Maharashtra News Live Update Saam Tv News
महाराष्ट्र

Maharashtra News Live Update: मुंबईत ताब्यात घेतलेल्या ६०० आंदोलकांची सुटका

Marathi Breaking Live Headlines Updates : सीजीपीचे आज दिल्लीत आंदोलन, अभिजित दीपके, ध्रुव राठी, ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याची मागणी, महाराष्ट्रातील दुष्काळाची स्थिती, महाराष्ट्रासह देशातील राजकीय घडामोडी, राज्यातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...

Namdeo Kumbhar

मुंबईत ताब्यात घेतलेल्या ६०० आंदोलकांची सुटका

मुंबई पोलिसांच्या माहितीनुसार, मुंबई शहरात विविध ठिकाणांहून सुमारे ६०० आंदोलकांना ताब्यात घेण्यात आले होते. त्यानंतर या सर्व आंदोलकांची सुटका करण्यात आली आहे. पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे. दुसरीकडे, ऑगस्ट क्रांती मैदान येथे लावलेले बॅरिकेड्स हटवण्यात आले आहेत.

निवडणूक आयुक्तांविरोधात काँग्रेसचं आंदोलन, वसई- विरारमध्ये आयुक्तांचं पिंडदान

काँग्रेसचे वसई विरार जिल्हाध्यक्ष निलेश पेंढारी यांच्या नेतृत्वाखाली आज सायंकाळी ६ वाजता नालासोपारा पूर्व तुळींज ब्रिज खाली हे आंदोलन केले आहे.मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी इंडिया आघाडीने पुकारलेल्या लढ्यात सहभागी होऊन, ज्ञानेश कुमारचा राजीनामा झालाच पाहिजे, या मागणीसाठी नालासोपाऱ्यात काँग्रेस, समाजवादी पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट तर्फे ज्ञानेश कुमार यांचे पिंडदान आंदोलन करून तीव्र निदर्शने केली आहेत.

पुण्यातील शनिवारवाडा परिसरात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी सोडलं

लष्कर पोलिसांनी 102 विद्यार्थ्यांना आज दुपारी आंदोलन करताना घेतलं होतं ताब्यात

लष्कर पोलीस स्टेशन समोर विद्यार्थी आंदोलन करत होते. विद्यार्थ्यांना सोडण्यात यावं त्यांच्यावर गुन्हे दाखल करू नये अशा मागणीसाठी आंदोलन सुरू होतं. विद्यार्थ्यांना सोडल्यानंतर आता आंदोलन स्थगित करण्यात आल आहे.

तुषार गांधींची ८ तासांनंतर मुंबई पोलिसांच्या ताब्यातून सुटका

तब्बल ८ तासांहून अधिक तास ताब्यात असलेल्या तुषार गांधी यांना पोलिसांकडून सोडण्यात आले आहे

तुषार गांधी यांना वांद्रे येथून ताब्यात घेतल्यानंतर डी एन नगर पोलीस स्थानकात ठेवण्यात आले होते

रायगडातील इतर तालुकेही दुष्काळग्रस्त जाहीर होण्याची शक्यता

रायगड : रायगड जिल्ह्यातील इतर तालुकेही दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर होण्याची शक्यता असल्याचा आशावाद पालकमंत्री भरत गोगावले यांनी व्यक्त केला आहे. सध्या जिल्ह्यातील केवळ श्रीवर्धन तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करण्यात आला आहे. इतर तालुक्यांमधील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी १२ तारखेला बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीत दुष्काळसदृश परिस्थिती आणि आवश्यक उपाययोजनांबाबत चर्चा होणार असून, इतर तालुक्यांच्या घोषणेकडे आता लक्ष लागले आहे.

तुषार गांधी यांची लवकरच सुटका होणार

मुंबई : तुषार गांधी यांना पोलिसांकडून लवकरच सोडण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी तुषार गांधी यांना फोनवरून आमदार आदित्य ठाकरे यांच्याशी संवाद साधून दिला. सकाळी वांद्रे येथून पोलिसांनी तुषार गांधी यांना ताब्यात घेतले होते. सध्या तुषार गांधी बोरिवली पोलीस ठाण्यात आहेत.

