Heavy Rain Saam tv
महाराष्ट्र

Heavy Rain : बुलढाण्यात ढगफुटी सदृश्य पाऊस; पुरात वृद्ध गेला वाहून, बीड जिल्ह्यातही पुरात वाहून गेल्याने शेतकऱ्याचा मृत्यू

Buldhana Beed News : गेल्या सात दिवसापासून जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. दरम्यान काल सायंकाळी खामगाव तालुक्यातील घारोड गाव परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस कोसळला. या पावसाने घारोड नदीला पूर आला

Rajesh Sonwane

संजय जाधव/ योगेश काशीद 

बुलढाणा/ बीड : राज्यात मागील दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस होत आहे. यामुळे नदी, नाल्यांना पूर आले आहेत. दरम्यान मंगळवारी दुपारच्या सुमारास बुलढाणा जिल्ह्यात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. यामुळे नदीला आलेल्या पुरात घारोड गावातील ७८ वर्षीय वृद्ध पुरात वाहून गेल्याची घटना घडली. तसेच बीड जिल्ह्यात देखील मुसळधार पाऊस झालेल्या ओढ्याला आलेल्या पुरात एक शेतकरी वाहून गेल्याची घटना घडली आहे. 

घारोड नदीच्या पुरात वृद्ध वाहून गेला 

गेल्या सात दिवसापासून बुलढाणा जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. दरम्यान काल सायंकाळी खामगाव तालुक्यातील घारोड गाव परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस कोसळला. या पावसाने घारोड नदीला पूर आला होता. यावेळी घारोड गावातील ७० वर्षीय शेतमजूर धोंडिबा इंगळे हे घरी परतत असताना पुलावरील पाण्याचा अंदाज न आल्याने ते वाहून गेल्याची घटना घडली आहे. घटनेची माहिती जिल्हा प्रशासनाला रात्रीच देण्यात आली होती. मात्र आद्यपपर्यंत प्रशासनाचा कुठलाही अधिकारी किंवा एनडीआरएफची टीम गावात पोहोचली नसल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे. 

बीड जिल्ह्यात अतिमुसळधार पाऊस 

बीड : बीड जिल्ह्यात देखील अतिमुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. बीड जिल्ह्यात गेल्या आठ दिवसापासून अति मुसळधार पावसामुळे नदी, नाले व ओसंडून वाहत आहेत. यामुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. शिवाय कालच्या पावसामुळे शेतात देखील पाणी साचले असल्याने शेतीची कामे रखडली आहेत. 

शेतातून घरी येताना शेतकरी वाहून गेला 

मंगळवारी दुपारनंतर झालेले अति मुसळधार पावसामुळे नदी नाले त्याला पूर आला बीडच्या गेवराई तालुक्यातील टाकळगव्हाण येथील शेतकरी ज्ञानेश्वर सखाराम पराडे हे पुल ओलांडून जात होते. यावेळी पुलावरती आलेल्या पाण्याचा अंदाज न लागल्यामुळे ते पाण्यात वाहून गेले. रात्रभर गावकऱ्यांनी त्यांना शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र मृतदेह सकाळी आढळून आला. घटनेने गावकऱ्यांमध्ये शोककळा पसरली असून पुढील कार्यवाहीसाठी मृतदेह गेवराईच्या उपजिल्हा रुग्णालयात शेव विच्छेदानासाठी पाठवण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rasam Rice Recipe: घरच्या घरी टेस्टी साऊथ इंडियन स्टाईल रसम राईस नक्की बनवा, वाचा सोपी रेसिपी

Raigad Fort : शिवरायांच्या स्वराज्याच्या गौरवशाली इतिहासाचा साक्षीदार, 'रायगड'बद्दल 'या' गोष्टी तुम्हाला माहितेय का?

Maharashtra News Live Update: मेळघाटातील भुमकाबाबा मंदिर अखेर दर्शनासाठी खुले

Gaurav More Wedding : 'फिल्टरपाड्याचा बच्चन' चढला बोहल्यावर; गौरव मोरेने गुपचूप बांधली लग्नगाठ, बायकोसोबतचा पहिला फोटो आला समोर

Ashok Kharat Case: भोंदू अशोक खरात प्रकरणात मोठी अपडेट; आणखी एक महिला अधिकारी रडारवर, प्रशासनात खळबळ

SCROLL FOR NEXT