शिवसेना@55 - सेना, बाळासाहेब आणि रुपेरी पडदा !

बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेनेवर आधारित काही हिंदी आणि मराठी चित्रपटांचा आढावा
शिवसेना@55 - सेना, बाळासाहेब आणि रुपेरी पडदा !

शिवसेना@55 - सेना, बाळासाहेब आणि रुपेरी पडदा !

Saam Tv 

Published On

सुरज सावंत

मुंबई : सिनेमा आणि राजकारण हे प्रत्येक माणसाच्या आयुष्यात सापेक्ष ठरणारे विषय आहेत. भारतात राहणाऱ्या प्रत्येक माणसाचे जीवन राजकारण आणि सिनेमाने व्यापलं आहे. म्हणूनच जेव्हा हे दोन विषय एकत्र आले आणि त्यातून साकारल्या गेलेल्या कलाकृतीला लोकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. Films that have Shivsena and Balasaheb potrail

आज शिवसेनेला 55 वर्षे पूर्ण होत आहेत. पाच दशकांच्या या काळात शिवसेनेने पक्ष म्हणून अनेक चढउतार पहिले. या सर्व काळात बाळासाहेब ठाकरेंच्या व्यक्तिमत्वाची भुरळ मुंबईसह महाराष्ट्रातील मराठी माणसावर मोठ्या प्रमाणात पडली होती.

हे देखील पहा -

शिवसेनेने आणि बाळासाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या आणि देशाच्या देखील राजकारणाला प्रभावित करायला सुरुवात केली त्यातूनच सिनेइंडस्ट्री देखील प्रभावित होऊ लागली. सिनेसृष्टीतून देखील बाळासाहेब ठाकरेंच्या व्यक्तिमत्वाला साजेशी व्यक्तिरेखा साकारण्याचा अनेक चित्रपट निर्मात्यांनी व दिग्दर्शकांनी प्रयत्न केला. त्या सर्वच सिनेमांना प्रेक्षकांनी देखील भरभरून दाद दिली. Films that have Shivsena and Balasaheb potrail

अनेक सिनेमांमध्ये शिवसेना आणि हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना साकारण्याचा प्रयत्न करण्यात आला. कारण जेव्हा सिनेमात कोणत्याही चित्रपट दिग्दर्शकाला आणि निर्मात्याला शक्तीशाली माणूस दाखवण्याची वेळ आली तेव्हा त्यांनी ती भूमिका बाळासाहेब ठाकरेंच्या व्यक्तिरेखेच्या जवळ जाणारीचं दाखवली.

<div class="paragraphs"><p>शिवसेना@55 - सेना, बाळासाहेब आणि रुपेरी पडदा !</p></div>
शिवसेना भवनावर हल्ला करण्याची कोणाची हिम्मत नाही - संजय राऊत

बाळासाहेब ठाकरेंवर आधारित अश्याच काही हिंदी आणि मराठी चित्रपटांचा आढावा :

चित्रपटांमध्ये ठाकरे आणि शिवसेना साकारण्याचे समीकरण भारतात पहिल्यांदा एन.चंद्र दिग्दर्शित सिनेमा नरसिम्हामध्ये (Narsimha) करण्यात आलं. १९९१ साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात अभिनेते ओम पुरी यांनी आबाजी या पात्राची जी भूमिका साकारली होती, ती बाळासाहेबांच्या व्यक्तीरेखेच्या जवळ जाणारी होती.

त्यानंतर १९९५ मध्ये मनी रंतनम यांचा बहुचर्चित बॉम्बे (Bombay) हा चित्रपट आला जो 1991-92 च्या हिंदू मुस्लीम दंगलीवर आधारीत होता. या मध्ये लोकांनी पुन्हा एकदा बाळासाहेब यांच्या जवळ जाणारी व्यक्तिरेखा पाहिली, जी सिनेमात साकारली होती अभिनेते तिनू आनंद यांनी.

मग वेळ होती ती म्हणजे राम गोपल वर्मा यांचा सर्वात गाजलेला सिनेमा सरकारची (Sarkar), या सिनेमामध्ये सरकारच्या भूमिकेत होते सिनेसृष्टीचे महानायक अमिताभ बच्चन आणि त्यांनी वटवलेली ही भूमिका हुबेहुब बाळासाहेबांच्या व्यक्तिरेखे सारखीचं होती, त्यामुळे या सिनेमाला देखील लोकांचा उदंड प्रतिसाद लाभला होता.

हिंदी सिनेमांमध्ये हे सगळे प्रयोग होत असताना, या सगळ्यामंध्ये आपले मराठी सिनेमे ही मागे राहिले नाहीत. काही सिनेमे हे ठाकरे परिवाराची गोष्ट सांगणारे होते, तर काही त्यांचे विचार ! आणि मग २ वर्षांपूर्वी बाळासाहेबांवर आधारित एक बायोपिक पण निर्माण झाला.

मराठी सिनेमामध्ये बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना साकारण्याची सुरूवात केली अवधूत गुप्ते यांनी, आपल्या झेंडा सिनेमामधून त्यांनी महाराष्ट्राच राजकारण शिवसेना आणि मनसे भोवती कसे फिरते हे दाखवून दिलं.

खासदार संजय राऊत जेव्हा निर्माते म्हणून सिनेसृष्टीत आले तेव्हा त्यांचा पहिला सिनेमा ठरला बाळकडू ! या सिनेमात प्रेक्षकांना बाळासाहेब ठाकरेंचे ठाम विचार दाखवण्यात आले.

अगदी अलीकडेच बाळासाहेब ठाकरे यांच्या आयुष्यावर आघारीत सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला. संजय राऊत निर्मित आणि अभिजीत पानसे दिग्दर्शित 'ठाकरे' या सिनेमात बाळासाहेब आणि शिवसेनाप्रमुख यांचा संपूर्ण जीवन प्रवास पाहायला मिळाला. या चित्रपटात बाळासाहेबांची व्यक्तीरेखा साकारली होती नवाजुद्दीन सिद्दीकी यांनी.

Edited By : Krushnarav Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com