पुण्यातील लष्कर पोलीस स्टेशनबाहेर CJP कार्यकर्त्यांचं आंदोलन, जोरदार घोषणाबाजी सुरू

पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या CJP कार्यकर्त्यांना पुणे पोलिसांनी याच पोलीस स्टेशनमध्ये ठेवलं असून याच पोलीस स्टेशनच्या बाहेर कार्यकर्त्यांनी गोंधळ सुरू केला आहे.

सातारा जिल्ह्यात दुष्काळी पंचनामे वेगाने सुरू; जिल्हाधिकाऱ्यांकडून पिकांची पाहणी

कमी पावसामुळे सातारा जिल्ह्यातील ६ तालुक्यांमध्ये दुष्काळी परिस्थिती जाहीर करण्यात आली असून, प्रत्यक्षात शेतात जाऊन फोटो काढून पंचनामे करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. या पंचनाम्यातून एकही नुकसानग्रस्त शेतकरी सुटणार नाही आणि खरी वस्तुस्थिती समोर येईल, अशी ग्वाही सातारा जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी दिली आहे. आज त्यांनी महसूल, कृषी आणि ग्रामविकास विभागाचे अधिकारी यांच्या समवेत वाढे, आरळे, वडूथ, बोरखळ येथील गावांमधील शेतात प्रत्यक्ष बांधावर जाऊन पाहणी केली.

वरुण सरदेसाई मुंबई पोलिसांच्या तब्यात

वरुण सरदेसाई मुंबई पोलिसांच्या तब्यात

पुण्यात लाल महाल चौकात आंदोलन करणाऱ्या 102 जणांना पुणे पोलिसांनी घेतलं ताब्यात

पुण्यात लाल महाल चौकात आंदोलन करणाऱ्या 102 जणांना पुणे पोलिसांनी घेतलं ताब्यात

ताब्यात घेऊन लष्कर पोलीस स्टेशन येथे घेऊन गेले आहेत

आंदोलन विद्यार्थी त्या ठिकाणी जाऊन आंदोलन करत आहेत

काँग्रेस सोमवारी मोठ्या आंदोलनाच्या तयारीत

काँग्रेस सोमवारी मोठ्या आंदोलनाच्या तयारीत

देशातलं हुकूमशाही सरकार घाबरलं - अजिंक्य शिंदे

देशातलं हुकूमशाही सरकार घाबरलं - अजिंक्य शिंदे

अभिनेता इम्रान खानला पोलिसांनी घेतलं ताब्यात

अभिनेता इम्रान खानला पोलिसांनी घेतलं ताब्यात

मुंबईमधील आंदोलनात CJP च्या समर्थकांची धरपकड

ऑगस्ट क्रांती मैदानात मोठ्या संख्येने तरुणाई जमा झाली असून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरत आहे.

नागपुरातून CJPच्या आंदोलनासाठी गेलेल्या आंदोलनकर्त्यांना दिल्ली पोलिसांनी घेतले ताब्यात

इंडिया गेट परिसरातून CJPच्या आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले

दिल्ली पोलिसांनी जंतर-मंतर परिसरात पत्रकारांना अडवलं

केंद्र आणि राज्य सरकारांकडून आंदोलनांवर घालण्यात आलेल्या निर्बंधांचा बॉम्बे लॉयर्स असोसिएशनकडून निषेध

केंद्र आणि राज्य सरकारांकडून आंदोलनांवर घालण्यात आलेल्या निर्बंधांचा बॉम्बे लॉयर्स असोसिएशनकडून निषेध

आंदोलनांवर ज्या पद्धतीने निर्बंध लादले जात आहेत, त्यावरून सरकारने ‘अघोषित आणीबाणी’ लागू केल्याची असोसिएशनची टिप्पणी

निर्बंध तातडीने हटवण्याची मागणी

मुंबईत CJP आंदोलकांची धरपकड

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात सुरू असलेल्या कॉकरोच जनता पार्टीचे आंदोलन दिल्लीमध्ये सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये तरुणांनी आंदोलन सुरू केले. मात्र पोलिसांना त्यांना ताब्यात घेतले आहे.

