Chikhaldara News , Youth Arrested , Police , Anil Bonde  saam tv
महाराष्ट्र

'ती माझ्याशी बोलत नव्हती म्हणून मी तिचा गळा आवळला'; २४ दिवसानंतर खूनाचा छडा, तिघे अटकेत

हत्येचा गुन्हा दडपणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यावर कारवाई करावी अशी मागणीही खासदार अनिल बोंडे यांनी केली.

साम न्यूज नेटवर्क

- अमर घटारे

Chikhaldara News : तब्बल २४ दिवसानंतर चिखलदरा पोलीसांनी (police) चिखलदरा तालुक्यातील काेटमी येथील एका युवतीच्या हत्येप्रकरणी संशियत आराेपीस बेड्या (arrest) ठाेकल्या आहेत. संशयिताने दिलेल्या कबूली जबाबात एक धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. दरम्यान खासदार अनिल बाेंडे यांच्या आक्रमतेकमुळे या घटनेच्यामुळापर्यंत पाेलीस पाेहचले असे बाेंडेंच्या समर्थकांनी नमूद केले.

कोटमी येथून 17 ऑगस्ट पासून घरातून बेपत्ता असलेल्या युवतीचा मृतदेह गावातील तिच्या मोठ्या वडिलांच्या शेतात १९ ऑगस्टला आढळला. आपल्या मुलीची हत्या अचलपूर येथील जाकीर अहमद व गावातीलच दोन साथीदांरांनी केला असा आराेप तिच्या वडिलांनी १९ ऑगस्टला चिखलदरा पोलीस ठाण्यात केली होती.

चिखलदरा पोलिसांनी मात्र हे प्रकरण पूर्ण दडपण्याचा प्रयत्न केला असा आराेप भाजपा खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांनी केला. त्यानंतर बाेंडे यांनी सखाेल चाैकशी व्हावी अशी मागणी केली तसेच त्यांनीही संशयितांबाबत तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी अचलपूर येथील जाकीर अहमद, व कोटमी येथील मुकेश बेठेकर व अमोल उईके या तिघांवर हत्येचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली. "ती माझ्याशी बोलत नव्हती, म्हणून मी तिचा गळा आवळला व पुरावे नष्ट करण्यासाठी गावा लगतच्या विहिरीत तिला ढकलले असा कबुली जबाब पाेलिसांना दिला आहे.

दरम्यान याप्रकरणी 19 ऑगस्ट रोजीच तक्रार दाखल केल्यानंतरही चिखलदरा पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याऐवजी मुलीच्या घरी पोलीस पाठवून हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला असा आराेप बाेंडेंनी केला. हत्येचा गुन्हा दडपणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यावर कारवाई करावी अशी मागणीही खासदार अनिल बोंडे यांनी केली. त्यामुळे आता या प्रकरणात चिखलदरा पोलीस ठाण्याचे ठाणेदार राहुल वाढवे यांच्यावर काय कारवाई होते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rahul Gandhi: महाराष्ट्रातील बेरोजगारीला गुजरात जबाबदार? राहुल गांधींनी काढली उद्योगांची कुंडली

Maharashtra News Live Updates: ५ कोटींचे सोने आणि १७ लाखांची चांदी जप्त, अमरावतीच्या नागपुरी गेट पोलिसांची कारवाई

Assembly Election: कामठीचं महाभारत ! कामठीत चंद्रशेखर बावनकुळे चौकार मारणार?

'Jodha Akbar' चित्रपटाचे शूटिंग कोणत्या किल्ल्यावर झाले? अनुभवाल डोळ्यांचे पारणे फेडणारे सौंदर्य

PM Modi: बाळासाहेबांचा अपमान करणाऱ्या काँग्रेसच्या हातात दिला रिमोट कंट्रोल; उद्धव ठाकरेंवर पीएम मोदींचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT