Sanjay Raut Latest Marathi News Saam Tv
महाराष्ट्र

'संभाजीराजेंना पाडण्याचं काम शिवसेना आणि संजय राऊतांनी केलं'

एकनाथ शिंदे यांना छावा संघटनेचे लाखो सदस्य मुंबईत संरक्षण देणार आहेत, कारण...

साम टिव्ही ब्युरो

पुणे : राज्यातील तमाम शिवसैनिक ठाकरे सरकारला (mva government) पाठिंबा देत आहेत. तर काही संघटना आणि शिवसेनेचे कार्यकर्ते एकनाथ शिंदे गटाचं समर्थन करत आहेत. याच पार्श्वभूमीवर अखिल भारतीय छावा संघटनेचं केंद्रीय अध्यक्ष नाना जावळे (Nana Javale) यांनी पत्रकार परिषदेत मोठं विधान केलं आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना छावा संघटनेचे लाखो सदस्य मुंबईत संरक्षण देणार आहेत. संजय राऊत यांनी आपली टवाळकी बाहेर जाऊन करावी.राज्यात ठाकरेशाही चालणार नाही. संभाजी राजेंना (Sambhajiraje Chhatrapati) पाडण्याचं काम शिवसेनेनं आणि संजय राऊतांनी केलं. संजय राऊत यांनी स्वत:ला आवरावं नाहीतर मारहाण करु, असा सणसणीत इशारा जावळे यांनी राऊत यांना दिला आहे.

यावेळी जावळे पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले, शेतकरी मरत आहेत आणि ते राजकीय पोळी भाजत आहेत. मराठा समाजाविषयी राऊत अभद्र शब्द वापरतात. मुक मोर्चाला मुका म्हणतात अणि हे आम्हाला शिकवतात. तुमच्या हातात दंडुके तर आमच्या हातात तलवार आहे. ही तर राजकीय क्रांती आहे. आमचा पक्षाला विरोध नाही पण होणाऱ्या क्रांतीला आमचा पाठिंबा आहे. मुंबई तुमच्या बापची नाही, हा महाराष्ट्र मराठ्यांचा आहे.

संजय राऊत यांनी आपली टवाळकी बाहेर जाऊन करावी. राज्यात ठाकरेशाही चालणार नाही. आम्ही सत्तेसाठी कधीही लाचारी स्वीकारली नाही. आमच्यावर आरोप करणारे सगळे दलाल आहेत. संभाजी राजेंना पडण्याचं काम सेनेनं आणि संजय राऊतने केलं आहे, अशी खरमरीत टीका जावळे यांनी शिवसेना आणि संजय राऊत यांच्यावर केली आहे.

एकनाथ शिंदे गट आणि महाविकास आघाडी सरकारमध्ये जोरदार सत्तासंघर्ष सुरु आहे. शिंदे गटाने बंडाचं निशाण फडकावल्याने ठाकरे सरकारचं सिंहासन डळमळीत झालं आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी ठाकरे सरकारला उद्याच (३० जूनला ) बहुमत सिद्ध करण्यासाठी आदेश दिले आहेत. त्यामुळे राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे.

Edited By - Naresh Shende

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

नागपुरमध्ये पुस्तकांचा महाकुंभ, मोबाईलला सुट्टी; 'सकाळ'च्या स्टॉलवर वाचकांची गर्दी|VIDEO

मोबाईलमधील गाणे बिबट्याला पळवतील दूर, अचानक आला समोर तर काय कराल? वनविभागाच्या महत्त्वाच्या सूचना

Salman Khan: सलमान भाईजानचा जलवा कायम; सिनेमा रिलीज होण्याआधीच केला 300 कोटीपेक्षा जास्त गल्ला

India Tourism : हिरवगार जंगल, धबधबे, व्हॅलीचे सौंदर्य; सर्वकाही एकाच ठिकाणी, 'हे' आहे स्वर्गाहून सुंदर ठिकाण

Birth Certificate: बोगस जन्म-मृत्यू दाखले रद्द होणार; फडणवीस सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT