Ratnagiri Political News : लोकांसमोर बोलते व्हा, बेडूक घोषणा करू नका : खासदार विनायक राऊतांचे नारायण राणेंना आव्हान

खासदार विनायक राऊत म्हणाले घोषणा करण्याचे दिवस आता संपले. नारायण राणेंनी राहिलेले दिवस आनंदाने उपभोगावेत आणि राजकीय संन्यास घ्यावा.
mp vinayak raut criticizes bjp leader narayan rane on barsu refinery project
mp vinayak raut criticizes bjp leader narayan rane on barsu refinery projectsaam tv
Published On

Ratnagiri News :

मनाेज जरांगे पाटील (manoj jarange patil) यांनी मराठा आरक्षणाचा (maratha reservation) लढा म्यान करू नये असे आवाहन खासदार विनायक राऊत (mp vinayak raut) यांनी केले आहे. दरम्यान बारसू रिफायनरी प्रकल्पावरुन (barsu refinery project) खासदार राऊत यांनी लोकांसमोर बोलते व्हा, बेडूक घोषणा करू नका असा टाेला केंद्रीय मंत्री नारायण राणे (narayan rane) यांना लगावाला आहे. (Maharashtra News)

खासदार राऊत म्हणाले ओबीसी आणि मराठा या दोन समाजामध्ये सरकार तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (cm eknath shinde) यांनी जरांगे पाटील यांना दिलेला अध्यादेश अर्धवट असून दिलेला अध्यादेश परिपूर्ण नाही.

भुजबळांची भूमिका एक षडयंत्र

जरांगे पाटील यांना मुंबईत येण्यापासून थांबवण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फसवणूक केली आहे. ओबीसी आणि मराठा समाजाने सरकार पासून सावध राहायला पाहिजे. भुजबळ जी भूमिका घेत आहेत त्यामागे षडयंत्र असल्याचे खासदार राऊत यांनी म्हटलं.

mp vinayak raut criticizes bjp leader narayan rane on barsu refinery project
APMC Market Vashi : 'वेंगुर्ले हापूस' मुंबईकरांच्या पसंतीस उतरेल : आंबा बागायतदारांना विश्वास

छगन भुजबळ स्वतंत्र पक्ष काढतील

राऊत म्हणाले भुजबळ सुद्धा थोडे दिवसांमध्ये अजित पवार गटातून दूर होतील. छगन भुजबळ कदाचित स्वतंत्र पक्ष देखील स्थापन करू शकतील. शिंदे गट आणि अजित पवार गट एकत्र नांदणे शक्य नाही. काही दिवसांमध्ये दोन्ही पक्षाची छकलं होतील.

दरम्यान एका प्रश्नावर बाेलताना खासदार राऊत यांनी नारायण राणे हा अतृप्त असलेला आत्मा असल्याचे म्हटले. त्याच्या घरात जायचं त्याचं ओरबडून खायचं आणि ढेकर द्यायला दुसऱ्याच्या घरात जायचं अशी त्यांची सवय असल्याचे राऊत यांनी नमूद केले.

नारायण राणे यांना रिफायनरीच्या दलालांची काळजी असल्याचे सांगत खासदार राऊत यांनी नारायण राणेंनी हिम्मत असेल तर जोपर्यंत केंद्रीय मंत्री आहात तोपर्यंत बारसू मध्ये येऊन दाखवावे असे आव्हान दिले.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

लोकांसमोर बोलते व्हा, बेडूक घोषणा करू नका, घोषणा करण्याचे दिवस आता संपले आहेत राहिलेले दिवस आनंदाने उपभोगा आणि राजकीय संन्यास घ्या असेही राऊत यांनी म्हटलं.

Edited By : Siddharth Latkar

mp vinayak raut criticizes bjp leader narayan rane on barsu refinery project
Congress चे फेब्रुवारीत लाेणावळामध्ये चिंतन शिबीर, राहूल गांधी करणार मार्गदर्शन

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com