भाजप प्रदेश कार्यालयाबाहेर निषेध आंदोलनाचे आयोजन

काँग्रेस खासदार बिमोल अकोईजाम यांच्याविरोधातील ११ विद्यार्थिनींच्या लैंगिक छळाच्या तक्रारींच्या निष्पक्ष चौकशीची मागणी

संबंधित प्रकरणात न्याय मिळावा, अशी भाजप महिला मोर्चाची मागणी

काँग्रेस नेतृत्वासह राहुल गांधी यांनीही या प्रकरणावर भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी

भिवंडीत कलर पॉलिशच्या कंपनीत स्फोट; चार कामगार भाजले, दोन जण गंभीर जखमी 

भिवंडी तालुक्यातील सोनाळे गावाच्या हद्दीतील लक्ष्मी कंपाऊंड येथील कलर पॉलिश करणाऱ्या कंपनीत अचानक स्फोट होऊन आग लागली. या दुर्घटनेत शहाजहान शेख, विनय कुमार वर्मा, नंदकिशोर यादव आणि नितीन कुमार हे चार कामगार भाजून जखमी झाले असून, त्यापैकी दोघे गंभीररीत्या भाजले आहेत. जखमींना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

वकिलांच्या सुटकेचे सरन्यायाधीशांचे आदेश

जंतर मंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनात वकिलांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतले होते. याच पार्श्वभूमीवर सरन्यायाधीशांनी पोलिसांना वकिलांना सोडण्याचे आदेश दिले आहेत.

CJP चे अध्यक्ष अभिजीत दिपके यांच्या आजीच्या अंत्यविधीची तयारी सुरु 

CJP चे अध्यक्ष अभिजीत दिपके यांच्या आजीचं दीर्घ आजाराने निधन झालं आहे. नातू दिल्लीमध्ये आंदोलनात सहभागी असताना आजी सावित्रीबाई दिपके यांनी आज सकाळी राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला आहे. सायंकाळी दिपके यांच्या आजीवर अंतिम संस्कार पार पडणार आहेत.

ममता बॅनर्जी दिल्ली पोलिसांच्या ताब्यात 

ममता बॅनर्जी यांनाही CJP च्या आंदोलनातून ताब्यात घेतलं आहे. दिल्ली पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं आहे. जंतर मंतरवर आंदोलनाचे लोंढें, एकूण 1500 आंदोलक डिटेन करण्यात आलेत.

CJP आंदोलकांना घेऊन जाणाऱ्या बसवर दगडफेक 

दिल्ला पोलिसांच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, झंडेवालन परिसरामध्ये ताब्यात घेतलेल्या आंदोलकांना घेऊन जाणाऱ्या पोलीस बसवर दगडफेक करण्यात आली आहे.

SIR विरोधात सोलापुरात युवा महासंघाचा एल्गार; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन

सोलापुरात SIR प्रक्रिया रद्द करण्याच्या मागणीसाठी युवा महासंघाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र धरणे आंदोलन करत मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन केले. १३ कोटी नागरिकांची नावे मतदार यादीतून वगळल्याचा आरोप करत पात्र मतदारांची नावे पुन्हा समाविष्ट करण्याची मागणी संघटनेने केली. मतदार यादीच्या पुनरावलोकनासाठी किमान दोन महिन्यांची मुदत देण्यासह निवडणूक आयोगाची स्वायत्तता आणि विश्वासार्हता पुनर्स्थापित करण्याची मागणी करण्यात आली.

मतदार यादीतून ८० हजार नावे वगळल्याचा आरोप; वरुण सरदेसाईंकडून मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याची मागणी 

अभिजीत दिपके आणि त्यांच्या सहकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याच्या प्रकाराचा आमदार वरुण सरदेसाई यांनी निषेध केला. लोकशाहीत सरकारविरोधात आंदोलन करणे हा नागरिकांचा मूलभूत अधिकार असल्याचे त्यांनी म्हटले. वांद्रे पूर्व मतदारसंघातील ८० हजारांहून अधिक मतदारांची नावे वगळल्याचा आणि ‘एसआयआर’ प्रक्रियेद्वारे मतचोरी होत असल्याचा आरोप सरदेसाई यांनी केला. या प्रकरणाची जबाबदारी निश्चित करून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली.

नांदेडमध्ये भाजपच्या साडी वाटप कार्यक्रमात गोंधळ; साड्यांसाठी महिलांची झटापट 

नांदेडमध्ये शहर भाजपच्या वतीने आयोजित अंगणवाडी सेविका सन्मान कार्यक्रमात साडी वाटपादरम्यान मोठा गोंधळ उडाला. सेवा संकल्प अभियानांतर्गत आमदार अमर राजूरकर यांच्या वतीने कुसुम सभागृहात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. साड्या कमी आणि महिलांची संख्या जास्त असल्याने साड्या मिळवण्यासाठी महिलांमध्ये चढाओढ झाली, तर काही महिलांनी एकमेकींच्या हातातून साड्या हिसकावून घेतल्या.

