सुरज सावंत
मुंबई - भाजपच्या BJP काही लोक काल शिवसेना Shivsena भवनासमोर आले होते. शिवसेना भवनावर हल्ला कोणाची करण्याची हिम्मत नाही. काल आलेले लोक कशासाठी आले होते, त्यांचा संबंध काय आहे असा सवाल संजय राऊतांनी Sanjay Raut उपस्थित केला आहे. No one dares to attack Shiv Sena Bhavan says Sanjay Raut
भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी राम मंदिराच्या मुद्द्यावरून काल शिवसेना भवनावर मोर्चा काढला होता. त्यावेळी शिवसैनिक आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये मोठा राडा झाला. शिवसेना भवन महाराष्ट्राच्या अस्मितेचे प्रतीक आहे. अशा लोकांना चोख उत्तर हे शिवसेना स्टाईलने दिले जाईल हे मी रेकॉर्डवर बोलत आहे असे संजय राऊत म्हणाले आहे.
हे देखील पहा -
शिवसेना भवनावर मोर्चा काढण्याचे कारण काय होते ? तुम्हाला लिहिता आणि वाचता येतं का? एकदा परत सामनाचा अग्रलेख नीट वाचा. जे आरोप झाले आहेत ते नीट वाचा. आमचे प्रवक्ते काय म्हणाले ते नीट ऐका. जे आरोप झाले त्याची चौकशी करावी. त्यांच्यावर कारवाई करा, असं अग्रलेखात म्हटलं आहे. त्यावरून तुम्हाला मिरच्या का झोंबल्या?, असा सवाल राऊतांनी केला आहे. No one dares to attack Shiv Sena Bhavan says sanjay raut
भाजपवर आम्ही आरोप केलेला नाही. हा घोटाळा भाजपने केला असे देखील आम्ही म्हणालो नाही. तरीही तुम्ही टीका करता, ट्रस्टमध्ये काय भाजपची माणसं आहे का? ट्रस्टला जर काही प्रश्न विचारले तर त्यांनी याचा खुलासा करू नये का? असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे.ज्यांनी काल शिवसेना भवनावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला त्याला शिवसैनिकांनी प्रसाद दिला आहे आम्हाला शिवभोजन थळी द्यायला लावू नाका असा सज्जड इशारा शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपला दिला आहे.
पुढे प्रदीप शर्मा यांच्यावर बोलताना म्हणाले की, या प्रकरणी यासंबंधी मुख्यमंत्री, राज्याचे गृहमंत्री, गृहसचिव, मुंबईचे पोलीस आयुक्त आणि जे कायदा सुव्यवस्था यातील प्रमुख आहेत तेच अधिकृतपणे बोलू शकतील. ज्या विषयाची माझ्याकडे माहिती नाही त्याबद्दल मी बोलू शकत नाही असे संजय राऊत म्हणाले.
Edited By - Shivani Tichkule
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.