पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्राच्या एकदिवसीय दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान मोदींनी शिर्डीत अनेक विकासकामांचे लोकार्पण केले. यानंतर मोदींनी काकडीत शेतकरी मेळाव्याला हजेरी लावली. या मेळाव्यात बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पंतप्रधान मोदींचं कौतुक केलं. त्याचबरोबर त्यांनी विरोधकांना टोला लगावला. विकासकामे पाहून काहींना पोटदुखी होते. त्याकडे आपल्या लक्ष द्यायचे नाही. ज्यांना पोट दुखी होते त्यांच्यासाठी, आपण बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू केलाय. त्या दवाखान्यात मोफत ते उपचार घेतील, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी विरोधकांना लगावला. (Latest News)
मोदींकडे श्रद्धा, सबुरी, संयम आणि धैर्य
मेळाव्यात बोलताना मुख्यमंत्री शिंदेंनी पंतप्रधान मोदींचं स्वागत केलं. देशाच्या विकासाचा सर्वांगीण विकासाचा अजेंडा घेऊन ते पुढे जात आहेत. मोदींकडे श्रद्धा, सबुरी, संयम आणि धैर्य आहे. पंतप्रधान मोदींच्या कामाचं कौतुक करतान मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, पंतप्रधान मोदी देशाला महासत्ता बनवत आहात यामुळे मी त्यांचे आभार मानतो. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
या देशातील १४० कोटीची जनतेने तुमच्या नेतृत्त्वा विश्वास ठेवलाय. म्हणून मोठ्या संख्येने लोकं त्यांचे भाषण ऐकण्यासाठी आलात. आपलं सरकार स्थापन झाल्यानंतर पंतप्रधान मोदी ६ वेळा महाराष्ट्रात आले. निमंत्रण दिलं ते त्यांनी स्वीकारलं आणि ते आले, हा त्यांचा मोठेपणा आहे. आतापर्यंत २ लाख कोटींच्या कामांचं उद्धाघाटन आणि लोकार्पण मोदींच्या शुभहस्ते झालेलं आहे. आज देखील १४ हजार कोटी पेक्षा कामांचे लोकार्पण झालं.
पंतप्रधान मोदी जे काम हाती घेतात. जे प्रकल्प हाती घेतात, ज्या कामांचं भूमीपूजन करतात. ते काम वायू वेगाने पूर्ण होत असते. पंतप्रधान मोदींच्या हाताला यशाचं परिस आहे. हात लावताच त्या कामाचं सोनं होतं, असा आपला अनुभव असल्याचं शिंदे म्हणाले. याचमुळे आम्ही त्यांना राज्यातील प्रकल्प आणि विकासकामांच्या लोकापर्णाला आणि भूमिपूजनाला बोलवत असतो. परंतु काहींच्या लोकांच्या पोटात दुखत. परंतु आपल्याला त्याकडे लक्ष द्यायचे नाही, असं मुख्यमंत्री म्हणालेत.
इतिहासात जात नाही
निळवंडे धरणाचा प्रकल्प हा देवेंद्र फडणवीस यांच्या जन्माच्या आधीपासून सुरू झालेला आहे. त्यानंतर अनेकवेळा या धरणाचे काम बंद पडले. जेव्हा देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाले तेव्हा त्यांनी परत हे धरणाचे काम हाती घेतले. आज हा प्रकल्प पूर्ण झाला. यामुळे जवळपास ६८ हजार हेक्टर जमीन ओलिताखाली येणार आहे. आपलं शेतकऱ्यांचा सरकार आहे. प्रत्येकांच्या जीवनात आनंद आला पाहिजे म्हणून आपल्या सरकारने मोदींच्या जन्मदिनी ११ सुत्री कार्यक्रमाची घोषणा केली. नमो शेतकरी योजना, नमो शेतकरी योजना, माता-बहिणींसाठी योजना, कामगार योजना, आदी योजनांना आम्ही गती देत आहोत,हे आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे.
आमचं सरकार स्थापित होण्याआधी अडीच वर्षात सर्व प्रकल्प सर्व कामे बंद होती. त्याला आपण चालना दिली आणि नवीन प्रकल्प सुरू केले. राज्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी डबल इंजिन सरकारची गरज असते. राज्याच्या विकासासाठी ज्या ज्या गोष्टी मागितली त्या त्या गोष्टी पंतप्रधान मोदींनी आपल्याला दिल्या. राज्यातील जे दुष्काळग्रस्त भाग आहे, त्या भागात पाणी वळवण्याचं काम केलं पाहिजे. याचा निर्णय देवेंद्र फडणवीस आणि मी घेतल्याचं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
परंतु ही योजना मोठी आहे, राज्याच्या आर्थिक मर्यादेच्या बाहेरची आहे. त्यामुळे मी पंतप्रधान मोदींकडे मागणी करतो की, त्यांनीही या प्रकल्पाला मदत करावी. आपले सरकार आल्यानंतर अनेक योजनांना मान्यता देण्यात आल्या. सरकारने ३५ सिंचन प्रकल्पांना मंजुरी दिलीय. लाखो हेक्टर जमीन ओलिताखाली आणण्याचे काम आपण केलंय.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.