Chhatrapati Sambhajinagar Saam TV
महाराष्ट्र

Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगरच्या ड्रग्ज रॅकेटचे जाळे देशभर, आणखी एका फार्मा कंपनीची झडती

Crime News : धर्मा फार्मा केम या कंपनीत आरोपी जितेशकुमार हिनहोरिया गेल्या सप्टेंबरपासून टेक्निकल डायरेक्टर म्हणून कार्यरत होता.

डॉ. माधव सावरगावे

Chhatrapati Sambhajinagar :

छत्रपती संभाजीनगरमध्ये 500 कोटींच्या ड्रग्ज रॅकेट प्रकरणात आणखी एका फार्मा कंपनीची डीआरआयच्या पथकाने झडती घेतली. गीता केमिकल्स, महालक्ष्मी केमिकल्स कंपनीसोबतच आता धर्मा फार्मा केम या कंपनीतही डीआरआयने तपासणी केल्याचे खात्रीदायक वृत्त आहे.

संभाजीनगरच्या ड्रग्ज रॅकेटचे जाळे देशभर असल्याचा संशय आहे. गुजरातच्या अंगडियामार्फत पैशाचे व्यवहार होत असल्याचं तपासात लक्षात आल्यानंतर महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) आता या प्रकरणाच्या तपासासाठी एटीएसचीदेखील मदत घेतली आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

धर्मा फार्मा केम या कंपनीत आरोपी जितेशकुमार हिनहोरिया गेल्या सप्टेंबरपासून टेक्निकल डायरेक्टर म्हणून कार्यरत होता. या प्रकरणातील दुसरा आरोपी संदीप कुमावत याने ड्रग्ज निर्मितीसाठी सुरू केलेल्या महालक्ष्मी कंपनीत आय ड्रॉप निर्मितीचे काम सुरू असल्याचा देखावा उभा करण्यात आला होता. दरम्यान, गुप्तचर यंत्रणेने छत्रपती संभाजीनगर, वाळूज आणि पैठण या तिन्ही ठिकाणच्या कारखान्यांची पाहणी करून केंद्रीय गृह मंत्रालयाकडे पाठवला आहे.

आतापर्यंत या प्रकरणात संभाजीनगरच्या वाळूज येथील गीता केमिकल्स, पैठणची महालक्ष्मी केमिकल्स, धर्मा फार्मा केम या ३ कंपन्यांची नावे पुढे येत असली तरी या काळ्या धंद्याचे जाळे अधिक मोठे असल्याचे बोलले जाते. एकट्या पैठण एमआयडीसीतील आठ केमिकल कंपन्यांमध्ये जितेशकुमार आणि संदीप या दोन्ही आरोपींचा वावर होता. त्यापैकी ३ कंपन्या जितेशकुमार आणि संदीपच्या अटकेनंतर बंद असल्याने त्यांच्याभोवतीचे धुके दाट झाले आहे.  (Live Marathi News)

अहमदाबाद क्राइम ब्रँच व केंद्रीय महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआयआर) संभाजीनगरमध्ये ५०० कोटी रुपयांची ड्रग्ज निर्मिती करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश करून जितेशकुमार हिनहोरिया आणि संदीप कुमावत या दोघा आरोपींना अटक केली आहे. यापैकी जितेशकुमारने आत्महत्येचा प्रयत्न केल्याने त्याच्यावर एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत, तर कुमावत यास न्यायालयीन कोठडी मिळाली आहे.

दरम्यान, मंगळवारी आरआयने शहर आणि जिल्ह्यातील आणखी चार कंपन्यांवर छापा मारला. या सर्व रसायन निर्मितीच्या कंपन्यांमध्ये विविध औषधे व रासायनिक पदार्थांचे उत्पादन करण्यात येते. त्यांच्या संयुगातून ड्रग्ज बनवण्याचा फॉर्म्युला जितेशकुमार आणि संदीपने शोधून काढला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: कोपरी पाचपाखाडीत दोन्ही शिवसेनेच्या कार्यकत्यांची एकमेकांविरोधात घोषणाबाजी

Sharad Pawar News : संग्राम थोपटेंसाठी शरद पवार प्रचाराच्या मैदानात; भोरमध्ये जाहीर सभा

IND vs AUS: भारत- ऑस्ट्रेलिया कसोटी मालिका केव्हा, कधी आणि कुठे लाईव्ह पाहता येणार?

Raj Thackeray: उद्धव ठाकरे आडवा येतोच कसा? भोंग्यांच्या मुद्द्यावरून राज ठाकरेंचा थेट सवाल

Vanita Kharat मराठी सिनेसृष्टीतील टॉपची अभिनेत्री, पण नवरा काय करतो? तुम्हाला माहितीये का

SCROLL FOR NEXT