Maratha Aarakshan News Saam TV
महाराष्ट्र

Maratha Aarakshan News: पोलीस आणि मराठा आंदोलकांमध्ये धक्काबुक्की; रावसाहेब दानवेंच्या कार्यक्रमात मोठा गोंधळ, पाहा VIDEO

Clashes Between Police and Maratha Protesters: कार्यक्रम सुरु होताच मराठा आमदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली.

Ruchika Jadhav

Jalna News:

जालन्यात केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या कार्यक्रमात पोलीस आणि मराठा आंदोलकांमध्ये धक्काबुक्की झाली आहे. आज बदनापूरमध्ये 'मेरी माटी मेरा देश' याकार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला रावसाहेब दानवे आणि मंत्री अतुल सावे उपस्थित होते. मात्र कार्यक्रम सुरु होताच मराठा आमदोलकांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केली. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दरम्यान घोषणाबाजी होताच पोलिसांनी मराठा आंदोलकांना रोखण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी मराठा आंदोलक आणि पोलिसांमध्ये धक्काबुक्की झाली आहे. आरक्षण मिळेपर्यंत एकही शासकीय कार्यक्रम होऊ देणार नाही असं येथील मराठा आंदोलकांनी म्हटलं आहे.

बदनापूरमधील दानवेंच्या कार्यक्रमात मराठा आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केल्यानंतर मराठा आंदोलकांना पोलिसांनी बाहेर काढलं. या घटनेची सर्वत्र चर्चा सुरू आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर जरांगेंनी सरकारला दिलेल्या मुदतीमधील फक्त ४ दिवस शिल्लक आहेत. २४ ऑक्टोबरला नेमकं काय होणार याकडे संपूर्ण मराठा समाजाचं लक्ष वेधलंय.

अशातच काल मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सुनील कावळे यांनी आपला प्राण त्यागला. त्यांच्या आत्महत्येमुळे संपूर्ण मराठा समाजावर दु:खाचा डोंगर कोसळलाय. या घटनेमुळे आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा समाज पुन्हा एकदा आक्रमक झाल्याचे दिसत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

India Likely XI: संजू सॅमसन OUT, हर्षितचाही पत्ता कट होणार, प्लेईंग ११ मध्ये ३ बदलाची शक्यता

आधी भावाचा खून, नंतर वहिनीवर बलात्कार करून पोटावर लाथ मारली, भ्रूण गर्भाशयाच्या बाहेर येताच मृत्यू

Shocking News : चौथीतील विद्यार्थिनीची आत्महत्या, शाळेच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारून संपवलं जीवन, नेमकं काय घडलं?

Maharashtra Live News Update: पुण्यातील कोरेगाव पार्क परिसरात पुन्हा अपघात, २ जणांचा मृत्यू

Chandrakant Patil: 'शिवसेना ठाकरेंची,राष्ट्रवादी पवारांची'; सुप्रीम कोर्टाआधीच चंद्रकांत पाटील यांचा निकाल

SCROLL FOR NEXT