Sambhajinagar : औरंगजेबाची कबर उखडण्याचा इशारा, मिलिंद एकबोटेसह त्यांच्या समर्थकांना जिल्हाबंदी

Aurangzeb tomb controversy: मिलिंद एकबोटे आणि त्यांच्या समर्थकांना ५ एप्रिलपर्यंत जिल्हाबंदी करण्यात आली आहे. औरंगजेबाची कबर उद्धवस्त करण्याचा इशारा दिला होता.
Sambhajinagar
SambhajinagarSaam
Published On

Milind Ekbote News : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद येथील औरंगजेबाची कबर उद्धवस्त करण्याचा इशारा धर्मवीर संभाजी महाराज प्रतिष्ठाणचे अध्यक्ष मिलिंद रमाकांत एकबोटे यांनी दिला होता. याची गंभीर दखल घेत संभाजीनगर पोलिसांनी आणि जिल्हा प्रशासनाने मिलिंद एकबोटे आणि त्यांच्या समर्थकांना जिल्हाबंदी करण्यात आली आहे. १६ मार्च २०२५ ते ५ एप्रिल २०२५ पर्यंत एकबोटे आणि त्यांच्या समर्थकांना जिल्ह्यात प्रवेश नसणार आहे.

औरंगजेबाची कबर उखडून टाकण्याची मागणी केल्यावरून वातावरण तापले आहे. मिलिंद एकबोटे यांनी पुढील २० दिवस छत्रपती संभाजीनगर जिल्हा बंदी निर्णय घेण्यात आला आहे. पोलीस आणि जिल्हा प्रशासनाने याबाबतचे आदेश काढले आहेत. हिंदुत्ववादी नेते मिलिंद एकबोटे यांना पोलिसांनी जिल्हा बंदीची नोटीस दिली आहे. संभाजीनगर येथे औरंगजेब कबर हटाव आंदोलनात एकबोटे हे सहभागी होणार असल्याची पोलिसांना माहिती मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी जिल्हाबंदीचा निर्णय घेतला आहे.

मिलिंद एकबोटे यांनी संभाजीनगरला जाण्याचं कोणताही नियोजन नसल्याच सांगितले आहे. २९ मार्चला वढू येथे संभाजी महाराज यांची पुण्यतिथी आहे, त्याचं नियोजन करण्याचं काम चालू आहे. त्यामुळे प्रशासनाकडून अडथळा आणला जात असल्याचं आरोप एकबोटे यांनी केलाय आहे. जिल्हाबंदी करणे हे चुकीच असल्याचेही एकबोटे म्हणाले.

Sambhajinagar
Navi Mumbai: चारित्र्यावर संशय अन् हत्या, वेश्या व्यवसायात काम करणाऱ्या महिलेला प्रियकरानेच संपवलं

दरवर्षीप्रमाणे यंदाही छत्रपती संभाजी महाराज पुण्यतिथीनिमित्त २९ मार्चला भव्य रॅली काढण्यात येणार आहे. पुण्यतिथीनिमित्त हजारो कार्यकर्ते महाराजांना मानवंदना देतात. पण याच दिवशी मिलिंद एकबोटे आणि त्यांच्या संघटनेचे कार्यकर्ते महाराजांना मानवंदना दिल्यानंतर ते खुलताबाद येथे जाऊन औरंगजेबाची कबर नष्ट करणार असल्याची गोपनीय माहिती प्रशासनाला मिळाली होती.

Sambhajinagar
Maharashtra Politics: एकनाथ शिंदे काँग्रेसमध्ये जाणार होते, पण... ठाकरेंच्या बड्या नेत्याचा दावा

एकबोटे आणि त्यांचे समर्थक खुलताबाद येथील औरंगजेबाची कबर नष्ट करणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर प्रशासनाकडून तात्काळ दखल घेतली आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून प्रशसनाकडून मिलिंद एकबोटे आणि त्यांच्या समर्थकांना छत्रपती संभाजीनगरमध्ये जिल्हाबंदी करण्यात आली आहे. १६ मार्च २०२५ ते ५ एप्रिल २०२५ पर्यंत त्यांना जिल्ह्यात प्रवेश करता येणार नाही आहे. अपर जिल्हाधिकारी विनोद खिराळकर यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com