Chief Minister Shinde Visit Guwahati  
महाराष्ट्र

Cm Shinde: मुख्यमंत्री गुवाहाटीला का जातात? कामाख्या शिंदेंना पावणार?

Chief Minister Shinde Visit Guwahati : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कामाख्या देवीचं दर्शन घेतलं आहे. निवडणुकीपूर्वी त्यांनी देवीचं दर्शन घेतलंय. ही देवी त्यांना पावणार का हे पाहावं लागेल.

Tanmay Tillu

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मात्र आसामची राजधानी गुवाहाटीला गेले आहेत. 2022 ला राज्यात सत्तांतर होत असताना एकनाथ शिंदे हे समर्थक आमदारांसह गुवाहाटीला गेले होते. विधानसभेला कामाख्या शिंदेंना पावणार का ? पाहूया.

महाराष्ट्रात विधानसभेची निवडणूक होत आहे. असं असताना राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मात्र आसामची राजधानी गुवाहाटीला गेले आहेत. 2022 ला राज्यात सत्तांतर होत असताना एकनाथ शिंदे हे समर्थक आमदारांसह गुवाहाटीला गेले होते. आताही राज्यात निवडणूक होत असताना एकनाथ शिंदे गुवाहाटीला गेले आहेत.ऐन निवडणुकीच्या काळात शिंदे गुवाहटीला गेल्यानं विरोधकांनी शिंदेंवर टीका केलीये.

अडीच वर्षांपूर्वी महाराष्ट्रात मोठे राजकीय भूकंप झाला होता. शिवसेनेत उभी फुट पडली होती. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत मोठे बंड पुकारत आपल्यासोबतच्या सर्व आमदारांना गुवाहाटीत नेले होते. तिथे काही दिवस प्रचंड अभूतपूर्व अशा नाट्यमय घडामोडी घडल्यानंतर महाराष्ट्रात सत्तांतर घडून आले होते. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत एकत्रित येऊन राज्यात सरकार स्थापन केले आणि मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर त्यांनी पुन्हा गुवाहाटीला जाऊन कामाख्या देवीची पूजा केली होती. त्यावेळी, त्यांच्यासोबत त्यांच्या पक्षाचे आमदार देखील होते. काय अख्यायिका आहे कामाख्य मंदिराची पाहूया.

कामाख्या मंदिराची अख्यायिका

देवळाच्या स्थापनेविषयी अनेक रोचक कथा

कामदेवाने विश्वकर्म्याच्या मदतीने बांधलेलं देऊळ

देऊळ तंत्रविद्या, सिद्धींचे माहेरघर

मंदिराच्या भिंतींवर 64 योगिनी,18 भैरवांची शिल्पं

देवळात पशुबळी देण्याची प्रथा आजही कायम

दरम्यान, शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाने काल 45 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. या यादीत मंत्री तसेच बऱ्याच विद्यमान आमदारांना पुन्हा उमेदवारी दिली. गुवाहाटीचं बंड यशस्वी झाल्यामुळे शिंदेंची कामाख्या देवीवरची श्रद्धा वाढली असावी. आणि त्यामुळे आता पुन्हा मुख्यमंत्रिपदावर वर्णी लावावी याचंच साकडं घालण्यासाठी तर शिंदे कामाख्याकडे गेले नसावेत ना? अशी चर्चा आता रंगू लागलीय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Horoscope Today: काहींना मिळणार प्रेमात धोका, तर काही करतील सुखी संसार; वाचा तुमचे राशीभविष्य

Maharashtra Politics : नकटं असावं, धाकटं नसावं! महायुती-मविआत शिवसेना दोन आकड्यांवर, VIDEO

Madha Constituency : माढ्याचं महाभारत! मतदारसंघात 2 रणजितसिंह आमने-सामने येणार? VIDEO

Maharashtra Election: बारामतीत काकाविरुद्ध पुतण्या भिडणार? युगेंद्र पवारांची अजित पवारांशी लढत?

Mahim Assembly Constituency : 'राज'पुत्र चक्रव्यूहात? माहिम मतदारसंघात पुतण्याची काकांकडून कोंडी? पाहा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT