children or couple left home because of family disputes saam tv
महाराष्ट्र

मुलं पालकांना का सोडून जातात? 'या' कारणांमुळं ९० टक्के मुलं झाली बेपत्ता

'या' वयोगटातील मुलं आपल्या पालकांसोबत काही ना काही कारणावरून नाराज होतात.

साम टिव्ही ब्युरो

चेतन व्यास

वर्धा : १८ ते ३५ या वयोगटातील मुलं आपल्या पालकांसोबत काही ना काही कारणावरून नाराज होतात. छोट्या छोट्या गोष्टींवरून मुलं आणि पालकांमध्ये खटके उडतात. त्यामुळे क्षुल्लक कारणावरू मुलं रागाच्या भरात घर सोडून जातात. मुलांसोबतच घरातील इतर मंडळीही कौंटुबीक कलहामुळं घर सोडून बेपत्ता झाल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. या घटनांना पालकांचे मुलांवर रागावण्याचे कारण समोर आलं आहे.

तसंच प्रेम प्रकरणांना नकार दिल्यावरही अनेक तरुण-तरुणींनी घर सोडल्याचं धक्कादायक प्रकार उघडकीस आले आहेत. जानेवारी ते ऑगस्ट या कालावधीत जिल्ह्यात तब्बल ८१० जण बेपत्ता झाल्याची नोंद पोलिसांत करण्यात आली आहे.त्यापैकी ९० टक्के प्रकरणांत १८ ते ३५ वयोगटातील तरुण-तरुणी आहेत. ८१० बेपत्ता पैकी ६५९ बेपत्तांचा शोध घेण्यात आला असून अद्यापही १५१ प्रकरणातील बेपत्ता व्यक्तींचा शोध लागला नाही. (Children left house after disputes with parents)

सध्या तरुण वयातील मुला-मुलींना रागाने काही बोलल्यावर त्यांचा अवमान झाल्यासारखं त्यांना वाटतं. याचाच राग मनात धरून मुलांचं घर सोडण्याचं प्रमाण वाढलं आहे. कॉलेजमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना पालक अभ्यास करायला सांगतात. मुलांनी मोबाईल, दुचाकीची मागणी पालकांकडे केल्यावर ती पूर्ण न झाल्यास आई-वडिलांसोबत वाद करून मुलं घर सोडून जातात. तरुण वयात आलेल्या मुलांनी अशा क्षुल्लक कारणावरून घर न सोडता आपल्या घरच्यांची परिस्थितीत समजून घ्यायला हवी, असं आवाहन वर्धा पोलिसांकडून केलं जात आहे.

जिल्ह्यात मागील आठ महिन्यात ८१० जण बेपत्ता झाले आहे.यात ४८६ महिला तर ३२४ पुरुषांचा समावेश आहे.बेपत्ता झालेल्यामध्ये १८ ते ३५ वयोगटातील तरुणांचा मोठ्या प्रमाणात सहभाग आहे. ८१० बेपत्ता झालेल्या व्यक्तींपैकी पोलिसांनी ५६९ जणांचा शोध घेवून पोलिसांनी त्यांना पालकांकडे पाठवले आहे.

मात्र, अद्यापही १५१ बेपत्ता व्यक्तींचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. यामध्ये ९४ महिला तर ५७ पुरुषांचा समावेश आहे. यातील १२७ जण हे १८ ते ३५ वयोगटातील आहे. क्षुल्लक कारणावरून घरातून निघून जाणाऱ्यांमध्ये तरुणांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. तर ३५ वयोगटावरील नागरिक हे घरगुती कलहाने घर सोडत असल्याची माहिती आहे, अशी माहिती वर्ध्याचे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांनी दिली आहे.

Edited By - Naresh Shende

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nashik Railway Accident : नाशिकमध्ये मोठी दुर्घटना, धावत्या एक्सप्रेसमधून ३ जण पडले, दोघांचा मृत्यू, एक गंभीर

Surya gochar: दिवाळीपूर्वी सूर्य-मंगळाने बनवला खास राजयोग; 'या' राशींच्या घरी येईल लक्ष्मी, घराची भरभराटही होईल

Maharashtra Live News Update : निलेश गायवळ यावर आत्तापर्यंत १० गुन्हे दाखल

Maharashtra Rain Alert : दिवाळीवर पावसाचे सावट, पुढील काही दिवस राज्यात कोसळधारा, 'या' जिल्ह्यांना IMD नं दिला इशारा

Gulab Jamun Recipe : सणासुदीला खास बनवा रताळ्याचे गुलाबजाम, १० मिनिटांत खाण्यासाठी तयार

SCROLL FOR NEXT