सिंधुदुर्गात शिवसेना भाजप मध्ये तुफान राडा अनंत पाताडे
महाराष्ट्र

सिंधुदुर्गात शिवसेना भाजप मध्ये तुफान राडा

सिंधुदुर्गात राजकीय राडे तसे नवीन नाहीत. मात्र गेल्या काही वर्षांपासून हे राडे थांबले होते.मात्र आज कुडाळ मध्ये या राड्यांची पुनरावृत्ती झाली.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अनंत पाताडे

सिंधुदुर्ग -  सिंधुदुर्गात Sindhudurg राजकीय राडे तसे नवीन नाहीत. मात्र गेल्या काही वर्षांपासून हे राडे थांबले होते.मात्र आज कुडाळ मध्ये या राड्यांची पुनरावृत्ती झाली निमित्त होत शिवसेनेच्या Shivsena वर्धापन दिनाच आणि त्यानिमित्त मिळणाऱ्या पेट्रोलचे Petrolशाब्दीक बाचाबाचीतून हमरी तुमरीवर आलेल्या या प्रकरणात पोलिसांनी Police वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे अनर्थ टळला.मात्र पुन्हा एकदा या निमित्ताने सिंधुदुर्गचे राजकारण पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहे. Clash between Shivsena and BJP in Sindhudurg

आज शिवसेनेचा वर्धापन दिन त्यानिमित्ताने आज कुडाळमध्ये  एक लिटर पेट्रोलच्या पैशाचे वाटप करण्याचे ठरविण्यात आले होते.कुडाळ मधील नारायण राणेंच्या पेट्रोल पंपावर हे मोफत एक लिटर पेट्रोल मिळणार असे जाहीर करण्यात आले होते. तसेच उपरोधीक म्हणून भाजपच्या सदस्यांना एक लिटर मोफत पेट्रोल देण्याचे ही जाहीर करण्यात आले होते.संभाव्य धोका ओळखून सकाळ पासूनच पोलिसांनी कडक बंदोबस्त या पंपावर ठेवला होता.भाजपचे कार्यकर्ते ही जमले आणि वादास तोंड फुटले.

हे देखील पहा -

भाजपचे कार्यकर्ते सकाळ पासूनच या राणेंच्या भारत पेट्रोलियमच्या पंपावर जमले होते.आमदार वैभव नाईक आपल्या कार्यकर्त्यांसह या ठिकाणी आले.पेट्रोल पंपाच्या बाहेर वैभव नाईक लोकांना एक लिटर पेट्रोलच्या पैशाचे पाकीट वाटप करत असतानाच तिथे येऊन भाजप कार्यकर्त्यांनी आक्षेप नोंदवला.शाब्दीक बाचाबाची वाढत गेली. आक्रमक झालेल्या भाजपच्या कार्यकर्त्यांनी पैसे वाटप करायला अटकाव केला.दोन्ही कडचे कार्यकर्ते एकमेकांच्या अंगावर धावून गेले.एकमेकांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी झाली.अखेर उग्र झालेल्या या कार्यकर्त्यांना पोलिसांनी अडवले आणि एक मोठा राडा होता होता राहिला. Clash between Shivsena and BJP in Sindhudurg

दोन्ही कडचे कार्यकर्ते एवढे उग्र झाले होते की एकमेकांवर तुटून पडले.पोलिसांची कुमक जास्त होती.त्यामुळे त्यांनी तातडीने सर्व कार्यकर्त्यांना बाजूला केले.पोलिसांच्या आजच्या भूमिकेमुळेच मोठा राडा होऊ शकला नाही.पोलिसांनी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना आमदारांसाहित बाजूला नेले.त्यानंतर हायवे वरील इंडियन ऑइलच्या पेट्रोल पंपावर शिवसेनेकडून लोकांना पेट्रोलसाठी पैसे वाटण्यात आले.मात्र या दोन्ही कडच्या कार्यकर्त्यांनी कोविड नियमांचे उल्लंघन केल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असं पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे.

सिंधुदुर्ग म्हटले की राजकीय राडेबाजी नवीन नाही पण काही वर्ष ही राडेबाजी थांबली होती परंतु शिवसेनेच्या 55 व्या वर्धापनदिन पुन्हा एकदा पुनरावृत्ती पाहायला मिळाली.  आमदार वैभव नाईक आणि त्यांचे कार्यकर्ते तसेच भाजपचर कार्यकर्ते  एकमेकांनासमोर आल्याने जोरदार घोषणाबाजी देण्यात आली त्यातून पुन्हा एकदा राडेबाजी पाहायला मिळाली पण मात्र पोलीस वेळीत पोचल्यावर अनर्थ टळला आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शेतकरी पाण्यात, जिल्हाधिकारी मग्न नाचगाण्यात, जिल्हाधिकाऱ्याचा प्रताप, नागरिकांचा संताप

Damage Lungs: खराब फुफ्फुसांचे आरोग्य सुधारण्यासाठी खा 'हे' पदार्थ, ठरतील गुणकारी

India vs Pakistan Final: आशिया कप फायनलमध्ये भारत- पाकिस्तान पुन्हा आमने सामने

Asia Cup 2025 : अभिषेक-तिलकची दमदार खेळी, संजू सॅमसनही चमकला; श्रीलंकेसमोर 'इतक्या' धावांचे आव्हान

Triglycerides in children : पालकांची चिंता वाढली; ५ ते ९ वयोगटातील मुलांमध्ये वाढतोय भयंकर आजार

SCROLL FOR NEXT