प्रातिनिधिक फोटो  Saam Tv
महाराष्ट्र

Sambhajinagar News: छत्रपती संभाजीनगरात पाणीबाणी! जिल्ह्यात 678 टँकरने पाणीपुरवठा सुरू, टंचाईग्रस्त भागात बांधकामांना स्थगिती

Water Crisis News: छत्रपती संभाजीनगरमध्ये भीषण पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण झाली आहे. सद्यस्थितीला 412 गावे आणि 61 वाड्यांना 678 टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे.

Satish Kengar

रामू ढाकणे, साम टीव्ही, प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगर

छत्रपती संभाजीनगरमध्ये भीषण पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण झाली आहे. जिल्ह्यात आज सद्यस्थितीला 412 गावे आणि 61 वाड्यांना 678 टँकरने पाणीपुरवठा सुरू असून पाणीटंचाईच्या अनुषंगाने जिल्हाभरात तयारी सुरू केली आहे. मान्सून पूर्वतयारीसाठी सुद्धा आता जिल्हा प्रशासन सज्ज झाल्याचं जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी सांगितलं आहे.

ग्रामीण भागातील नागरिकांनी, पुढच्या 3 दिवसात रीतसर अर्ज किंवा निवेदन तहसीलदार यांच्याकडे द्यावा. त्याचा विचार जिल्हा प्रशासन करेल आणि ग्रामीण भागातील कोणतेही नागरीक पाण्यापासून वंचित राहणार नाही, याची काळजी जिल्हा प्रशासन घेत आहे.

जिल्ह्यात चारा वाहतूकला बंदी घालण्यात आली आहे. त्याबरोबरच ज्या परिसरात पाणीटंचाई निर्माण झाली असेल, त्या ठिकाणी बांधकाम करण्यास 15 जूनपर्यंत बंदी घालण्यात आली असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.

धाराशिव जिल्ह्यात पाणीटंचाईच्या झळा तीव्र

दरम्यान, धाराशिव जिल्ह्यात पाणीटंचाई अधिकच तीव्र झाली आहे. टंचाईग्रस्त गावांच्या संख्येत दररोज वाढ होत असून जिल्ह्यात 91 गावांसाठी 134 टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. तर 374 गावांना अधिग्रहीत विहिरींद्वारे पाणीपुरवठा करण्यात येतोय. 2023-2024 मध्ये अत्यल्प पावसामुळे तलाव विहिरी पुर्ण क्षमतेने भरले नाहीत. त्यामुळे उन्हाळा सुरू होताच भीषण पाणीटंचाई निर्माण होताना दिसत आहे.

जिल्ह्यात फेब्रुवारी महिन्यापूसन टंचाईच्या झळा बसत आहेत. तर मार्च एप्रिल महिन्यात उन्हाचा पार वाढला असून त्यामुळे पाण्याचा वापर ही वाढला आहे. यातच जिल्ह्यात सध्या भिषण पाणीटंचाई निर्माण झालेली पाहायला मिळत आहे. सर्वांधीक पाणी टंचाई भुम तालुक्यात पाहायला मिळत असून या ठिकाणी 40 टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: मुंबई महापालिका कोण जिंकणार? निवडणुकीआधीच ठाकरेंनी घातलं गाऱ्हाणं

Maharashtra Live News Update: बिबट्यांच्या हल्ल्या विरोधात शिरुर तालुक्यातील पिंपरखेड येथील ग्रामस्थ आक्रमक, रोखला महामार्ग

Ananya Pandey: आओ हुजूर तुमको सितारों में ले चलूँ...; अनन्याचा रॉयल लूक पाहिलात का?

शेफाली वर्माची बॅट तळपळली; टीम इंडियाचा दक्षिण आफ्रिकेविरोधात चौकार-षटकारांचा वर्षाव, दिलं इतक्या धावांचं आव्हान

Nepal Politics: सार्वत्रिक निवडणुकीची तयारी सुरू; पंतप्रधानांनी बोलवली राजकीय पक्षांची बैठक

SCROLL FOR NEXT