मोठी बातमी: एकाच दिवशी राज्यात 13 ठिकाणी ढगफुटी!
मोठी बातमी: एकाच दिवशी राज्यात 13 ठिकाणी ढगफुटी!Saam Tv

मोठी बातमी: एकाच दिवशी राज्यात 13 ठिकाणी ढगफुटी!

गेल्या काही दिवसात मुसळधार पावसाने राज्यात जवळपास १३ ठिकाणी ढगफुटीसदृश पाऊस झाल्याची माहिती समोर आली आहे

पुणे: गेल्या काही दिवसात मुसळधार पावसाने राज्यात जवळपास १३ ठिकाणी ढगफुटीसदृश पाऊस झाल्याची माहिती समोर आली आहे. तर, ग्रामीण भागात रडारयंत्रणा RADAR नसल्याने या पावसाचे मोजमाप करणे शक्य झाले नाही अशी माहिती आहे. हवामानतज्ज्ञ डॉ. किरणकुमार जोहरे यांनी सांगितले कि, संबंधित परिसरातील पावसाचे एकूण स्वरुप पाहता राज्यात १३ ठिकाणी ढगफुटी झाल्याचा दावा हवामान आयआयटीएम कडून करण्यात आला आहे.

हे देखील पहा-

ताम्हिणी घाटात ४६८ मिमी पावसाची नोंद झाली आहे. तर चिपळूण Chiplun मध्ये ४०० मिमी आणि महाबळेश्वरमध्ये Mahabaleshwar ४८० मिमी पावसाची नोंद झाली आहे. डॉ. किरणकुमार जोहरे यांनी सांगितले आहे, एका तासात जर १०० मी.मी पाऊस झाला तर त्याला जागतिक हवामान संघटनेच्या मापकानुसार ढगफुटी घोषित करण्यात येते. असे ते म्हणाले.

मोठी बातमी: एकाच दिवशी राज्यात 13 ठिकाणी ढगफुटी!
साहित्य क्षेत्रावर शोककळा, कवी सतीश काळसेकरांचं निधन...(पहा व्हिडीओ)

हवामानतज्ज्ञ जोहरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे Pune येथील आयआयटीएम संस्थेतील महासंगणकावर त्यांची मोजणी करता येते. परंतु राज्यातील मुंबई, पुणे वगळता इतरत्र रडारची संख्या कमी आहे. त्यामुळे ढगफुटीच मोजता नाही आली. ढगफुटी लपवली जाऊन त्याला अतिवृष्टी असे नाव दिले जात आहे. राज्यात आपत्ती व्यवस्थापनासाठी 14 हजार कोटींपेक्षा जास्त रकमेचे बजेट आहे अशी माहिती त्यांनी दिली.

Edited By-Sanika Gade

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com