Chhatrapati Sambhajinagar News: Saamtv
महाराष्ट्र

Chhatrapati Sambhajinagar: विहिरीत आईचा मृतदेह दिसला, लेकीनेही उडी मारुन आयुष्य संपवलं, काळीज पिळवटून टाकणारी घटना!

Chhatrapati Sambhajinagar News: आई- आणि बहिणीच्या निधनाची बातमी समजताच गावी निघालेल्या मुलाचाही भीषण अपघात झाला असून त्यामध्ये तो गंभीर जखमी झाला आहे. माय-लेकीच्या मृत्यूने गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

Gangappa Pujari

राम ढाकणे, छत्रपती संभाजीनगर|ता. ६ सप्टेंबर

Chhatrapati Sambhajinagar Mother Daughter Death: छत्रपती संभाजीनगरमधून एक काळीज पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. आईने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याचे समजताच मुलीनेही आयुष्य संपवल्याची दुर्दैवी घटना छत्रपती संभाजीनगरच्या खुलताबाद तालुक्यातील गल्लेबोरगाव येथे घडली. धक्कादायक बाब म्हणजे आई- आणि बहिणीच्या निधनाची बातमी समजताच गावी निघालेल्या मुलाचाही भीषण अपघात झाला असून त्यामध्ये तो गंभीर जखमी झाला आहे. माय-लेकीच्या मृत्यूने गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद तालुक्यातील गल्लेबोरगाव मधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आईने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याचे दिसताच मुलीनेही विहिरीत उडी घेऊन आपली जीवनयात्रा संपविल्याची मन सुन्न करणारी घटना घडली. वंदना भरत दुधारे आणि पल्लवी भरत दुधारे असे या मायलेकींचे नाव आहे. या आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

समोर आलेल्या माहितीनुसार, दुधारे कुटुंब हे गेल्या अनेक दिवसांपासून शेतात राहत होते. काल रात्री रात्री सर्व कामे आटपून मुलगी पल्लवीने तिच्या आईच्या हातावर मेहंदी काढली आणि सर्वजण झोपी गेले. सकाळी उठल्यावर पल्लवीला तिची आई न दिसून आल्याने तिने आसपास शोध घेतला. यावेळी नजिकच्याच विहिरीत तिला आईचा मृतदेह आढळून आला. आईने आत्महत्या केल्याचा धक्का लेकीला सहन झाला नाही आणि तिनेही कोणताही विचार न करता स्वतः विहिरीत उडी घेत आत्महत्या केली.

आई आणि बहिणीच्या निधनाचे वृत्त समजताच भाऊ वाल्मिक जनराव त्यांच्या पत्नीला घेऊन अंत्यविधीसाठी निघाले होते. मात्र मध्येच त्यांचाही अपघात झाल्याने त्यांना गंभीर दुखापत झाली. या घटनेची माहिती मिळताच स्थानिकांसह, पोलिसांनी धाव घेत दोघींचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढले आहेत. माय-लेकीच्या आत्महत्येच्या घटनेने परिसर हादरुन गेला असून संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. याबाबतचा अधिक तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raj-Uddhav Thackeray Video: सुवर्णक्षण! हाच तो क्षण, ज्याची लाखो कार्यकर्ते वाट पाहत होती, पाहा व्हिडिओ

Rice Cooking Tips: भात पातेल्यात शिजवावा की कुकरमध्ये? वाचा फायदे-तोटे

Marathi bhasha Vijay Live Updates : कोणाची माय व्यायली त्यांनी मुंबईला हात लावून दाखवावा - राज ठाकरेंचा इशारा

Karnataka Hill Station: ट्रेकिंग अन् नयनरम्य दृश्य! कर्नाटकातील 'या' हिल स्टेशनला नक्की भेट द्या

१२ वर्षाच्या विद्यार्थ्यांचा अचानक मृत्यू, शाळेच्या गेटजवळ कोसळला; घटना सीसीटीव्हीत कैद

SCROLL FOR NEXT