Shiv Sena Sub District Chief Santosh Amle son beaten  SaanTV
महाराष्ट्र

Crime : जेवण देण्यास नकार, शिवसेना नेत्याच्या पुत्राचा हॉटेलमध्ये राडा, मॅनेजर-कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण, पाहा Video

Chhatrapati Sambhajinagar Shiv Sena leader Son Fight in Hotel: संभाजीनगरमध्ये एकनाथ शिंदेंच्या शिवसेना नेत्याच्या मुलाने हॉटेलमध्ये राडा घातल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

छत्रपती संभाजीनगर : राज्यात गुन्हेगारीच्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. या घटनांमध्ये बऱ्याचवेळा राजकीय नेत्यांच्या पुत्रांचा देखील समावेश असताना आपण पाहिलं आहे. अशीच एक संतापजनक घटना छत्रपती संभाजीनगरमध्ये घडली आहे. संभाजीनगरमध्ये एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या नेत्याच्या मुलाने हॉटेलमध्ये राडा घातल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. त्यामुळे शहरात खळबळ उडाली आहे.

शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख संतोष आमले यांच्या मुलाने शहरातील एका हॉटेलमध्ये धुडगूस घातल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. हॉटेल बंद झाल्यानंतर मध्यरात्री जेवण द्यायला नकार दिल्यामुळे आमले यांच्या पुत्राने आठ ते दहा जणांच्या टोळक्याला घेऊन जाऊन हॉटेलची तोडफोड करत कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण केली आहे. लाठ्या,काठ्या, हॉकी स्टिकने आणि रॉडने हॉटेल कर्मचारी तसेच मॅनेजरला देखील बेदम मारहाण केली असल्याचं समोर आलं आहे. या घटनेबाबत शहरातील छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, संभाजीनगरमध्ये कालच तुपे नावाच्या एका नामवंत बिल्डरच्या ७ वर्षीय मुलाचे अपहरण करुन दोन कोटी रुपयांची खंडणी माहितली असल्याची बातमी समोर आली. ही धक्कादायक घटना मंगळवारी सिडको भागात घडली. धक्कादायक म्हणजे, खंडणीसाठी आलेला अपहरणकर्त्यांचा मोबाइल काही वेळाने बंद झाला. चैतन्य असं अपहरण झालेल्या मुलाचं नाव आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

नाचणाऱ्या कलेक्टरविरोधात वातावरण तापलं, शेतकरी-पोलीस आमने-सामने, VIDEO

Maharashtra Live News Update: - सोलापूर जिल्ह्यात माढा येथे सर्वाधिक पुरस्थिती

Asia Cup 2025 फायनलपूर्वी पाकिस्तानचा मोठा निर्णय, संपूर्ण स्पर्धेवर टाकला बहिष्कार

Maharashtra Politics: एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, बड्या नेत्यांसह ८०० कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

Pune Crime News : दिवसा खासगी बँकेत नोकरी, रात्री करायचा भयंकर खेळ; पुण्यातील तरुणासह ३९ जण अडकले

SCROLL FOR NEXT