Corona Update
Corona Update Saam TV
महाराष्ट्र

Corona Update: कोरोना येण्याच्या भीतीने नागरिकांना 'लसी'ची आठवण; मात्र या 'लसीं'चा साठा संपला

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

दीपक क्षिरसागर

Latur Corona Update: चीनसह इतर देशांत कोरोनाचा पुन्हा उद्रेक झाल्यामुळे भारतात सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत. आरोग्य विभागानेही सामाजिक अंतर पाळत लसीकरण करुन घेण्याचे आवाहन केले आहे. कोरोना पुन्हा येणार असल्याची धडकी सर्वसामान्यांना बसल्याने आपले लसीकरण झाले आहे का, नसेल तर लस घ्यावी लागेल. लातूर लसीकरणाबाबत जिल्हा आरोग्य विभागाशी संपर्क साधला असता जिल्ह्यात पहिला डोस ७८ टक्के, दुसरा ६३ टक्के तर प्रिकॉशन डोस २३ टक्के नागरिकांनी घेतला आहे. (Latest Latur Corona Update)

दरम्यान, जिल्ह्यात कोविशील्ड आणि कॉर्बोव्हॅक्सच्या लसीचा साठा शिल्लक नाही. फक्त कोव्हॅक्सीन लसीचे २६ हजार डोस शिल्लक आहेत. कोविशील्ड आणि कॉर्बोव्हॅक्स लसीची मागणी राज्याच्या आरोग्य विभागाकडे केली असल्याची माहिती जिल्ह्याचे लसीकरण अधिकारी डॉ. बालाजी वरुरे आणि डॉ. सतीश हरिदास यांनी दिली. लातूर (Latur) जिल्ह्यात लसीचा पहिला डोस ७८ टक्के नागरिकांनी घेतला आहे. दुसरा डोस ६३ टक्के नागरिकांनी तर प्रिकॉशन डोस २३ टक्के नागरिकांनी घेतला आहे. दूसरा आणि प्रिकॉशन डोस न घेणाऱ्यांची संख्या मोठी आहे. तसेच कोरोनाचा (Corona) संभाव्य धोका लक्षात घेता लसीकरण होणे आवश्क असल्याचे त्यांनी म्हटले.

यासह संभाव्य कोरोना विषाणूच्या उद्रेकामुळे खाजगी व शासकीय रुग्णालये सज्ज ठेवण्याचे आदेश शनिवारी व्हीसीद्वारे जिल्हास्तरावरील आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आले. याशिवाय रूग्णालयांतील उपलब्ध साधनसामग्रीचा तपशील तात्काळ ऑनलाईन जिल्हा परिषदेकडे सादर करून तो पाठविण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

तसेच दुसरा आणि बुस्टर डोस न घेतलेल्या नागरिकांना तात्काळ डोस देण्याची कार्यवाही हाती घ्यावी. डेडीकेटेड कोविड हेल्थ सेंटर (डीसीएच) सर्व रुग्णालयात सज्ज ठेवण्यासह त्या रूग्णालयात असलेला ऑक्सिजन, औषध गोळ्या, बेड, स्टाफ याची माहिती भरून पाठविण्यास सूचविले आहे. काही साधनसामग्री उपलब्ध नसेल तर त्याची तात्काळ मागणी नोंदवून हस्तगत करा. तसेच काही अडचणी असतील तर त्या त्यावर त्वरित तोडगा काढून येणाऱ्या संकटावर मात करता येईल. आता पूर्वीसारखेच कोरोनाचे नियम पाळून संपर्क ठेवण्याची आचारसंहितेचा अंमलात आणावी लागणार आहे. ते वाढवून संशयित रुग्णांनांची टेस्ट कोणत्याही परिस्थितीत झाली पाहिजे, यावर आरोग्य विभागाने भर द्यावा. असे या बैठकीत सांगण्यात आले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Namrata Sambherao : नम्रता संभेरावचा खास लूक पाहिलात का ?

Samay Shah Interview : 'ते डिप्रेशनमध्ये नव्हते, त्यांना...'; गुरुचरण सिंह बेपत्ता झाल्यानंतर ऑनस्क्रिन मुलाचा मोठा खुलासा

Amit Shah Criticized On Congress: ओबीसींच्या आरक्षणात कॉंग्रेसची बाधा; अमित शहांचा गंभीर आरोप

Dhule Constituency : धुळ्यातील काँग्रेसच्या नाराजीनाट्यावर अखेर पडला पडदा, जिल्हाध्यक्ष शामकांत सनेरांमुळे शाेभा बच्छाव यांची वाढली ताकद

T20 World Cup 2024: टीम इंडियाबाबत मोठी बातमी! हार्दिक पंड्याऐवजी या खेळाडूला मिळू शकते संधी

SCROLL FOR NEXT