Chief Minister Shinde Google
महाराष्ट्र

CM Meeting : खानापूर मतदारसंघातील विकासकामांना गती द्यावी: मुख्यमंत्री शिंदे यांचे निर्देश

Chief Minister Shinde : दिवंगत आमदार बाबर यांचे आयुष्य संघर्षमय राहिले आहे. त्यांनी आपल्या मतदारसंघातील विकासकामांसाठी सातत्यपूर्णरित्या पाठपुरावा केला आहे. त्यांच्या मतदारसंघातील विकासकामांना आपल्याला गती द्यावी लागेल. त्यासाठी संबंधित विभागांनी समन्वयाने आणि सकारात्मक दृष्ट्या कार्यवाही करावी, असे निर्देश मुख्यमंत्री शिंदे यांनी आजच्या बैठकीत दिले.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Chief Minister Shinde Meeting In Sahyadri State Guest House :

खानापूर मतदारसंघाच्या विकासासाठी दिवंगत आमदार अनिल बाबर यांनी खूप संघर्ष केलाय. त्यांच्या पश्चातही या मतदारसंघातील विकासकामांना प्राधान्याने गती दिली पाहिजे, यासाठी संबंधित विभागांनी समन्वयाने कार्यवाही करावी, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेत. सांगली जिल्ह्यातील खानापूर विधानसभा मतदारसंघातील विविध विकासकामे, सुविधांच्या आढाव्यासाठी मुख्यमंत्री शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे आज बैठक झाली. (Latest News)

बैठकीस उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई, सांगली जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सुहास बाबर, अमोल बाबर तसेच परिवहन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव संजय सेठी, ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, आरोग्य विभागाचे आयुक्त धीरज कुमार, परिवहन विभाग आयुक्त विवेक भीमनवार, राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर आदी उपस्थित होते.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दिवंगत आमदार बाबर यांचे आयुष्य संघर्षमय राहिले आहे. त्यांनी आपल्या मतदारसंघातील विकासकामांसाठी सातत्यपूर्णरित्या पाठपुरावा केला आहे. त्यांच्या मतदारसंघातील विकासकामांना आपल्याला गती द्यावी लागेल. त्यासाठी संबंधित विभागांनी समन्वयाने आणि सकारात्मक दृष्ट्या कार्यवाही करावी. विटा येथे उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सुरू करण्याबाबत सकारात्मक आहोत. दरम्यान हे कार्यालय सुरु होईपर्यंत परिवहन खात्यातर्फे आयोजित केला जाणाऱ्या वाहन नोंदणीसह, विविध कामांसाठीची शिबिरांची संख्या दुपटीने वाढवावी. या ठिकाणी नागरिकांची कोणतीही गैरसोय होऊ नये याची दक्षता घ्यावी, असे निर्देशही मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले.

एस.टी. महामंडळाच्या विटा, खानापूर, आटपाडी, खरसुंडी येथील आगार व बसस्थानकांच्या सुविधांबाबतही आढावा घेण्यात आला. या कामांसाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही. विटा येथील आगार आणि बसस्थानकांमधील सुविधा अद्ययावत करण्यात याव्यात. याठिकाणची कामे दर्जेदार आणि वेळेत व्हावीत, अशा सूचना देण्यात आल्या. हातनूर येथील ग्रामीण रुग्णालय, तसेच या मतदार संघातील विविध गावांतील प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्राबाबतचा आढावा घेण्यात आला. बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्राम योजनेतंर्गत विविध ग्रामपंचातींचे प्रस्ताव, तसेच जलसंधारणाची कामे याबाबतही मुख्यमंत्री शिंदे यांनी संबंधित विभागाला निर्देश दिले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune: पंढरीच्या वाटेवर लुटमार अन् अल्पवयीन मुलीचे लचके तोडले; पोलिसांनी २ आरोपींच्या मुसक्या आवळल्या

Maharashtra Live News Update: पुण्याला रेड अलर्ट, घाट भागात कोसळधार; हवामान विभागाचा अंदाज

Shahada Police : प्रायव्हेट खोल्या, सोफ्यावर कंडोम; शहाद्यात अवैध कॅफेवर पोलिसांचा छापा

अमेरिकेत पुराचा हाहाकार! 50 जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; पाहा VIDEO

Mahadev Temple: शिवमंदिरात महिलांनी केव्हा जावे? जाणून घ्या योग्य वेळ

SCROLL FOR NEXT