Maharashtra Politics: कुठे बंडखोरी, कुठे नाराजी? विधानसभेच्या रणधुमाळीत ५ मोठ्या राजकीय घडामोडी

Maharashtra Assembly Election 2024 : राज्यात विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर अनेक जिल्ह्यांमध्ये सर्वात पक्षांमध्ये उमेदवारीवरून काही नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे, तर काहींनी बंडखोरी केली आहे.
कुठे बंडखोरी, कुठे नाराजी? विधानसभेच्या रणधुमाळीत ५ मोठ्या राजकीय घडामोडी
Maharashtra PoliticsSaam Tv
Published On

राज्यात विधानसभा निवडणूक जाहीर झाली असून सगळ्याच राजकीय पक्षांनी आपल्या उमेदवारांची यादी जाहीर करण्यास सुरुवात केली आहे. यातच काही राजकीय पक्षांनी आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केल्यानंतर अनेक स्थानिक नेते नाराज झाले असून यातील काही नेत्यांनी बंडाचा झेंडा फडकावला आहे. राज्यात कुठे बंडखोरी होऊ शकते आणि कोणते नेते नाराज आहेत, याचीच माहिती जाणून घेऊ...

सांगोल्यात महाविकास आघाडीत बिघाडी

सांगोल्यात महाविकास आघाडीत बिघाडी होऊ शकते. याचं कारण म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी दीपक साळुंखे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. यानंतर आता मविआचा मित्रपक्ष असलेल्या शेकापने दिवंगत माजी आमदार गणपतराव देशमुख यांचे नातू डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांना सांगोल्यातून उमेदवारी जाहीर केली आहे. यामुळे येथे थेट दोन मित्रपक्षात लढत पाहायला मिळू शकते.

कुठे बंडखोरी, कुठे नाराजी? विधानसभेच्या रणधुमाळीत ५ मोठ्या राजकीय घडामोडी
Wayanad By-Election: वायनाडकडे दोन खासदार असणार, प्रियांकासाठी मते मागताना राहुल गांधी झाले भावुक

उल्हासनगर विधानसभा क्षेत्रात महायुतीत भाजप आणि आणि अजित पवार गटात तेढ कायम

उल्हासनगर विधासभा क्षेत्रातील महायुतीतील तेढ अजूनही कायम आहे. महायुतीतील भाजपाचे विद्यमान आमदार कुमार आयलानी हे भाजपाकडून तिकीट मागत आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून भरत राजवानी हे इच्छुक आहेत. त्यामुळे विद्यमान आमदाराचे नाव भाजपाच्या पहिल्या यादीत येऊ शकले नाही. राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे उल्हासनगर एक आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी भरत राजवानी यांच्या समर्थकांनी भाजपास उल्हासनगर सुटल्यास निवडणुकीत भाजपाचे काम करणार नसल्याचे घोषित केलं. तसेच भरत राजवानी यांना भाजपा उमेदवाराविरोधात उभे करू आणि जिंकून आणू, असं म्हणत कार्यकर्त्यांनी नाराजी या आढावा बैठकीत व्यक्त केली.

कल्याण पूर्वेत महायुतीत बंड?

महायुतीत जागा वाटपानंतर इच्छुकांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहेत. कल्याण पूर्वेत भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड यांना महायुतीत भाजपने उमेदवारी दिल्यानंतर शिंदे गटातील माजी नगरसेवक, पदाधिकाऱ्यांनी उघडपणे बंडाचा इशारा दिला होता. सुलभा गायकवाड उद्या देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. तर दुसरीकडे शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी व माजी नगरसेवक विशाल पावशे हे देखील येत्या 25 तारखेला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. दुसरीकडे शिवसेना शिंदे गटाचे शहरप्रमुख महेश गायकवाड, विधानसभा प्रमुख निलेश शिंदे हे दोन इच्छुक देखील विधानसभा निवडणुकीत उतरणार असल्याचे चर्चा आहे. मात्र याबाबत कुणीही बोलण्यास नकार दिलाय.

कुठे बंडखोरी, कुठे नाराजी? विधानसभेच्या रणधुमाळीत ५ मोठ्या राजकीय घडामोडी
Mahim : हायव्होल्टेज 'राज'कारण! आदित्यंविरोधात मनसेने दिला उमेदवार, दुसऱ्या दिवशीच उद्धव ठाकरेंनीही अमित ठाकरेंविरोधात उतरवला शिलेदार

हडपसर मतदारसंघात शिवसैनिकी नाराज

हडपसर मतदारसंघातून चेतन तुपे यांना उमेदवारी जाहीर होतात शिवसेनेत कार्यकर्त्यांमध्ये नाराजी असल्याचं पाहायला मिळालं. हडपसर मतदारसंघात शिवसेनेला मिळवा, असा आग्रह शिवसैनिकांचा होता. उद्या शिवसेनेचा हडपसरमध्ये चिंतन मेळावा आहे. शिवसेना उद्या मेळाव्यातून भूमिका जाहीर करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

बुलढाण्यात शिंदे गटात बंडखोरी?

मंगळवारी रात्री शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवारांची यादी जाहीर झाली. त्यात बुलढाण्यातून दोन संजय यांची नावे आहेत. बुलढाण्यातून शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांना उमेदवारी मिळाली. तर मेहकर मधून डॉक्टर संजय रायमुलकर यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. बुलढाणा जिल्हा हा राजमाता जिजाऊंचा जिल्हा आहे आणि त्यामुळे बुलढाणा मतदारसंघ हा शिंदेंच्या शिवसेनेने महिलांसाठी राखीव ठेवावा, अशी सुरुवातीपासूनच मागणी करत शिंदेंच्या शिवसेनेच्या महिला नेत्या प्रेमलता सोनवणे यांनी बंडाचे निशाण फडकवलं होतं. मात्र पक्षाने त्यांची दखल न घेतल्याने आता त्यांनी पक्षाविरोधातच बंडखोरी करण्याचं ठरवलं असून त्या आता शिवसेनेचे विद्यमान आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधात बुलढाणा विधानसभा मतदारसंघातून स्वतंत्र लढणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com