Bhilai Youth Brutally killed by Girlfriend’s Brothers Saam Tv
महाराष्ट्र

गर्लफ्रेंड घरात एकटी, बॉयफ्रेंड खोलीत शिरला; भावांनी पाहिलं अन् चोप दिला, तरूणाचा जागीच मृत्यू

Bhilai Youth Brutally killed by Girlfriend’s Brothers: छत्तीसगडमधील भिलाई येथे प्रेमप्रकरणातून धीरज सरोज या २५ वर्षीय तरुणाची प्रेयसीच्या भावांकडून हत्या करण्यात आली.

Bhagyashree Kamble

छत्तीसगडमधील दुर्ग जिल्ह्यातील भिलाई येथे प्रेमप्रकरणातून तरूणाची हत्या करण्यात आली आहे. घटनेच्या दिवशी तरूण प्रेयसीला भेटण्यासाठी तिच्या घरी गेला होता. भावांनी बहिणीला आणि तिच्या प्रियकराला रंगेहाथ पकडलं. भावांनी तरूणाला पकडून निर्घृणपणे हत्या केली. या घटनेनंतर पोलिसांनी तीन आरोपींना ताब्यात घेतलं आहे. तर, इतर फरार दोन आरोपींचा शोध सुरू आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

धीरज सरोज उर्फ विक्की (वय वर्ष २५) असे मृत तरूणाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धीरजचे परिसरात राहणाऱ्या तरूणीशी प्रेमसंबंध होते. घटनेच्या दिवशी महिलेची आई घराबाहेर गेली होती. तर, तिचा भाऊ सूरज कामावर होता. दरम्यान, धीरज त्याच्या प्रेयसीला भेटण्यासाठी घरी गेला. युवतीनं त्याला थाबंवले. पण तो घरी गेला.

काही वेळाने तरूणीचा भाऊ सूरज अचानक घरी परतला. दोघांना एकत्र पाहून भाऊ संतापला. त्यानं चुलत भावांना बोलावून घेतलं. तसेच दरवाजा बंद करून धीरजला बेदम मारहाण केली. डोक्याला गंभीर दुखापत झाल्यानं त्याचा जागीच मृत्यू झाला.

मृत तरूणाची आई शोभा यांनी आरोप केला की, तरूणीनं धीरजला घरी बोलावून घेतलं. नंतर तरूणीच्या भावांनी धीरजची हत्या केली. पोहोचल्यानंतर धीरज रक्ताच्या थारोळ्यात पडला होता, अशी माहितीही तरूणाच्या आईनं दिली. पोलीस हेम प्रकाश नायक म्हणाले की, 'धीरजची निर्घृण हत्या करण्यात आली. ५ संशयितांची ओळख पटली आहे. तिघांना अटक करण्यात आली आहे. दोघे फरार आहेत. तरूण मुलीला भेटण्यासाठी घरी गेला होता. मुलीच्या भावांनी धीरजवर हल्ला केला, यामुळे त्याचा मृत्यू झाला', अशी माहिती त्यांनी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

''३० व्या मजल्यावरच्या खिडकीत उतरुन..'', अनंत गर्जेने पत्नीच्या टोकाच्या पावलावर दिली प्रतिक्रिया, प्रकरणात नवा ट्वीस्ट?

Kalyan : कल्याणमधील धक्कादायक प्रकार! महाविद्यालयातच नमाज पठण

Shocking : आत्याच्या घरी सुरु होती लगीन घाई, कुटुंबीयांची नजर चुकवून १३ वर्षीय मुलीने केली आत्महत्या, धक्कादायक कारण आलं समोर

Male Fertility Decline: तुमच्या जेवणामध्ये असलेल्या 'या' एका घटकाने पुरुषांचा कमी होतो स्पर्म काउंट

Maharashtra Live News Update: खेड पंचायत समिती निवडणुकीतील शिवसेना पक्षाच्या इच्छुक उमेदवाराच्या घरासमोर जादूटोणा

SCROLL FOR NEXT