माजलगावात युवा शेतकरी संघर्ष समिती आक्रमक; खासदार बजरंग सोनवणे यांची गाडी अडवली 

माजलगावात ऊसदराच्या मागणीसाठी युवा शेतकरी संघर्ष समिती आक्रमक झाली असून खासदार बजरंग सोनवणे यांची गाडी अडवण्यात आली. गतवर्षीच्या ऊस बिलातील थकीत २०० रुपये आणि चालू हंगामासाठी ४,२५० रुपये प्रतिटन दर देण्याची मागणी आंदोलकांनी केली. यावेळी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी तब्बल अर्धा तास रस्त्यावर बसून जोरदार घोषणाबाजी केली. यावर खासदार बजरंग सोनवणे यांनी गतवर्षीचे २०० रुपये मिळवून देण्यासाठी आणि चालू हंगामात जास्तीत जास्त ऊसदर मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.

नागपुरात राहुल गांधीना सद्बुद्धी मिळावी यासाठी भाजप युवा मोर्चाकडून अनोखे आंदोलन.

- नागपुरात राहुल गांधीना सद्बुद्धी मिळावी यासाठी भाजप युवा मोर्चा कडून अनोखे आंदोलन.

- राहुल गांधी यांना पितृदोष असल्याने त्यांची मानसिक विकृती झाली..ते राष्ट्रविरोधी कृत्यांमध्ये सक्रिय असल्याचा आरोप करत करण्यात आले आंदोलन.

Abhijeet Dipke : अभिजित दीपिकेंच्या आजीचं निधन

अभिजित दीपिकेंच्या आजीचं निधन

दीर्घ आजाराने अभिजीत दिपके यांच्या आजीचे निधन.

हिंगोलीच्या संतुक पिंपरी येथे मुळगावी अभिजीत दीपके यांच्या आजीने घेतला अखेरचा श्वास.

दिपके याचं दिल्लीत आंदोलन सुरू असताना आजीचे आजाराने निधन

सुप्रीम कोर्टाच्या वकिलांना पोलिसांनी घेतलं ताब्यात

सुप्रीम कोर्टाच्या वकिलांना पोलिसांनी घेतलं ताब्यात

आंदोलनासाठी जात असताना पोलिसांनी केली कारवाई

Delhi Protest : दिल्लीत आंदोलनस्थळी पत्रकारांना ताब्यात घेतलं

Tushar Gandhi Arrest : महात्मा गांधीजींचे नातू तुषार गांधी यांना पोलिसांनी ताब्यात घेतले

महात्मा गांधीजींचे नातू तुषार गांधी यांना पोलिसांनी ताब्यात घेतले

वांद्रे नॅशनल कॉलेज परिसरातून तुषार गांधींना घेतले ताब्यात

सुरुवातीला त्यांना वांद्रे पोलीस ठाणे त्यानंतर सांताक्रुज जुहू अशा पोलीस ठाण्यांमध्ये फिरवण्यात आले

अभिजीत दिपके यांच्या घरावर पोलिसांचा बंदोबस्त वाढवला

अभिजीत दिपके यांच्या घरावर पोलिसांचा बंदोबस्त वाढवला

खासदार जॉन यांना पोलिसांनी अडवलं

कम्युनिस्ट पार्टीचे खासदार जॉन यांना पोलिसांनी अडवलं

त्यांचे निवासस्थान या ठिकाणी आहे.

हे शहर अमित शहांचं नाही हे शहर सर्वांचं आहे त्यामुळे ते अशा पद्धतीने आडु शकत नाहीत माझ्या घरी येऊनही पोलिसांनी चौकशी केली आहे.

