मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची दरड दुर्घटनाग्रस्त भागाची पाहणी
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची दरड दुर्घटनाग्रस्त भागाची पाहणी Saam Tv
महाराष्ट्र

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची दरड दुर्घटनाग्रस्त भागाची पाहणी

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पुणे : रायगडमधील Raigad दोन वेगवेगळ्या दरड कोसळण्याच्या घटना घडल्या. एकूण मृतांचा आकडा 44 वर पोहोचला आहे. या दुर्घटनेमध्ये ४० जण मलब्याखाली अडकल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मागील दोन दिवसांपासून राज्यात पावसाने जोरदार हजेरी लावली. यामुळे अनेक ठिकाणी दरड कोसळल्याच्या घटना घडत आहेत. आज दुपारी 12 वाजता मुंबईहून हेलिकॉप्टरने महाडकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे Uddhav Thackrey पाहणी साठी रवाना होत आहेत.

हे देखील पहा-

पाऊस सुरु असतानाच रायगडमधील तळीये गावातील 32 घरांवर दरड कोसळली. यामध्ये आतापर्यंत 44 जणांचा मृत्यू झाला आहे. याबद्दल उद्धव ठाकरे दुर्घटनास्थळाची पाहणी करणार आहेत. आज दुपारी 12 वाजता मुंबईहून हेलिकॉप्टरने महाडकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पाहणी साठी रवाना होत आहेत.

महाड येथील एमआयडीसी हेलिपॅड येथे ते पोहोचणार आहेत. तेथून ते वाहनाने तळीये गावासाठी रवाना होणार आहेत. तळीये येथे दुपारी १.३० वाजता पोहचून ते दुर्घटनाग्रस्त गावाची पाहणी करणार आहेत. हेलिकॉप्टरने दुपारी ३.२० वाजता ते परत महाड होऊन मुंबईकडे रवाना होतील, अशी माहिती मुख्यमंत्री सचिवालय कडून मिळाली आहे.

प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार, एनडीआरफ पथके या दुर्घटनेच्या 48 तासानंतरही दाखल झालेली नाहीत. या दर्घटनेतील मृत्यूमुखी पडलेल्यांच्या वारसांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत व जखमींच्या उपचाराचा खर्च शासनातर्फे करण्यात येईल, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं आहे. ही आपत्ती कोसळलेल्या कुटुंबीयांच्या दुःखात आपण सहभागी आहोत, असेही ते म्हणाले आहेत.

Edited By-Sanika Gade

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : उद्धव ठाकरे यांची धाराशिवमध्ये जाहीर सभा

Naach Ga Ghuma Film : "सगळं एकदम चोख, कौतुकासाठी शब्दच अपूरे..."; ‘नाच गं घुमा’ पाहताच प्राजक्ता माळी काय म्हणाली?

Pune Travel : पुण्यातील नयनरम्य निसर्ग; हनिमून आणि डेटसाठी परफेक्ट ऑप्शन असलेली भन्नाट ठिकाणे

Accident In Hingoli : हिंगोलीत भरधाव कार झाडावर आदळली, महिलेसह दोघे ठार; बुलडाण्यातही एसटी-खासगी बसच्या धडकेत महिला ठार

Summer Tips: अख्खी रात्र पंखा वेगानं चालू ठेवून झोपणे अंगाशी येईल; दुष्परिणाम भयंकर

SCROLL FOR NEXT