Amravati Navneet Rana News Saam TV
महाराष्ट्र

Amravati News : माझा कॉल का रेकॉर्ड केला? नवनीत राणा पोलिसांवर भडकल्या, पाहा VIDEO

नवनीत राणा आणि पोलिसांमध्ये बाचाबाची सुद्धा झाली.

साम टिव्ही ब्युरो

अमर घटारे, साम टिव्ही

Amravati Navneet Rana News : अमरावतीत एका आंतरधर्मीय विवाह प्रकरणानंतर हिंदू संघटना चांगल्याच आक्रमक झाल्या आहेत. अशातच या प्रकरणात आपला कॉल का रेकॉर्ड केला? असा प्रश्न विचारत खासदार नवनीत राणा यांनी पोलिसांसोबत हुज्जत घातली. यावेळी नवनीत राणा आणि पोलिसांमध्ये बाचाबाची सुद्धा झाली. या संपूर्ण प्रकाराचा व्हिडीओ समोर आला आहे. (Amravati Todays News)

काय आहे प्रकरण?

१९ वर्षीय हिंदू तरुणीला पळवून नेण्यात आलं. त्यानंतर तिचा विवाह सुद्धा लावण्यात आला. प्रकरण समोर येताच, अमरावतीच्या खासदार नवनीत राणा हिंदू संघटनेच्या कार्यकर्त्यांसह थेट राजापेठ पोलीस ठाण्यात दाखल झाल्या. मुलीला माझ्या समोर आणा अशी मागणी यावेळी राणा यांनी केली.

मुलीला डांबून ठेवल्याचा आरोप

मुलीने केलेल्या चॅटिंगवरून पोलिसांनी सोहेल शहा या संशयित आरोपीला राजापेठ पोलीस ठाण्यात आणले. मात्र अजूनही मुलीचा शोध न लागल्याने भारतीय जनता पक्ष विश्व हिंदू परिषद कार्यकर्ते आणि अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आक्रमक झाल्या. आरोपींनी मुलीला डांबून ठेवल्याचा आरोप यावेळी नवनीत राणा आणि इतर कार्यकर्त्यांनी केला. (Navneet Rana Todays News)

'कॉल रेकॉर्डवरून राणा आणि पोलिसांमध्ये वाद'

पीडित मुलीचे पालक माझ्याकडे याबाबतची तक्रार घेऊन आल्यानंतर मी पोलिसांना फोन केला, मात्र पोलिसांनी माझा फोन रेकॉर्ड केला असा आरोप खासदार नवनीत राणा यांनी केला. इतकंच नाही तर, तुम्हाला माझा कॉल रेकॉर्ड करण्याचा अधिकार कुणी दिला. असा प्रश्नही नवनीत राणा यांनी पोलिसांना विचारला.

यादरम्यान पोलिस आणि नवनीत राणा यांच्यात वाद निर्माण झाला. सध्या या ठिकाणी तणावाचे वातावरण असून मोठ्या संख्येनं गर्दी पोलिस ठाण्यात झाली होती. दोन तासांत मुलीचा शोध घ्या, या मुलांचा एक समूह आहे, असं म्हणत राणा यांनी पोलिसांना अल्टिमेटम सुद्धा दिला. दरम्यान, नवनीत राणा आणि राजापूर पोलिसांमध्ये झालेल्या बाचाबाचीचा व्हिडीओ समोर आला आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : मुख्यमंत्रिपदाचा पेच संपला? भाजपकडून एकनाथ शिंदे यांना दोन ऑफर

Pushpa 2 Actor News: पुष्पा चित्रपटाचा स्टार अभिनेता अडचणीत! महिलेने केले लैंगिक शोषणाचे आरोप

Shirur News : धक्कादायक..सोने चोरीसाठी तोडला महिलेचा कान; दरोडेखोरांचे भयानक कृत्य

Panipuri : स्ट्रीट स्टाइल चटपटीत पाणीपुरीचे पाणी, फक्त वापरा 'हा' पदार्थ

Nail paint: नेलपेंट लावायची सवय असेल तर आजच व्हा सावधान अन्यथा... होतील 'हे' गंभीर परिणाम

SCROLL FOR NEXT