मुंबई पोलिसांकडून तुषार गांधी यांना ताब्यात घेण्यात आले

Abhijeet Dipke Arrest : अभिजित दिपके पोलिसांच्या ताब्यात

अभिजित दिपके पोलिसांच्या ताब्यात

सौरव दास आणि आशुतोष रांका यांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतले

पोलिसांनी विमानात घुसून दीपकेंना ताब्यात घेतलं

CJP Abhijeet Dipke Protest : अभिजित दिपके दिल्ली विमानतळावर दाखल

अभिजित दिपके दिल्ली विमानतळावर दाखल

दिल्लीत ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी CJP चे आंदोलन सुरु आहे

या आंदोलनाला पोलिसांची परवानगी नाही

अभिजित दिपके यांना पोलीस ताब्यात घेण्याची शक्यता

लोखंडी गर्डर घेऊन जाणाऱ्या ट्रेलरचा विचित्र अपघात

लोखंडी गर्डर घेऊन जाणाऱ्या ट्रेलरचा विचित्र अपघात

लोखंडी गर्डर थेट केबिनच्या आरपार घुसले.

Dhruv Rathi : ध्रुव राठीला पोलिसांनी घेतले ताब्यात

दिल्लीत ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी CJP चे आंदोलन सुरु आहे

या आंदोलनाला पोलिसांची परवानगी नाही

आतापर्यंत २०० आंदोलकांना ताब्यात घेतले असून आता युट्युबर ध्रुव राठीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे

दिल्ली विमानतळावर CJP समर्थक दाखल व्हायला सुरुवात

दिल्ली विमानतळावर CJP समर्थक दाखल व्हायला सुरुवात झाली आहे.

अभिजीत दीपके थोड्याच वेळात दाखल होणार आहे.

मात्र विमानतळापासून ते जंतर मंतर पर्यंत पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे.

मात्र आम्ही Gen z आहोत मागे हटणार नाही अशी प्रतिक्रिया तरुणीने दिली आहे

धाराशिवच्या करजखेडा येथे केंद्रीय पथक दुष्काळ पाहण्यासाठी दाखल

धाराशिवच्या करजखेडा येथे केंद्रीय पथक दुष्काळ पाहण्यासाठी दाखल

करजखेडा येथील करपलेल्या सोयाबीन पिकाची, आणि पाण्याअभावी वाळत असलेल्या उसाची केली पाहणी

करजखेडा येथील प्रकल्पाची पाहणी करत पाणी परिस्थितीचा घेतला आढावा

दिल्ली मेट्रो बंद ठेवणे पडले महागात! सर्वोच्च न्यायालयात थेट गृहसचिव आणि पोलीस आयुक्तांवर अवमान याचिका दाखल 

राष्ट्रीय राजधानी दिल्लीमध्ये सुरक्षेच्या कारणास्तव अनेक मेट्रो स्थानके आणि रेल्वे गाड्या अनावश्यकपणे बंद ठेवण्यात आल्यामुळे आता मोठा कायदेशीर वाद निर्माण झाला आहे. याप्रकरणी थेट सर्वोच्च न्यायालयात अवमान याचिका (Contempt Petition) दाखल करण्यात आली असून, प्रशासनाच्या मनमानी कारभारावर गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत.

नागरिकांची वाहतूक सेवा पूर्णपणे बंद करू नयेत, याबाबत यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट निर्देश दिले होते. मात्र, या निर्देशांचे जाणीवपूर्वक उल्लंघन करण्यात आल्याचा दावा याचिकेत करण्यात आला आहे.

दिल्लीत आंदोलकांवर पोलिसांची मोठी कारवाई! संसद मार्ग परिसरातून अनेकांना घेतले ताब्यात; राजधानीत तणाव वाढला!

राजधानी दिल्लीत 'कॉकरीच जनता पार्टी' (CJP) च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर वातावरण कमालीचे तापले आहे. आंदोलनाला प्रशासनाकडून परवानगी नाकारण्यात आलेली असतानाही, आंदोलनस्थळी जमण्याचा प्रयत्न करणाऱ्या काही आंदोलकांना दिल्ली पोलिसांनी संसद मार्ग परिसरातून ताब्यात घेतले (Detain) आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आज होणाऱ्या आंदोलनासाठी संसद मार्ग आणि जंतर-मंतर परिसराकडे निघणाऱ्या CJP च्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी तत्काळ रोखले. पोलिसांनी घालून दिलेल्या नियमांचे आणि आदेशांचे उल्लंघन करून पुढे जाणाऱ्या आंदोलकांना ताब्यात घेऊन पोलीस व्हॅनमधून हलवण्यात आले आहे.

