Uddhav Thackreay 
महाराष्ट्र

असं आयुष्य जगायचं नाही ना? मग 'हे' करा मुख्यमंत्र्यांचा सल्ला

संभाजी थोरात, विजय पाटील

कोल्हापूर : दरवर्षी पाऊस आला की घराबहाेर यायचे हे तुम्हांला नकाे आहे ना? असं आयुष्य तुम्हांला नाही ना जगयाचे असा प्रश्न मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पूराने बाधित झालेल्या ग्रामस्थांना करताच महिलांनी आमचे कायमचे पुर्नवसन करा अशी आर्त विनवणी केली. मुख्यमंत्री ठाकरे हे काेल्हापूर दाै-यावर आले आहेत. ते पूरग्रस्त भागांना भेटी देत आहेत. या भेटी दरम्यान मुख्यमंत्र्यांना पूरग्रस्त मदतीची अपेक्षा व्यक्त करीत आहेत. (chief-minister-uddhav-thackreay-kolhapur-flood-affected-area-sml80)

कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ आणि नरसोबाची वाडी येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे Uddhav Thackreay यांनी पाहणी केली. त्यांच्यासमवेत खासदार धैर्यशील माने, पालकमंत्री सतेज पाटील आदी नेते आहेत. गेले काही दिवसांपासून बहुतांश नेते काेल्हापूरला येऊन गेलेत परंतु पूरग्रस्तांना ठाेस असे मदतीचे पॅकेज मिळाले नाही अथवा जाहीर झालेले नाही. मुख्यमंत्र्यांच्या दाै-यामुळे काेल्हापूरातील पूरग्रस्तांना पॅकेजची घाेषणा हाेईल असे वाटत आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पूरग्रस्तांच्या निवारा केंद्रात असणा-या काही रहिवाशांची भेट घेतली. त्यावेळी उपस्थित महिलांनी त्यांच्या पुढे हात जाेडत मदतीची अपेक्षा व्यक्त केली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी दरवर्षी पाऊस आला की घराबहाेर यायचे हे तुम्हांला नकाे आहे हे आम्ही जाणताे. पावसाच्या पाणीमुळे सर्व काही नुकासनीत जाते. असं आयुष्य तुम्हांला नकाे आहे ना. यावेळी महिलांनी आम्हांला कायमचे घर द्या अशी विनवणी केली. या ठिकाणी आलाे की राेजगार पण द्या. आम्ही मध्यमवर्गीय माणसे आहाेत असे मुख्यमंत्र्यांना सांगितले.

त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी पुर्नवसनाचा प्रश्न गाव म्हणून एकमुखाने पुढे आणा. सर्वांनी एकत्रित ठरवा. शासन दरबारी आम्ही निर्णय घेऊ असे महिलांना आश्वासित केले. काेराेनाचे संकट आहे, मास्क लावयाला विसरु नकाे असा सल्लाही मुख्यमंत्र्यांनी महिलांना दिला. त्यानंतर ते काेल्हापूर शहराकडे रवाना झाले.

मुख्यमंत्री ठाकरे हे लोकांची भेट घेऊन त्यांना दिलासा देत आहेत. या पार्श्वभुमीवर शिरोळ, नरसोबाची वाडी, काेल्महापूरमध्ये पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

मुख्यमंत्री यांनी आम्हाला मदत करावी गेले अनेक दिवस घर सोडून बाहेर आहे. आमच्या शेतात अजून पाणी आहे. शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे असे शिरोळ येथील काही पूरग्रस्त आणि शेतकऱ्यांनी मागणी केली आहे. ही मागणी आम्ही मुख्यमंत्र्यांना करणार असल्याचे नमूद केले.

edited by : siddharth latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Accident : पुण्यात भीषण अपघात; वर्षश्राद्धाला जाताना काळाचा घाला; एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

Maharashtra Live News Update: भंडाऱ्यात मुसळधार पावसाची हजेरी...

Strong Bones : हाडांना कमजोर करतात हे 7 अन्नपदार्थ; तज्ज्ञांनी दिला इशारा

मुंबईत पोलीस कर्मचाऱ्याची आत्महत्या; राहत्या घरात गळफास घेत आयुष्य संपवलं

Crime : प्रेमा तुझा रंग कसा? एक्स गर्लफ्रेंडला ९ वेळा चाकूने भोसकलं, नंतर बॉयफ्रेंडने स्वत: आयुष्य संपवलं

SCROLL FOR NEXT