Janhavi Rahangdale, Bhandara news, HSC board exam Saam TV Marathi
महाराष्ट्र

HSC Exam : काळीज पिळवटून टाकणारा प्रसंग! घरात वडिलांचे पार्थिव, लेकीने काळजावर दगड ठेवून दिला बारावीचा पेपर

Bhandara girl writes HSC exam after father’s death : भंडाऱ्यातील जान्हवी राहांगडाले हिने वडिलांच्या अपघाती निधनानंतरही धैर्य दाखवत बारावीचा इंग्रजीचा पेपर दिला. घरात शोककळा असतानाही वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तिने परीक्षा दिली.

Namdeo Kumbhar

HSC board exam Maharashtra update : घरात वडिलांचे पार्थिव, कुटुंब दारात बसून अश्रू ढाळत होते, संपूर्ण गावावर शोककळा पसरलेली. पण अशातच १८ वर्षांची एक मुलगी डोळ्यांतील अश्रू पुसत घराबाहेर पडते अन् थेट बारावीचा पेपर देण्यासाठी परीक्षा केंद्रावर जाते. हा काही चित्रपटात घडलेला प्रसंग नाही. तर भंडाऱ्यात घडेलला हा प्रसंग मनाला चटका लावणारा आहे. वडिलांच्या निधनाचे अतीव दुःख मनात दाबून बारावीची परीक्षा देणाऱ्या मुलीचे नाव जान्हवी राहांगडाले असे आहे. ती भंडाऱ्यातील तुमसर तालुक्यातील आंबागड येथील राहणारी आहे. जान्हवी हौशीलाल राहांगडाले हिची ही कहाणी अंगावर काटा आणणारी आणि तितकीच प्रेरणादायी आहे.

वडिलांचं अपघाती निधन झाले अन् जान्हवीवर आभाळ कोसळले. पण मुलीने शिकून मोठं व्हावं.. हे वडिलांचे शब्द तिला आठवले. बापाच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात येणार होते.. गावातील, कुटुंबातील लोक, दुरचे पाहुणे अंत्यसंस्काराठी घरी येत होते. दुसरीकडे काळजावर दगड ठेवून जान्हवी बारावीचा पेपर देण्यासाठी परीक्षा केंद्रावर पोहोचली. डोळ्यांसमोर वारंवार वडिलांचा चेहरा येत होता, पेन पकडलेले हात थरथरत होते, पण वडिलांच्या स्वप्नासाठी पेपर पूर्ण केला. बापाचं छत्र हरपलं होतं, पण वडिलांनी पाहिलेलं तिचं शिक्षणाचं स्वप्न अजून जिवंत होतं.

हौशीलाल राहांगडाले यांचे सोमवारी अपघाती निधन झाले. ५१ वर्षाचे हौशीलाल दुपारी सायकलने घराकडे परत येत होते. पण त्याचवेळी त्यांचा तोल गेला अन् कोसळून खाली दगडावर कोसळले. त्यांच्या डोक्याला गंभीर इजा झाली. त्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. हौशीलाल यांच्या अपघाती निधनाने राहांगडाले कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. घरात शोककळा पसरलेली होती, वडिलांचे पार्थिव दारात होते.. पण जान्हवीने धैर्याने परीक्षेला जाण्याचा निर्णय घेतला. डोक्यावरील क्षत्र हरवल्याचं अतीव दुःख मनात दाबून जान्हवीने बारावीचा इंग्रजीचा पेपर दिला. पण पेपर संपल्यानंतर तिच्या अश्रूंचा बांध फुटला. पेपर देऊन जान्हवी दुपारी घरी आल्यानंतर तिच्या वडिलांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Banarasi Saree Design: बनारसी साड्यांचे एका पेक्षा एक डिझाईन्स, हे 5 पॅटर्न नक्की ट्राय करा

Iran-US War: अमेरिका- इराणची अणुब़ॉम्ब चाचणी? जग अणु युद्धाच्या छायेत?

इस्त्रायल आणि इराणमध्ये कोण आहे बलवान? इराणच्या व्हिडिओनं अमेरिका आणि इस्त्रायलची झोप उडवली| Video

लव्ह मॅरेजनंतर तातडीनं घटस्फोट; पुण्यातील महिलेने पतीला दिले 50 हजार

Iran vs Israel America War : इराण होणार बेचिराख? अमेरिकेनं उघडला तिसरा डोळा, VIDEO

SCROLL FOR NEXT