मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रुग्णालयात दाखल twitter/@CMO Maharashtra
महाराष्ट्र

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रुग्णालयात दाखल

चेकअप झाल्यानंतर तासाभरातच ते घरी रवाना झाले.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज एचएन रिलायन्स रुग्णालयात (CM Uddhav Thackeray) दाखल झाले आहेत. सुरवातीला ते रुग्णालयात का दाखल झाले याबाबत अधिकृत माहिती समोर आली नव्हती. मात्र आता नियमित तपासणीसाठी (Routine checkup) मुख्यमंत्री रुग्णालयात गेले असल्याची माहिती मिळाली आहे. (Chief Minister Uddhav Thackeray admitted to hospital)

उद्धव ठाकरे हे स्वत: हून रुग्णालयात गेले दाखल झाले त्यांची प्रकृतीही उत्तम आहे. केवळ रुटीन चेकअपचा भाग म्हणून ते रुग्णालयात गेले आहेत. दरम्यान यापूर्वी लीलावती रुग्णालयात मुख्यमंत्र्यांचं रुटीन चेकअप होत होतं. मात्र उद्धव ठाकरे सध्या मुख्यमंत्र्यांचे अधिकृत निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर राहत आहेत. त्यामुळे जवळचं रुग्णालय म्हणून, मुख्यंत्र्यांनी HN रिलायन्स रुग्णालयात रुटीन चेकअपसाठी गेले होते. चेकअप झाल्यानंतर तासाभरातच ते घरी रवाना झाले. यावेळी रुग्णालय परिसरात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता.

Edited By - Anuradha Dhawade

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Highway tyre puncture: हायवेवर टायर पंक्चर झाल्यास काय कराल?

Oral Health Tips: रोज फक्त 2 मिनिटांचा हा उपाय ठरू शकतो दातांसाठी फायदेशीर; डॉक्टरांनी सांगितल्या तोंडाच्या आरोग्याच्या महत्त्वाच्या सवयी

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींच्या खात्यात ₹१५०० कधी येणार? ८ दिवसांत पैसे जमा होण्याची शक्यता, महत्त्वाची अपडेट समोर

Maharashtra News Live Update : मुंबई-पुणे कनेक्टिंग लिंक आज राहणार 3 तास बंद

ZP School : जिल्हा परिषद शाळेचा स्लॅब कोसळला; १३ विद्यार्थी गंभीर, राज्यात खळबळ

SCROLL FOR NEXT