राष्ट्रवादीची परिवार संवाद यात्रा रद्द; जयंत पाटील यांची घोषणा

राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रा - संवाद कार्यकर्त्यांशी, पक्षाच्या केंद्रबिंदुशी’, या उपक्रमांतर्गत ही यात्रा आयोजित करण्यात आली होती.
राष्ट्रवादीची परिवार संवाद यात्रा रद्द
राष्ट्रवादीची परिवार संवाद यात्रा रद्दFacebook/ @Jayant Patil
Published On

संदिप नागरे

हिंगोली : राष्ट्रवादी काँग्रेस (Rashtrawadi Congress) पक्षातर्फे राज्यभर सुरू करण्यात आलेली राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रा (Rashtrawadi Pariwar Sanwad Yatra) आज पासून रद्द करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी आज हिंगोली मध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती दिली आहे. या यात्रेचा शेवटचा कार्यक्रम हा हिंगोलीमधील (Hindgoli) वसमतमध्ये असून, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, हा निर्णय घेण्यात आल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले. (NCP's Pariwar Sanwad yatra canceled; Announcement by Jayant Patil)

राष्ट्रवादीची परिवार संवाद यात्रा रद्द
IPL बाबतीत वेस्ट इंडीजच्या माजी क्रिकेटपटूचं धक्कादायक विधान

दरम्यान कालच राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांनी जयंत पाटील व सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde)यांच्या स्वागतासाठी शेकडोंच्या संख्येने गर्दी करत एक क्विंटल वजनाचा हार क्रेनद्वारे स्वागत करण्यासाठी तयार केला होता, या बाबत साम टिव्ही ने बातमी दाखवताच राष्ट्रवादीच्या नेत्यांनी अतिउत्साही कार्यकर्त्यांचा स्वागत कार्यक्रम रद्द केला होता.

‘राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रा - संवाद कार्यकर्त्यांशी, पक्षाच्या केंद्रबिंदुशी’, या उपक्रमांतर्गत ही यात्रा आयोजित करण्यात आली होती. यापुर्वी झालेल्या बैठकीत त्यांनी जलसंपदा विभागाची आढावा बैठक घेतली. या बैठकीत जिल्ह्यात सुरू असलेले प्रकल्प आणि योजनांची माहिती घेत त्यांनी जलसंपदा विभागासंबंधित विविध प्रश्नांवर चर्चा केली.

त्याचबरोबर, ‘’पक्षवाढीसाठी अधिक सक्षमतेने काम केले तर पक्षाची ताकद आणखी वाढेल. ज्येष्ठांनी योग्य मार्गदर्शन केले तर पक्ष वाढीसाठी मदत होईल. प्रत्येक बुथ कमिटी सक्षम करायला हवी असे सांगतानाच आता पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या निवडणुका येणार आहेत त्यामुळे नव्या चेहऱ्यांना संधी द्या", असे आवाहनही ना. जयंत पाटील यांनी यावेळी केले.

Edited By- Anuradha Dhawade

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com