Photo outside restroom at a banquet hall in Sikri triggers outrage after images of Chhatrapati Shivaji Maharaj and Rani Padmini were used as signboards. saam tv
महाराष्ट्र

संतापजनक! बाथरूमच्या फलकावर लावला छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो

Chhatrapati Shivaji Maharaj Photo: हरियाणातील सिक्री येथील एका बँक्वेट हॉलमध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि राणी पद्मिनी यांचे फोटो शौचालयाबाहेर लावण्यात आलेत. त्यावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे जनतेत संतापाची लाट उसळली आहे.

Bharat Jadhav
  • हरियाणातील सिक्री येथे बँक्वेट हॉलमध्ये संतापजनक प्रकार उघड.

  • प्रसाधनगृहांच्या फलकांवर छत्रपती शिवाजी महाराज व महाराणी पद्मिनी यांचे फोटो लावले.

  • व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल; जनतेत संतापाची लाट.

हरियाणातील सिक्री येथून एक संतापजनक घटना समोर आली आहे. सिक्री येथील एका बँक्वेट हॉलमधील प्रसाधनगृहांबाहेर दिशादर्शक म्हणून छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराणी पद्मिनी यांचा फोटो लावण्यात आलेत. पुरुष आणि महिला प्रसाधनगृहांबाहेर हे फोटो आहेत. या फोटोचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. दरम्यान हा प्रकार पाहून सामाजिक कार्यकर्ते आणि इतिहासप्रेमींनी नाराजी व्यक्त केली आहे.

काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रासह देशभरात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी केली गेली. मोठ्या उत्साहात जयंती साजरी केली गेली. छत्रपती शिवाजी महाराज यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली होती. त्याच छत्रपतींचा फोटोचा अपमान करण्यात आलाय.

सिक्री परिसरातील मिलान बँक्वेट हॉलमध्ये एक कार्यक्रम आयोजित केला होता. बाथरूमच्या फलकांवर ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वांची चित्रं लावण्यात आल्याचे त्यांना दिसले. याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. सोशल मीडियावरील व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेकांनी बँक्वेट हॉलवर कारवाईची मागणी केली आहे. छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्राभिमानाचं प्रतीक मानले जातात.

तर महाराणी पद्मिनी यांचे नाव त्याग, स्वाभिमान आणि पराक्रमाशी जोडले जाते. अशा थोर व्यक्तिमत्त्वांच्या फोटोंचा वापर चुकीच्या ठिकाणी करणे केवळ असंवेदनशील नाही, तर सांस्कृतिक वारशांचा अपमान असल्याचे अनेकांचे मत आहे. यामुळे कारवाई करण्याची मागणी होतेय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Famous Actress Photos : हातात वॉकर अन्...; प्रसिद्ध अभिनेत्रीच्या पायाला गंभीर दुखापत, अवस्था पाहून चाहते चिंतेत

Ashok Kharat: भोंदूबाबा खरात प्रकरणात पहिल्या शासकीय अधिकाऱ्यावर मोठी कारवाई, उपजिल्हाधिकाऱ्याची तडकाफडकी बदली

Dombivli : नाशिकनंतर डोंबिवलीत भोंदूबाबाचं भयंकर कृत्य; मुलीच्या लग्नाचा दोष सोडवतो सांगत बोलवून घेतलं अन्...

Multani Mati Face Wash Tips: चेहरा धुण्यासाठी साबण वापरणं आजच सोडा! 'या' नैसर्गिक गोष्टीने येईल पार्लरसारखा ग्लो

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगाबाबत महत्वाची अपडेट, पगार अन् पेन्शन ३४ टक्क्यांनी वाढण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT