पैठणमध्ये ढगफुटी; पुरात अडकलेल्या बाळ आणि बाळंतिणीला ग्रामस्थांनी वाचवले माधव सावरगावे
महाराष्ट्र

पैठणमध्ये ढगफुटी; पुरात अडकलेल्या बाळ आणि बाळंतिणीला ग्रामस्थांनी वाचवले

गावकऱ्यांनी पूरातून केलेल्या माय-लेकाराच्या सुटकेचा थरारक व्हिडिओ व्हायरल

डॉ. माधव सावरगावे

माधव सावरगावे

औरंगाबाद: औरंगाबाद Aurangabad जिल्ह्यात कालपासून पुन्हा अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली. काल सायंकाळी पैठण Paithan तालुक्यातील अनेक भागात अतिवृष्टी सदृश्य पाऊस झाल्याने नदी-नाल्यांना मोठा पूर आला. त्यात एक थरारक दृश्य समोर आली आहेत. ढगफुटीमुळे ब्राह्मणगाव तांडामधील पुराच्या पाण्यामुळे अडकलेल्या अठरा दिवसाच्या बाळाला आणि बाळंतीण आईला गावकऱ्यांनी मोठा दोरखंड बांधून सुरक्षितपणे पुरातून गावात आणले.

व्हिडीओ-

18 दिवसाचं बाळ आणि ओली बाळंतीण त्यात पुराच्या पाण्याचा वाढत असलेला प्रवाह यात गावकऱ्यांना मोठी कसरत करावी लागली. छोटंसं बाळ आईच्या कुशीतून त्याला सुरक्षितपणे नदी पार करण्याच्या प्रयत्न करणाऱ्या तरुणांच्या कुशीत होते. त्यात आईचा जीव कासावीस होत होता, तरीही मोठ्या हिमतीने गावकऱ्यांनी बाळाला आणि आईला सुखरूप ओढ्याच्या दुसऱ्या बाजूला आणून सोडले.

13 सप्टेंबर 2021 रोजी वर्षा चव्हाण यांना मूलगा झाला. त्यानंतर ते ब्राह्मणगाव तांड्यावर राहत असल्यामुळे दोन दिवसापूर्वी आई आणि बाळ घरी गेले. मात्र बाळाला निमोनियाचा त्रास सुरू झाल्याने उपचारासाठी दवाखान्यात नेण्यात आले होते. मात्र परत येत असताना गावात जाणाऱ्या मुसळधार पाऊस सुरू झाला त्यात गावात जाण्यापूर्वी असलेल्या पुलावरून पाणी वाहू लागले होते.

बाळाला सुरक्षित घेऊन जायचं कसं असा प्रश्न गावकर यांच्या समोर होता. ओली बाळंतीण आई आणि बाळ आणि वरून पाऊस अशा स्थितीमध्ये गावकऱ्यांनी दोन्ही बाजूने मोठा दोरखंड टाकला गावातील काही पोहायला येणारे तरुण त्यांनी बाळ आणि बाळंतीण या दोघांनाही पकडून पार केला आणि त्यानंतर गावकरी सुटकेचा निश्वास सोडला. छोटसं बाळ कडेवर घेऊन घरी येणार्‍या आईला मात्र मुसळधार पाऊस आणि आपलं बाळ बघून जीव कासावीस होत होता. गावकऱ्यांनी भर पावसात मिशन पूर्ण केले.

Edited By-Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Diet Soda: तुम्हालाही डाएट सोडा पिण्याची सवय आहे का? वेळीच सोडा नाहीतर होतील 'हे' गंभीर परिणाम

Sushil Kedia: सुशील केडियांच्या ऑफिस फोडणाऱ्या ५ जणांना अटक! वरळी पोलिसांकडून गुन्हा दाखल, कोणती कलमे लावली? VIDEO

Maharashtra Live News Update: सातारा-पुणे राष्ट्रीय महामार्गावर असणाऱ्या खांबटकी घाटात ट्रकला मोठी आग

Maharashtra Politics : ‘म’ म्हणजे मराठी नव्हे, तर ‘म’ म्हणजे महापालिका! चंद्रशेखर बावनकुळेंचा ठाकरेंवर घणाघात

Blue Colour Saree: श्रावणात सणासुदींना नेसा 'या' सुंदर निळ्या रंगाच्या साडी, सगळ्यांच्या नजरा राहतील तुमच्यावरुन खिळून

SCROLL FOR NEXT