Three Attackers Kill Man on Busy Road Saam Tv
महाराष्ट्र

तोंडाला रूमाल बांधून आले अन् भररस्त्यावर तरूणाला संपवलं; संभाजीनगरात रक्तरंजित थरार

Three Attackers Kill Man on Busy Road: छत्रपती संभाजीनगर शहरातील शहाबाजार परिसरामध्ये तीन आरोपींनी तोंडाला रुमाल बांधून समीर विनायक खान या तरुणाचा धारदार शस्त्राने वार करत खून केला.

Bhagyashree Kamble

छत्रपती संभाजीनगरमधून धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. शहरातील वर्दळीच्या ठिकाणी तीन आरोपींनी एकावर धारदार शस्त्राने वार करत हत्या केली आहे. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच तपासाला सुरुवात केली. या प्रकरणानंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

छत्रपती संभाजीनगर शहरातील शहाबाजार परिसरात एकावर धारदार शस्त्राने वार केले. या हल्ल्यात तरूणाचा जागीच मृत्यू झाला. प्राथमिक माहितीनुसार, समीर विनायक खान असे मृत तरूणाचे नाव आहे. तरूण शहर परिसरातील रसत्यावर उभा होता. तीन अज्ञात आरोपी तोंडाला रूमाल बांधून आले.

तिन्ही आरोपींच्या हातात धारदार शस्त्र होते. धारदार शस्त्राचा वापर करून आरोपींनी समीरची हत्या केली. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच तपासाला सुरूवात केली.

'हत्येची घटना शहाबाजार परिसरात घडली. आरोपींनी तरूणावर वार करत हत्या केली. या घटनेचा सीसीटीव्ही समोर आला आहे. आरोपींचा शोध सुरू आहे. गुन्ह्यातील सर्व शक्यता आम्ही तपासत आहोत', अशी माहिती पोलीस उपायुक्त पंकज अतुलकर यांनी दिली. माहितीनुसार, २ आठवड्यांपूर्वी एका तरूणाची अशीच हत्या झाली होती. त्या घटनेचाही सीसीटीव्ही फुटेज समोर आला होता. आताही अशाच प्रकारच्या हत्येचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे संभाजीनगर पोलिसांचा धाक संपलाय का? असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Winter Stomach Care: हिवाळ्यात पोटदुखी का वाढतेय? तज्ज्ञांनी सांगितली कारणे आणि प्रभावी उपाय

चॅट्स- व्हिडिओ बघितले, चुपके-चुपकेवालं अफेअर समजलं; बँकेत मॅनेजर असलेल्या नवऱ्याला बायकोनं तुडव तुडव तुडवलं

Goa Film Festival: गोवा फिल्म फेस्टिव्हलमध्ये मराठी सिनेमाचा डंका, 'या' दोन चित्रपटांचे आंतरराष्ट्रीय स्तरावर कौतुक

Shepuchi Bhaji Recipe: मुगाची डाळ घालून बनवा शेपूची भाजी; नाक मुरडणारे पण चवीचवीनं खातील

Skin Care: हिवाळ्यात चेहरा साबणने धुण्याची सवय आहे? मग, होऊ शकतो 'हा' गंभीर परिणाम

SCROLL FOR NEXT