Chiplun Vidhansabha Exit Poll NCP Sp vs NCP AP saam tv
महाराष्ट्र

Saam Exit Poll : अजित पवार की शरद पवार, चिपळूणमध्ये कौल कुणाला? एक्झिट पोल कुणाच्या बाजूने? VIDEO

Chiplun Vidhansabha Exit Poll : चिपळूण मतदारसंघात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये थेट लढत होत आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार शेखर निकम यांचे पारडे जड असल्याचा एक्झिट पोलचा अंदाज आहे.

Nandkumar Joshi

अमोल कलये, रत्नागिरी

रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात थेट लढत आहे. अजित पवार गटाकडून शेखर निकम यांना उमेदवारी दिली आहे. तर शरद पवार गटाकडून प्रशांत यादव यांना उमेदवारी दिली होती.

सकाळ समूहाच्या साम टीव्हीच्या एक्झिट पोलच्या अंदाजानुसार, शेखर निकम हे संभाव्य आमदार असू शकतात. तर प्रशांत यादव यांना पराभवाला सामोरे जावे लागू शकते.

रत्नागिरी जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघापैकी एकमेव जागा ही राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाली. चिपळूणमध्ये राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशीच झाली. प्रशांत यादव आणि शेखर निकम यांच्यात अत्यंत चुरशीची लढत पाहायला मिळाली. सहकार क्षेत्राच्या जोरावर यादव पहिल्यांदाच या मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. तर शेखर निकम पुन्हा नशीब आजमावत आहेत.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान झालं असून, २३ तारखेला मतमोजणी आहे. निकाल काय लागतो तो याच दिवशी स्पष्ट होईल. हा एक्झिट पोलचा प्राथमिक अंदाज आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: फलटण प्रकरणात तिसरा मोठा दणका जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची बदली

Central Railway Accident : मध्य रेल्वेवर भीषण अपघात; आंदोलनामुळे गर्दी, लोकलमधून पडून ३ प्रवाशांचा मृत्यू

Prajakta Mali Education: जुळून येती रेशीमगाठी फेम मेघना किती शिकलीये?

दोन सिलिंडरचा स्फोट आणि संपूर्ण इमारतीला आग; पाहा VIDEO

गरोदरपणात महिलांचं किती वजन वाढणं नॉर्मल?

SCROLL FOR NEXT