न्यायालयाच्या निर्देशांचे पालन करा, एम पी एस सी आंदोलक विद्यार्थ्यांना याचिकाकर्ते यांची नोटीस

मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकाकर्ते यांची पुण्यातील आंदोलनांच्या आयोजकांना नोटीस

पुण्यातील एस एम जोशी पूल आणि शास्त्री रोड वर सुरू असलेल्या दोन्ही आंदोलनाच्या आयोजकांना नोटीस

आंदोलन अजूनही करायचं असेल तर अन्य जागा पाहून परवानगी घेणे, उच्च न्यायालयाचे आंदोलकांना आदेश

अकोल्यात अवैध सावकारप्रकरणी एपीएमसीसह 28 ठिकाणी छापे; संचालकही चाैकशीच्या फेऱ्यात

दुष्काळी परिस्थितीतही शेतकऱ्यांना लुबाडणाऱ्यांना मोठा दणका; सुनावणी, सखाेल चाैकशीनंतर हाेणार कठोर कारवाई आणि फाैजदारी कारवाई; 11 जणांच्या तक्रारीनंतर राबवले होते धाडसत्र.. तब्बल 204 अधिकारी आणि कर्मचारी एकत्रित झाली कार्यवाही.

एकीडक दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकऱ्यांसह सामान्य नागरिकही चिंतेत असतानाच गरजूंना लुटणाऱ्या अवैध सावकारांच्या सहकार विभागाकडून मुसक्या आवळण्यात येत आहे. गैरअर्जदारांविरुद्ध 28 ठिकाणी धाडी अकोल्यात टाकण्यात आल्या. धाडीत इसारपावती, काेरे चेक, काेरे बाँडसह अन्य दस्तावेज जप्त करण्यात आले. शेतकऱ्यांच्या हितासाठी स्थापन केलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्येही (एपीएमसी) दाेन ठिकाणी धाडसत्र राबवण्यात आले.. एका संचालकांसह एक अडत्याही चाैकशीच्या फेऱ्यात सापडला आहे.

Maharashtra News Live Update: जंतर-मंतरवर सीजीपीचं आंदोलन, दिल्ली पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड

दिल्लीत हाय-वोल्टेज ड्रामा! CJP च्या आंदोलनापूर्वी ड्रोनची नजर; राजधानीत कडेकोट सुरक्षा व्यवस्था

राष्ट्रीय राजधानी दिल्लीत आज CJP च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण शहरात अभूतपूर्व सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आणि विविध मुद्द्यांवर होणार्या या आंदोलनाला रोखण्यासाठी प्रशासनाने अक्षरशः छावणीचे स्वरूप धारण केले आहे.

जनपथ आणि हॉटेल ली मेरिडियन परिसरासभोवतालच्या गोलचक्रावर सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी आणि प्रत्येक हालचालीवर बारीक लक्ष ठेवण्यासाठी आता थेट ड्रोनचा वापर केला जात आहे. आंदोलनाच्या अनुषंगाने कायदा व सुव्यवस्था बिघडू नये म्हणून दिल्ली पोलिसांनी आकाशातून ड्रोनच्या माध्यमातून कडक टेहळणी सुरू केली आहे.

दिल्लीत तणाव! CJPच्या आंदोलनापूर्वी राजधानीत कडक सुरक्षा; जनपथ आणि संसद मार्ग परिसरात पोलिसांचा पहारा

आज 'CJP' (Citizens for Justice and Peace) च्या नियोजित विरोध प्रदर्शन आणि आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय राजधानी दिल्लीतील सुरक्षा व्यवस्था अत्यंत कडक करण्यात आली आहे.

सध्या जनपथ, ली मेरिडियन हॉटेल परिसर आणि संसद मार्ग पोलीस स्टेशन क्षेत्रातील दृश्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात असल्याचे दिसून येत आहे. आंदोलनाच्या अनुषंगाने कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी आणि कोणतीही अनपेक्षित परिस्थिती टाळता यावी, यासाठी दिल्ली पोलिसांकडून संवेदनशील भागांमध्ये कडेकोट सुरक्षा चक्र तयार करण्यात आले आहे.

