सिगारेट्स आणि नायलॉन मांजा जप्त: नागपूर पोलिसांची मोठी कारवाई मंगेश मोहिते
महाराष्ट्र

सिगारेट्स आणि नायलॉन मांजा जप्त: नागपूर पोलिसांची मोठी कारवाई

नागपूरच्या लकडगंज पोलिसांनी एक मोठी कारवाई करत बनावट सिगारेट्स आणि नायलॉन मांजा जप्त केला

मंगेश मोहिते

नागपूर : नागपूरच्या लकडगंज पोलिसांनी एक मोठी कारवाई करत बनावट सिगारेट्स आणि नायलॉन मांजा जप्त केला आहे. हा सगळा माल अवैधरित्या विक्रीसाठी नागपुरात ट्रान्सपोर्टच्या माध्यमातून आणण्यात आला होता. या प्रकरणी पोलिसांनी 17 लाखाच्या मुद्देमाल सोबत एजेंटला अटक केली तर दिल्लीच्या ट्रान्स्पोर्टर वर देखील गुन्हा दाखल केला आहे.

हे देखील पहा-

नागपुरामध्ये (Nagpur) अवैध मार्गाने बनावट सिगारेट (Cigarettes) आणि बंदी असलेला घातक असा नायलॉन मांजा (nylon Manja) ट्रान्सपोर्टच्या माध्यमातून येत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना (Police) मिळाली होती. पोलिसांनी यावर पाळत ठेवली असता एक ट्रक संशयास्पद अवस्थेत दिसला. पोलिसांनी ट्रकची पाहणी केली असता त्यात १३० मांजाच्या चक्री आढळल्या पोलिसांनी त्या जप्त केल्या. सोबतच २०० सिगारेटसचे पाकिट देखील जप्त करण्यात आले आहेत.

या सिगारेटस् ची किंमत ६ लाख, ५० हजार रुपये आहे. विशेष म्हणजे, सिगारेटसच्या पाकिटवर कोणत्याही प्रकारचा वैधानिक इशारा लिहिलेला नाही. पोलिसांनी हा ७ लाख, १५ हजारांचा मुद्देमाल तसेच १० लाख, ५० हजारांचा ट्रक असा एकूण १७ लाख, ६५ हजारांचा मुद्देमाल जप्त अरण्यात आला आहे. नागपुरात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात नायलॉन मांजावर कारवाई सुरू आहे. मात्र या कारवाईत सिगारेट सुद्धा मिळून आल्याने या अवैध धंद्यांचे तार नेमके कुठपर्यंत पोहचले आहे याचा शोध पोलीस करत आहेत.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

3 Gram Mangalsutra For Women: महिलांसाठी 3 ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र, रोज घालण्यासाठी एकदम बेस्ट

सुप्रीम कोर्टात पोहोचला मुख्य निवडणूक आयुक्तांचा वाद; ज्ञानेश कुमारांच्या विरोधातील याचिकेवर होणार सुनावणी

Kothimbir Vadi Recipe: जेवणासोबत खाण्यासाठी बनवा कुरकुरीत आणि चविष्ट कोथिंबीर वडी, वाचा सोपी रेसिपी

Walking 10,000 Steps Daily Benefits: सलग ३० दिवस रोज १०,००० पावले चालल्यास शरीरात काय बदल होईल?

विहिरीत पाणी नाही, चक्क पेट्रोल! सांगलीत खळबळ

SCROLL FOR NEXT