chitra wagh protest in karad aganist sandeshkhali incident criticizes mamata banerjee saam tv
महाराष्ट्र

Chitra Wagh : संजय राठाेड यांच्यावर उद्धव ठाकरेंचीच कृपा : चित्रा वाघ

Sandeshkhali : पश्चिम बंगालच्या आमच्या भगिनींना न्याय मिळाल्या शिवाय आम्ही शांत बसणार नाही असा इशारा भाजप प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी ममता बनॅर्जींना दिला.

संभाजी थोरात

Karad :

पूजा चव्हाण प्रकरणातील (pooja chavan case) मंत्री संजय राठोड (sanjay rathod) यांना ज्या काही गोष्टी मिळत आहेत, त्या केवळ उद्धव ठाकरेंमुळे (uddhav thackeray) मिळतात. राठाेड यांना मिळालेले मंत्रीपद किंवा आगामी लोकसभा (तिकिट (loksabha election 2024) हे उध्दव ठाकरेंनी दिलेल्या क्लिनचीट मुळेच मिळत असल्याचा आरोप भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ (chitra wagh) यांनी आज (शुक्रवार) कराड (karad) येथे माध्यमांशी बाेलताना व्यक्त केले. (Maharashtra News)

संदेशखालीतल्या महिला अत्याचाराच्या निषेधार्थ आज कराड येथे भाजपा महिला मोर्चाच्यावतीने निदर्शन करण्यात आले. या आंदोलनात चित्रा वाघ सहभागी झाल्या होत्या. त्या म्हणाल्या पश्चिम बंगालची भूमी महिलांसाठी चालता-बोलता नरक बनलीय. या राज्याच्या मुख्यमंत्रीपदी ममता बॅनर्जींसारखी (mamata banerjee) खुद्द एक महिला असतानाही इथल्या महिलांची प्रतिष्ठा आणि आत्मसन्मान दिवसाढवळ्या पायदळी तुडवला जातोय.

त्यांच्या तृणमूल काँग्रेसचे गुंडच या अत्याचारांमध्ये सामील आहेत. संदेशखालीतल्या महिलांवरील अत्याचारांच्या घटना तर फक्त हिमनगाचं टोक आहे. ममता बॅनर्जींनी तृणमूलच्या गुंडांना थांबवावे, महिलांवरील अत्याचारांची निःष्पक्षपणे व तातडीने चौकशीने करून अन्यायग्रस्तांना न्याय द्यायला हवाय. ५५ दिवस या नराधमाला ममता सरकारने दडवून ठेवले आहे असा आराेप वाघ यांनी केला.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: काका चुकांवर पांघरुण घालायचे, दादांना शरद पवारांची आठवण का आली

आय लव्ह मोहम्मद आणि आय लव्ह महादेव; देशभरात रंगलेला बॅनर वाद आणि त्यामागची खरी कारणे

Maharashtra Politics : शिंदे गटाच्या नेत्याच्या मुलाला मारण्यासाठी ४ कोटींची सुपारी; पोलिसांत गुन्हा दाखल, राजकीय वर्तुळात खळबळ

Ladki Bahin Yojana: सरकारी लाडकीला दणका, 15 कोटी वसूल करणार

Belly Fat: पोटाची चरबी वाढलीये? फॉलो करा 'या' सोप्या टिप्स, पोटाचा घेर होईल कमी

SCROLL FOR NEXT