Madha Constituency : माढ्याचं महाभारत! मतदारसंघात 2 रणजितसिंह आमने-सामने येणार? VIDEO
भरत मोहोळकर, साम टीव्ही
माढा : विधानसभा निवडणूक जाहीर झाल्याने माढ्यात राजकीय घडामोडींना वेग आलाय. तर मोहिते पाटील आणि बबन शिंदे या पारंपरिक विरोधकांनी मुलांसाठी पवारांकडे जोरदार फिल्डिंग लावलीय.. तर पवारांनी उमेदवारी दिली नाही तर मुलगा रणजितसिंह शिंदे अपक्ष निवडणूक मैदानात उतरणार असल्याचं बबन शिंदेंनी जाहीर करून टाकलंय... तर बबन शिंदेंच्या उमेदवारीला काँग्रेस नेत्या मिनल साठेंनी विरोध दर्शवलाय...
लोकसभा निवडणूकीत माढ्यातून पवारांच्या पक्षाच्या धैर्यशील मोहिते पाटलांना तब्बल 52 हजार मतांचं लीड मिळालं...त्यामुळे माढ्यातील दिग्गजांनी महाविकास आघाडीचं दार ठोठावायला सुरुवात केलीय.. माढ्यातून नेमके कोण इच्छूक आहेत? पाहूयात...
माढ्यात इच्छूकांची भाऊगर्दी?
1) रणजितसिंह शिंदे, इच्छुक, राष्ट्रवादी (SP)
2) रणजितसिंह मोहिते पाटील, इच्छुक, राष्ट्रवादी (SP)
3) संजय कोकाटे, इच्छुक, राष्ट्रवादी (SP)
4) अभिजीत पाटील, इच्छुक, भाजप/ राष्ट्रवादी (SP)
5) मीनल साठे, इच्छुक, काँग्रेस
6) माऊली हळणवर, इच्छुक, भाजप
1995 पासून सलग 6 वेळा आमदार असलेल्या बबन शिंदेंना अजित पवारांनी उमेदावारी जाहीर केलीय... मात्र बबन शिंदेंनी माघार घेत मुलगा रणजितसिंह शिंदेंना उमेदवारी मिळावी म्हणून पवारांचा उंबरठा झिजवायला सुरुवात केलीय.. मात्र पवारांची भूमिका गुलदस्त्यात आहे. माढ्याचं 2019 चं गणित नेमकं कसं होतं? पाहूयात...
2019 मधील मतांचं गणित?
बबन शिंदे, आमदार, राष्ट्रवादी- 1 लाख 42 हजाग 573 मतं
संजय कोकाटे, शिवसेना- 74 हजार 328 मतं
68 हजार मतांनी बबन शिंदेंचा विजय
अजित पवारांनी जाहीर केलेली उमेदवारी नाकारून बबन शिंदेंनी बंड करण्याचे संकेत दिलेत. त्यामुळे माढ्यात पुन्हा पारंपरिक लढत होणार की पवार नवी खेळी करणार? यावर माढ्यातील विजयाचं गणित अवलंबून असणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.