Akola News Saam Tv
महाराष्ट्र

Akola News : अकोल्यात दोन गटात तुफान राडा; दगडफेक आणि जाळपोळ, हरीपेठ भागात नेमकं काय घडलं?

Satish Kengar

अकोल्यात दोन गटात मोठा राडा झाल्याची बातमी समोर येत आहे. दोन गटाने एकमेकांवर दगफेक करत मोठ्या प्रमाणात जाळपोळ केल्याची घटना घडली आहे. ही घटना अकोल्यातील हरीपेठ भागात घडली आहे. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एका रिक्षाला धक्का लागल्याने हा संपूर्ण वाद पेटला. हरीपेठ भागात सायंकाळी 4 वाजता ही घटना घडली. यानंतर दोन गटात तुफान राडा झाला. ज्याचे रूपानंतर नंतर दगडफेक आणि जाळपोळमध्ये झालं. या घाटेंट अनेक नागरिक जखमी झाले आहेत.

या राड्यादरम्यान एक रिक्षा आणि तीन दुचाकी वाहन जमावाने जाळल्या. या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी पोलीस फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला आहे. येथे ठिकठिकाणी पोलिसांचा कडक बंदोबस्त पाहायला मिळत आहे. पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी अतिरिक्त पोलीस तुकडी मागवल्याचंही सांगण्यात येत आहे.

याच घटनेवर आपली प्रतिक्रिया देताना अजित पवार गटाचे नेते आणि आमदार अमोल मिटकरी म्हणाले आहेत की, ''यासंदर्भात मी अद्याप पूर्ण माहिती घेतलेली नाही. याचं कारण असं समजत आहे की, रिक्षाला दुचाकीचा धक्का लागला. यानंतर या दोघांमध्ये बाचाबाची होऊन ही इतकी मोठी घटना घडली.''

याआधीही घडली होती अशी घटना

अमोल मिटकरी यांनी सांगितलं की, याआधीही अशी घटना येथे घडली होती. त्याच परिसरात आता पुन्हा तशीच घटना घडली आहे. यात जो कोणी दोषी असेल त्यावर कठोर कारवाई करण्यात येईल. अकोला सारख्या सुसंस्कृत जिल्ह्याला असं चित्र, निश्चितच चांगलं नाही, असं ते म्हणाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : मंत्रालयातील मेगाभरतीची घोषणा हवेतच; किती कर्मचाऱ्यांची आहे कमतरता? पाहा व्हिडिओ

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींची 'दिवाळी', खात्यात येणार 4500 रुपये; बँकेने दंडासाठी कापलेले पैसेही पुन्हा मिळणार

Election Result 2024 : हरियाणा आणि जम्मू-काश्मीरमध्ये कोणाची सत्ता येणार? कधी आणि कुठं पाहणार निकाल? वाचा

Marathi News Live Updates : कांदिवलीकरांची वाहतूक कोंडी पासून होणार सुटका

Irani Cup: इराणी कप चॅम्पियन्स मुंबई संघावर पैशांचा वर्षाव! MCA कडून तब्बल इतक्या कोटींचे बक्षीस जाहीर

SCROLL FOR NEXT