CM Uddhav Thackeray
CM Uddhav Thackeray Saam Tv
महाराष्ट्र

आधी किंमती भरमसाठ वाढवायच्या आणि नंतर...; CM उद्धव ठाकरे यांचा केंद्र सरकारवर निशाणा

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : देशभरात गॅसदरवाढीची (Gas cylinder price) झळ बसलेल्या नागरिकांना केंद्र सरकारनं मोठा दिलासा दिला आहे. स्वयंपाक घरातील एलपीजी गॅस आता २०० रुपयांनी स्वस्त होणार आहे.तसंच इंधनदरवाढीने होरपळलेल्या वाहनधारकांनाही केंद्र सरकारनं मोठा दिलासा दिला आहे. पेट्रोल साडेनऊ रुपयांनी,तर डिझेल ७ रुपयांनी स्वस्त होणार आहे.अशी घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन (Nirmala Sitharaman) यांनी आज शनिवारी केली. त्यानंतर भाजपच्या नेत्यांनी केंद्र सरकारचे आभार मानत असतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर निशाणा साधलाय.त्यानंतर आता सीएम ठाकरेंनीही भाजपला प्रत्युत्तर दिलं आहे. पेट्रोल आणि डिझेलवरील अबकारी कर आणखी कमी करायला हवे. आधी किंमती वाढवायच्या आणि नंतर नाममात्र कमी करण्याचा देखावा नको, अशी टीका ठाकरे यांनी केंद्र सरकारवर केलीय.

केंद्र सरकारच्या निर्णयावर बोलताना ठाकरे म्हणाले, केंद्र सरकारने दोन महिन्यांपूर्वी पेट्रोलवरचा अबकारी कर प्रति लिटर १८.४२ रुपये इतका वाढविला होता आणि आज तो ८ रुपयांनी कमी केल्याची घोषणा केली आहे.डिझेलवरील अबकारी कर देखील १८ रुपये २४ पैशांनी वाढविले आणि आता ६ रुपयांनी कमी केल्याची घोषणा केली आहे. आधी किंमती भरमसाठ वाढवायच्या आणि नंतर नाममात्र कमी करून दर कमी केल्याचा आव आणायचा हे बरोबर नाही. आकडेवारीच्या जंजाळात नागरिकांना अडकवून न ठेवता सहा सात वर्षांपूर्वी असलेला अबकारी कराइतकी कपात केल्यासच खऱ्या अर्थाने देशातील नागरिकांना दिलासा मिळणार आहे.

'जनतेची लूट करून केंद्र सरकारने हजारों कोटींचा नफा कमवला'

तसंच केंद्र सरकारच्या या निर्णयावर महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनीही प्रतिक्रिया दिलीय.निवडणुका जवळ आल्या की लगेच केंद्र सरकारला इंधनाचे दर कमी करायची बुद्धी येते. जनतेची लूट करून केंद्र सरकारने हजारों कोटींचा नफा कमवला आहे. जनतेचे हे लुटलेले पैसे परत करा. असा घणाघात ठाकूर यांनी केंद्र सरकारवर केला आहे.

Edited By - Naresh Shende

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

SRH vs RR: हैदराबादचं वादळ रोखण्यासाठी काय असेल राजस्थानचा 'रॉयल' प्लान? अशी असू शकते प्लेइंग ११

Today's Marathi News Live : नवी मुंबईतील भाजपचे 300 ते 400 पदाधिकारी देणार राजीनामा, तिकीट वाटपावरून नाराज असल्याची चर्चा

यवतमाळ : सायखेडानजीक 2 ट्रकचा भीषण अपघात, 150 बकऱ्यांसह तिघे जागीच ठार

Shweta Tiwari: संतुर मॉम श्वेताची थायलंड सफर; फोटो...

Water Reserve inside moon : चंद्रावर अपेक्षेपेक्षा पाच ते आठ पट अधिक पाणी; ISROच्या अभ्यासात मोठा खुलासा

SCROLL FOR NEXT