अजित पवार गटाकडून पैसे वाटप केल्याचा आरोप

सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये अजित पवार गटाकडून पैसे वाटप केल्याचा आरोप केला जातोय. माळेगाव नगरपंचायतीचे नगराध्यक्ष यांच्या गाडीत वीस लाख रुपये सापडल्याचा आरोप पुरुषोत्तम जगताप यांच्या कार्यकर्त्यांनी केलाय. मध्यरात्री सभासदांना पैसे वाटप करण्यात येत असल्याचा आरोप आहे. या संदर्भात सकाळी 11 वाजता पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे. सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याची निवडणूक प्रतिष्ठेची बनली असून उद्या 21 जागांसाठी मतदान पार पाडणार आहे. त्याआधी पैसे वाटप केले जात असल्याचा आरोप केला जातोय.

रत्नागिरी शहरात आता दर सोमवारी पाणी कपात...

महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थिती आणि तीव्र उष्णतेमुळे होणारे पाण्याचे बाष्पीभवन विचारात घेता, रत्नागिरी शहरातील पाणीसाठा आगामी एप्रिल-मे महिन्यांपर्यंत पुरवण्यासाठी रत्नागिरी नगरपरिषदेने आतापासूनच नियोजन सुरू केले आहे. शासनाच्या १० टक्के पाणीकपातीच्या निर्देशानुसार शहरात दर सोमवारी संपूर्ण पाणीपुरवठा बंद करण्यात येणार आहे. तसेच दैनंदिन पाणीपुरवठ्याच्या वेळेत १५ मिनिटांची कपात करण्याचा निर्णय घेण्यात येत असालीची माहिती पत्रकार परिषदेत दिली.

अभिजीत दिपके दिल्लीकडे रवाना

दिल्ली येथील जंतर मंतरवर होणाऱ्या कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनासाठी संस्थापक अध्यक्ष अभिजीत दिपके हे आज दिल्लीला जाणार आहेत. सकाळी आठ वाजता एअर इंडियाच्या विमानाने ते दिल्लीसाठी रवाना होतील. काही वेळापूर्वीच अभिजीत दिपके यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत ऑन द वे टू एअरपोर्ट अस मेसेज टाकून आपण दिल्लीला जाण्यावर ठाम असल्याचे स्पष्ट केले आहे.मात्र इतर नेत्यांप्रमाणे पोलिस अभिजित दीपके यांना मुंबईतच डिटेन करणार का हे पाहावं लागेल.

नवरात्रोत्सवानिमित्त पुणे शहरातील वाहतूक बदल

श्री तांबडी जोगेश्वरी मंदिर, श्री चतु:शृंगी मंदिर, भवानी पेठेतील श्री भवानी माता मंदिर, सारसबाग येथील श्री महालक्ष्मी मंदिर परिसर या भागातील रस्ते वाहतुकीस बंद

यामध्‍ये उद्यापासून अप्पा बळवंत चौक ते बुधवार चौकापर्यंतचा (हुतात्मा चौक) रस्ता वाहतुकीस बंद करण्यात येणार

बुधवार चौक ते अप्पा बळवंत चौक दरम्यान एकेरी वाहतूक सुरू राहणार आहे

जंतर-मंतरवर सीजीपीचं आंदोलन, दिल्लीतील इंटरनेट सेवा बंद

दिल्लीतील जंतर-मंतरवर सीजीपीचं आंदोलन होत आहे. याच पार्श्वभूमीवर इंटरनेट सेवा बंद करण्यात आलेली आहे. पोलिसांचा मोठा बंदोबस्त या ठिकाणी पाहायला मिळतोय.. मेट्रो सेवा बंद असल्याने मेट्रो सेवा बंद असल्याने आंदोलन जंतर-मंतरवर कसे पोहोचतात हे पहावं लागणार आहे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Diwali Biscuits Recipe : दिवाळी फराळात यंदा काहीतरी हटके! घरीच बनवा बाजारासारखे कुरकुरीत बिस्किट्स, सोपी रेसिपी ट्राय करा

Maharashtra News Live Update: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे नाशिकच्या ओझर विमानतळावर आगमन

Gold Rate Today: दिवाळीपूर्वी सोन्याच्या दरात मोठी घसरण, १० तोळा ३३,८०० रुपयांनी स्वस्त; वाचा १८- २२ आणि २४ कॅरेट सोन्याचे दर

Vastu Tips: घरात दरवाजाच्या मागे कपडे लटकवणं शुभ की अशुभ? वाचा वास्तूशास्त्राचा नियम नेमकं काय सांगतो

Ladki Bahin Yojana: ऑक्टोबर संपला लाडक्या बहिणींना ₹1500 कधी मिळणार? महत्वाची अपडेट समोर

SCROLL FOR NEXT