Devendra Fadnavis 
महाराष्ट्र

Devendra Fadnavis: मंत्रिमंडळ बैठकीची गोपनीय माहिती बाहेर फोडल्यास कारवाई होणार; मुख्यमंत्र्यांचा 'फितुरांना' इशारा

Maharashtra cabinet Meeting: राज्य मंत्रिमंडळाची बैठक दर मंगळवारी होते. या बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेतले जातात. परंतु हे निर्णयांची माहिती अगोदरच बाहेर येत असल्यानं देवेंद्र फडणवीस नाराज झालेत.

Bharat Jadhav

राज्य मंत्रिमंडळाची बैठक होण्यापूर्वीच गोपनीय माहिती बाहेर येत असल्याचे प्रकार घडत असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाराज झालेत. या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी सर्व मंत्र्यां तंबी दिलीय. जर यापुढे कोणतीही माहिती अगोदरच बाहेर गेली तर कठोर कारवाई केली जाईल असा, इशाराच देवेंद्र फडणवीस यांनी दिलाय.

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीपूर्वीच संपूर्ण कार्यक्रम पत्रिकेची माहिती वृत्तवाहिन्यांवरुन चालवली जात असल्यानं मुख्यमंत्री नाराज झालेत. मंगळवारी होणाऱ्या बहुतांश मंत्रिमंडळ बैठकीत काय घडणार, याची माहिती सर्वांना असते.

मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णयाची माहिती यापुढे बाहेर देऊ नये. तसे घडल्यास संबंधितांवर कारवाई केली जाईल, असा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी सर्व मंत्र्यांना दिला. बैठकीआधीच माहिती बाहेर फोडण्याची पद्धत चुकीची आहे. कार्यक्रमपत्रिका गुप्त असते. मंत्र्यांनी गोपनीयतेची शपथ घेतलेली असते. मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णयांमध्ये काही लपवण्यासारखे नसले तरी काही रुढ संकेत असतात. त्यामुळे प्रसारमाध्यमांनीही खपासाठी आणि टीआरपी वाढवण्यासाठी मंत्रिमंडळ बैठकीपूर्वीच निर्णयांची माहिती दाखवू नये, असं आवाहन फडणवीस यांनी केलंय.

फितुरांना मुख्यमंत्र्यांनी इशारा दिल्यानंतर विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस आमदार विजय वडेवट्टीवार यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिलीय. वडेवट्टीवार यांनी मुख्यमंत्र्यांच्या विधानावर सहमती दर्शवलीय. मुख्यमंत्र्यांचा काही चुकलं नाही गोपनीयतेची शपथ घेत असेल तर त्याला बाहेर जाऊ नये, चॅनलला हेडलाईन दाखवण्यासाठी तुम्ही सोर्स वापरता त्याला एखादा कॅबिनेट मंत्री बळी पडतो. प्रत्येक मुख्यमंत्री या सूचना देत असतात.

मंत्रिमंडळात फितूर आहे का देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून फितूर याचा शोध घेण्यासाठी विरोधकांचा आवश्यकता असेल तर आहे त्यांना मदत करू ते जर आम्हाला मागणी करतील तर आम्ही त्यांना नाव देऊ, असं वडेवट्टीवार म्हणालेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Home Vastu Tips: वास्तुशास्त्रानुसार घराच्या दरवाज्यांना कोणता रंग द्यावा?

GK: ४,००० किमीचा प्रवास! देशातील सर्वात लांब महामार्ग कोणता?

EPFO New Scheme : EPFO ची नवी योजना, १ लाखांपर्यंत पगारदारांना १५ हजारांचा फायदा! ३० एप्रिलपर्यंत नोंदणीची संधी |VIDEO

Maharashtra Live News Update: माधवी खंडाळकर अजित पवारांच्या भेटीला

Shraddha Kapoor: बॉलिवूडच्या 'स्त्री'ची हॉलिवूडमध्ये एन्ट्री; डिस्नेच्या 'या' चित्रपटात करणार श्रद्धा कपूर

SCROLL FOR NEXT