Taluka Police Station, Jalna लक्ष्मण सोळुंके
महाराष्ट्र

चार कोटींच्या खंडणीसाठी मुलाचे अपहरण! जालन्यातील खळबळजनक घटना

चार कोटींच्या खंडणीसाठी १० विच्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याचे अपहरण करण्यात आल्याची खळबळजनक घटना घडली आहे.

लक्ष्मण सोळुंके

लक्ष्मण सोळुंके

जालना: चार कोटींच्या खंडणीसाठी १० विच्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याचे अपहरण करण्यात आल्याची खळबळजनक घटना घडली आहे. स्वयंम महावीर गादीया अस अपहरण झालेल्या विद्यार्थ्यांचे नाव असून मंठा चौफुली परिसरातील पोतदार शाळा परिक्षा सेंटर वरून वॅगनर क्र. (MH 20,CS,4956) कार मधून त्याचे अपहरण झाले आहे. या घटनेने जिल्ह्यात एकच खळबळ उडालीय.

शहरातील गोल्डन जुबली या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिक्षण घेणाऱ्या स्वयंमची संध्या परीक्षा सुरू असल्याने तो सकाळी पोतदार शाळा मंठा चौफुली परिक्षा सेंटरवर जाण्यासाठी त्याच्या घरातुन त्यांची वॅगनरमध्ये चालक अक्षय घाडगे यांच्या सोबत गेला, घाडगे हा त्याला सोडून घरी परत आला, त्या नंतर दुपारी 12.30 सुमारास अक्षय घाडगे याला स्वयंमला आणण्यासाठी गाडी घेऊन पाठवले असता तो परतला नसल्याने महावीर सुभाषचंद्र गादीया यांनी त्यांच्या मोबाईल वरुन चालक अक्षयला फोन केला असता तेव्हा समोरुन अनोळखी व्यक्तीने हिंदी भाषेमध्ये '4 करोड रुपये लेके अंबड चौफुली आजाव बच्चेको लेके जाओ' असे म्हणुन फोन कट केला.

हे देखील पहा-

स्वयंमचे वडील महावीर व नारायण रामभाऊ सुरासे दोघे अंबड चौफुली येथे गेले असता पुन्हा मोबाईलवर कॉल केला असता अबंड येथे या असे सांगण्यात आले. मुलाचे अपहरण झाल्याचे कळताच महावीर गादीया यांच्या भावाच्या तक्रारी वरून तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. या घटनेने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असून पोलिसांकडून जिल्हा भरात नाकाबंदी करण्यात आली असून आरोपीचा शोध पोलीस करत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhiwandi Police : भिवंडीत गांजा विक्री करणारे तिघे ताब्यात; ३७ लाखाचा गांजा जप्त

Kalyan News: कल्याण डोंबिवलीकरांना वाहतूक कोंडीतून दिलासा! पलावा पुल आजपासून नागरिकांसाठी सुरू|VIDEO

Sanjay Raut : हा माणूस महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात कसा राहू शकतो? शिंदेंच्या जय गुजरात घोषणेवर संजय राऊतांची तिखट प्रतिकिया

Ladki Bahin Yojana: लाडकी बहिण योजनेचे वर्षभरात एकूण किती मिळाले पैसे?

Uday Samant : 'मराठी शिकणारच नाही, ही एक मस्ती आहे'; उदय सामंतांची सुशील केडिया यांच्यावर संतापजनक प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT