानुसार कोणत्या जिल्ह्याला काय मिळाले हे घ्या जाणून...

Priya More

Cabinet Decision Maharashtra News Update: राज्य मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक आज पार पडली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ बैठक पार पडली. या बैठकिला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्रिमंडळातील इतर सदस्य उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या बैठकीमध्ये ६ महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत.

मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये महिला व बालविकास विभाग, महसूल विभाग, वित्त विभाग आणि कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागासाठी ६ महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. या निर्णयानुसार कोणत्या जिल्ह्याला काय मिळाले हे आपण जाणून घेणार आहोत...

मंत्रिमंडळ निर्णय -

१) मोबाईल व्हॅन -

रस्त्यावर राहणाऱ्या बालकांच्या पुनर्वसनासाठी राज्यात फिरते पथक योजनेस मान्यता देण्यात आली आहे. २९ महापालिका क्षेत्रात पहिल्या टप्प्यात ३१ मोबाईल व्हॅन, यासाठी सुमारे ८ कोटी रूपये मंजूर करण्यात आले आहेत. (महिला व बालविकास विभाग)

२) होम स्वीट होम -

नागपूर स्मार्ट सिटी प्रकल्पबाधितांना ‘होम स्वीट होम’ अंतर्गत वाटप केलेल्या घरांच्या भाडेपट्ट्याच्या दस्तऐवजास मुद्रांक शुल्क कमी करुन फक्त एक हजार रुपये आकारणार. (महसूल विभाग )

३) कृत्रिम वाळू (एम-सँड) धोरणास मंजुरी -

प्रत्येक जिल्ह्यात ५० व्यक्ती/ संस्थांना एम-सँड युनिट स्थापन करण्यासाठी उद्योगविभाग सवलती देणार, एम-सँड तयार करणार्‍या युनिटला २०० रुपये प्रतिब्रास इतकी सवलत देणार. पर्यावरणाची हानी टळणार. (महसूल विभाग)

४) वेतनत्रुटी निवारण समिती-

राज्य वेतनत्रुटी निवारण समितीचा अहवाल स्वीकृत. ८० कोटींचा भार राज्य सरकार स्वीकारणार. (वित्त विभाग)

५) राज्यातील शासकीय आयटीआयचे सार्वजनिक-खासगी भागिदारीतून अद्ययावतीकरण धोरण -

आयटीआयला जागतिक दर्जाच्या प्रशिक्षण केंद्रात रुपांतरित करणे हा मुख्य हेतू, उद्योग आणि आयटीआयच्या समन्वयातून रोजगारक्षमता वाढणार, प्रॅक्टिकल लर्निंग आणि अप्लाईड लर्निंगचे उद्देश साध्य होणार. (कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग)

६) नागपूरमधील विद्यापीठाला जागा -

राष्ट्रीय न्यायवैद्यक शास्त्र विद्यापीठाच्या महाराष्ट्रातील उपकेंद्रासाठी चिंचोली (ता. कामठी) जिल्हा नागपूर येथील २०.३३ हेक्टर आर जागा देण्याचा निर्णय (महसूल विभाग)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT