Chhatrapati Sambhajinagar Aurangzeb Tomb security increased Saam Tv News
महाराष्ट्र

Chhatrapati Sambhajinagar : औरंगजेबाच्या कबरीजवळ सुरक्षा वाढवली, SRPFची तुकडी तैनात; छत्रपती संभाजीनगरमध्ये काय घडतंय?

Aurangzeb Tomb Police Deployment : छत्रपती संभाजीनगरमध्ये औरंगजेबाच्या कबरीजवळील बंदोबस्त अचानक वाढवण्यात आलेला आहे. या परिसरात राज्य राखीव पोलीस दलाची तुकडी तैनात करण्यात आली आहे.

Prashant Patil

छत्रपती संभाजीनगर : औरंगजेबाची कबर उखडून फेकण्याची मागणी अनेक संघटना, राजकीय नेते करु लागले आहेत. औरंगजेबाची कबर न हटवल्यास बाबरीची पुनरावृत्ती करण्याचा इशारा विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाने दिला आहे. यानंतर आता छत्रपती संभाजीनगरमध्ये कबर परिसरातील पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या सन्मानार्थ औरंगजेबाची कबर हटवा, अशी मोहीम विहिंप, बजरंग दलानं शिवजयंतीला हाती घेतली आहे. त्यामुळे वातावरण तापलं आहे.

छत्रपती संभाजीनगरमध्ये औरंगजेबाच्या कबरीजवळील बंदोबस्त अचानक वाढवण्यात आलेला आहे. या परिसरात राज्य राखीव पोलीस दलाची तुकडी तैनात करण्यात आली आहे. १५ कर्मचारी, २ पोलीस अधिकारी या परिसरात तैनात आहेत. कबर परिसरात जाताना २ ठिकाणी नाकाबंदी लावण्यात आली आहे. कबर पाहायला जाणाऱ्या पर्यटकांची कसून तपासणी केली जात आहे.

छावा चित्रपटानंतर औरंगजेबाच्या कबरीचा वाद पेटला. गेल्या काही दिवसांत यावरुन अनेक नेत्यांनी विधानं केली आहेत. औरंगजेबाची कबर हटवण्याची भाषा अनेक राजकीय नेत्यांनी केली आहे. त्यामुळे अनुचित प्रकार टाळण्यासाठी या भागात SRPFची १ तुकडी, १५ पोलीस, २ अधिकारी तैनात केले गेले आहेत. काही पोलीस साध्या वेशातही तैनात आहेत. कायदा, सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी बरीच खबरदारी घेण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

नंदूरबारमध्ये अग्नितांडव! नवापूर MIDC मध्ये कंपनीला भीषण आग, एकापोठापाठ ५ स्फोटामुळे परिसर हादरला

Maharashtra News Live Update: नालासोपारात गटारावरील जाळीत महिलेचा पाय अडकला

Kasara-Manmad Railway: पाच तालुके अन् ४५ गावातून धावणार कसारा-मनमाड रेल्वे; नाशिक-मुंबई प्रवास होणार जलद

Mumbai Water Cut: मुंबईकरांवर पाणीसंकट! 'या' तारखेपासून १० टक्के कपात, BMC चा मोठा निर्णय

प्रियकरासाठी पतीला विजेचा शॉक, अनैतिक संबंधात अडसर, पत्नीनं रचला कट

SCROLL FOR NEXT