- रणजीत माजगावकर
कोल्हापुरातील मार्केट यार्ड, बापट कॅम्प परिसरातील नागरिकांनी आज (बुधवार) पाण्यासाठी कोल्हापुरात प्रवेशद्वार रोखून धरला. या रास्ता राेकाे आंदाेलनामुळे रस्त्याच्या दाेन्ही बाजूची वाहतुक खाेळंबली. यामुळे वाहनांच्या मोठ्या रांगा देखील लागल्या होत्या. (Maharashtra News)
गेल्या काही दिवसांपासून कोल्हापुरातील मार्केट यार्ड, बापट कॅम्प परिसरात सुरळीत पाणीपुरवठा हाेत नसल्याच्या कारणास्तव नागरिक आज रस्त्यावर आले. यावेळी नागरिकांनी रास्ता राेकाे केला. संतप्त नागरिकांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरत पाणीपुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली.
हे आंदाेलन सुरु असतानाच शाहूपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अजय कुमार सिंदकर हे कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी नागरिकांना बाजूला करण्याचा प्रयत्न केला. मात्र संतप्त नागरिकांनी ठिय्या मारण्याचा पवित्रा घेतला.
(साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
महापालिकेचे अधिकाऱ्यांनी तात्काळ याबाबतची बैठक बोलावून पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन नागरिकांना दिले. यानंतर पोलीस निरीक्षक सिंदकर यांनी नागरिकांना रस्त्यावरून बाजूला होण्याचं आवाहन केलं.
दरम्यान अचानक या परिसरातील नागरिकांनी रस्त्यावर ठाण मांडल्याने दोन्ही बाजूला वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. त्यामुळे वाहतुकीची मोठी कोंडी निर्माण झाली.
Edited By : Siddharth Latkar