Maharashtra Farmer News:  Saamtv
महाराष्ट्र

Crop Insurance: नुकसान लाखो रुपयांचे अन् मदत फक्त ३ रुपये; पीकविमा कंपनीकडून शेतकऱ्यांची थट्टा, संभाजीनगरमधील धक्कादायक प्रकार

Maharashtra Farmer News: दुष्काळी मराठवाड्यातील शेतकऱ्यांना विमा म्हणून कुणाच्या खात्यात ७० रुपये तर कुणाच्या खात्यात दीडशे रुपये जमा झालेत. त्याहून अधिक त्रासदायक म्हणजे ही विम्याची रक्कम काढायची असेल तर बँकेच्या खात्यात किमान १ हजार असणे गरजेचे आहे.

माधव सावरगावे

छत्रपती संभाजीनगर, ता. ८ जून २०२४

दुष्काळ, अवकाळी पाऊस अन् निसर्गानेही साथ न दिल्याने यंदा शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. एकीकडे दुष्काळाची दाहकता, त्यानंतर अचानक आलेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे नुकसानच झाले आहे. अशावेळी या नुकसानाची भरपाई म्हणून शेतकऱ्यांना पिक विम्याकडून मोठ्या अपेक्षा होत्या. मात्र मराठवाड्यात पिकविमा कंपन्यांनी शेतकऱ्यांची अक्षरशः थट्टा केल्याचे समोर आले आहे.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात शेतमालाला भाव नाही, नैसर्गिक आपत्ती आणि अवकाळी पाऊस या गोष्टींमुळे शेतकरी आधीच मेटाकुटीला आला आहे. याचपार्श्वभूमीवर सरकारने मोठा गाजावाजा करत शेतकऱ्यांसाठी 1 रुपयात पीक विमा जाहीर केला. त्यामुळे शेतकऱ्यांना थोडा दिलासा मिळाला.

मात्र आता शेतकऱ्यांना मिळालेली नुकसान भरपाई पाहिली तर सरकार आणि विमा कंपन्यांनी त्यांची थट्टाच मांडल्याचे पाहायला मिळत आहे. पैठण तालुक्यातील एका शेतकऱ्याला फक्त ३ रुपये २६ पैसे नुकसान भरपाई मिळाल्याने सर्वत्र संताप व्यक्त होत आहे. दत्ता ज्ञानदेव मानमोडे असे या शेतकऱ्याचे नाव आहे.

दरम्यान, दुष्काळी मराठवाड्यातील शेतकऱ्यांना विमा म्हणून कुणाच्या खात्यात ७० रुपये तर कुणाच्या खात्यात दीडशे रुपये जमा झालेत. त्याहून अधिक त्रासदायक म्हणजे ही विम्याची रक्कम काढायची असेल तर बँकेच्या खात्यात किमान १ हजार असणे गरजेचे आहे. त्यामुळे ७० रुपये १०० रुपयाचा विमा घेण्यासाठी बँक खात्यात हजार रुपये टाकायची कुठून असा प्रश्न शेतकऱ्यांना पडलेला आहे आणि पेरणीच्या काळात ही चेष्टा केल्याने शेतकऱ्यांचा सरकार विरोधी आणि विमा कंपन्या विरोधी संताप वाढला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: सुनेत्रा वाहिनी राष्ट्रीय अध्यक्ष होतील - अमोल मिटकरी

Pav Bhaji Khakhra: घरीच बनवा कुरकुरीत पावभाजी खाकरा; सोपी रेसिपी वाचा

Budget 2026: देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांचे शिक्षण किती?

मुंबईला रवाना होण्यापूर्वी शरद पवारांची अजितदादांच्या अंत्यस्थळाला भेट अन् नजर टाकताच...;

Skin Care: महागडी पार्लर ट्रिटमेंट कशाला? घरच्या घरी तयार केलेला 'हा' फेसपॅक लावा, मिळेल हेल्दी ग्लॉईंग स्किन

SCROLL FOR NEXT